प्रकरणचे नाव - लिंग विच्चार

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - लिंग विच्चार

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) मराठीतील लिंगाची उजळणी

1. लिंग म्हणजे काय?

नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुषजातीची आहे की स्त्रीजातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात.
□ लिंग नामाच्या रूपावरून ओळखले जाते.
□ लिंग याचा अर्थ खूण किंवा चिन्ह असा आहे.
प्राणिमात्रांचे लिंग हे वास्तविक असते.
निर्जीव वस्तूंचे लिंग हे काल्पनिक असते.
□ मराठीत लिंगाचे तीन प्रकार पडतात.
(१) पुल्लिंग
(२) स्त्रीलिंग
(३) नपुंसकलिंग.
□ जी नामे दोन लिंगात मोडतात त्यांना उभयलिंगी म्हणतात.
□ जी नामे दोनपेक्षा अधिक लिंगात मोडतात त्यांना बहुलिंगी म्हणतात.

2. लिंगाचे प्रकार व उजळणी

■ (1) पुल्लिंग
सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नामावरून पुरुष जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला “पुल्लिंग” म्हणतात. 
○ प्राणिवाचक नामांतील पुरुष किंवा नरजातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंग असे म्हणतात. 
□ उदा. चुलता, शिक्षक, घोडा, चिमणा, मुंगळा इत्यादी. 
○ “तो” हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते पुल्लिंगी मानावे. 
○ उदाहरण -: तो मुलगा, तो पोपट, तो वाघ, तो सिंह इ.

■ (2) स्त्रीलिंग 
सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नामावरून स्त्री जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना “स्त्रीलिंग” असे म्हणतात. 
○ प्राणिवाचक नामांतील स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंग असे म्हणतात. 
□ उदा. चुलती, शिक्षिका, घोडी, चिमणी, मुंगी इत्यादी. 
○ “ती” हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते स्रीलिंगी मानावे. 
○ उदाहरण -: ती मुलगी, ती मैना, ती वीज, ती वाघीण इ.

■ (3) नपुंसकलिंग    
सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या नामावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध न करून देणाऱ्या शब्दांना नपुंसकलिंग असे म्हणतात.    
○ ज्या नामावरून पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नसेल, तर त्याला 'नपुंसकलिंग' असे म्हणतात. 
○ “ते” हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते नपुंसकलिंगी मानावे.    
उदाहरण -: ते मूल, ते फूल, ते पुस्तक, ते कोकरू इ.    
○ निर्जीव वस्तुवाचक शब्दांवरून पुरुष किंवा स्त्री यांपैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही. म्हणून यांना नपुंसकलिंग असे म्हणतात.    
अपवाद : पुल्लिंगी - दगड, कागद.   
अपवाद : स्त्रीलिंगी - दौत, शाई.

3. मराठीतील लिंग ओळखण्याची Trick (पद्धत)

■ प्राणिमात्रांतील पुरुष किंवा नर यांचा उल्लेख आपण “तो” या शब्दाने करतो. 
□ उदाहरण -: तो बाप, तो पोपट, तो घोडा इत्यादी.
■ प्राणिमात्रांतील स्त्री किंवा मादी यांचा उल्लेख आपण “ती” या शब्दाने करतो. 
□ उदाहरण -: ती आई, ती मैना, ती घोडी इत्यादी.
■ सजीव प्राण्यांतील एखादा नर आहे किंवा मादी आहे, हे निश्चित सांगता येत नसेल, तर त्याला नपुंसकलिंगी मानून त्याचा उल्लेख “ते” या शब्दाने करतो.
□ उदाहरण -: ते कुत्रे, ते वासरू, ते पाखरू इत्यादी.

लिंग ठरविण्याच्या Tricky पद्धत : (A) 
आ - कारान्त नामे पुल्लिंगी असतात. 
ई - कारान्त नामे स्त्रीलिंगी असतात. 
ऐ - कारान्त नामे नपुंसकलिंगी असतात.

लिंग ठरविण्याच्या Tricky पद्धत : (B) 
□ "तो" या सर्वनामाचा वापर करून “पुल्लिंगी” शब्द शोधता येतो. 
□ "ती" या सर्वनामाचा वापर करून “स्त्रीलिंगी” शब्द शोधता येतो. 
□ “ते” या सर्वनामाचा वापर करून “नपुंसकलिंगी” शब्द शोधता येतो.

4. सजीव व निर्जीव वस्तूंच्या गुणधर्म वरून लिंग ठरवण्याची पद्धत

मोठा आकार, कठोरपणा, राकटपणा, शक्ती यांसारखे पुरुषप्राण्यांचे सर्वसामान्य गुणधर्म ज्या वस्तूंत आपणांस आढळतात, त्यांना आपण पुल्लिंगी मानतो. 
लहान आकार, कोमलपणा, देखणेपणा, सौम्यपणा, चांचल्य यांसारखे स्त्रीप्राण्यांचे सर्वसामान्य गुणधर्म ज्या वस्तूंत आपणांस आढळतात, त्यांना स्त्रीलिंगी मानतो. 
□ उदाहरणार्थ 
1) लोटा - पुल्लिंगी, तर लोटी - स्त्रीलिंगी. 
2) वारा - पुल्लिंगी, तर झुळूक - स्त्रीलिंगी. 
3) सूर्य, सागर, मृत्यू - पुल्लिंगी, तर वनश्री, वीज - स्त्रीलिंगी. 
□ अपवाद - दोरा हा दोरीपेक्षा आकाराने लहान असूनही तो पुल्लिंगी, तर दोरी स्त्रीलिंगी. ओढा हा नदीपेक्षा लहान असूनही तो पुल्लिंगीनदी स्त्रीलिंगी.

5. सामासिक व परभाषी शब्दांची लींग ठरवण्याची पद्धत

■ सामासिक शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते. परंतु सामासिक शब्द एकाच नामासाठी वापरल्यास त्या नामावरून लिंग ठरवावे.
□ उदाहरण -: 
• साखरभात (पु.) -> तो भात
• मीठभाकरी (स्त्री.) -> ती भाकरी
• गायरान (नपुं) -> ते रान
□ उदाहरणार्थ 
पुल्लिंगी - भाजीपाला (पु.), लक्ष्मीकांत (पु.), मेंढवाडा (पु.), आई-वडील (पु.), मीठमसाला(पु.) इत्यादी. 
स्त्रीलिंगी - भाऊबहीण (स्त्री.), देवपूजा (स्त्री.), पुरणपोळी (स्त्री.), पाणीपुरी(स्त्री.) इत्यादी. 
नपुंसकलिंगी - देवघर (नपुं.), बाईमाणूस ( नपुं.), नातेवाईक (नपुं), वही-पुस्तक (नपुं.) इत्यादी.

■ परभाषेतून आलेल्या शब्दांचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवितात. 
○ इंग्रजी शब्दांचे लिंग त्यांच्या मराठी अर्थावरून ठरवितात. 
□ उदाहरण -: 
पुल्लिंगी - बूट (जोडा) पु., क्लास (वर्ग) पु. इत्यादी. 
स्त्रीलिंगी - पेन्सिल (लेखणी) स्त्री., कंपनी (मंडळी) स्त्री., ट्रक (पेटी) स्त्री. इत्यादी. 
नपुंसकलिंगी - बुक (पुस्तक) नपुं. इत्यादी.

(B) लिंगानूसार नामांच्या रूपांत होणारा बदल

1. पुल्लिंगी व स्त्रीलिंगी नामांच्या रूपांत लिंगानूसार होणारा बदल

नियम 1 - काही प्राणिवाचक पुल्लिंगी शब्दांस ईण - प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रूपे होतात. 
□ पुल्लिंगी - स्त्रीलिंगी ……..…... पुल्लिंगी - स्त्रीलिंगी 
…... सुतार - सुतारीण ………..….… कुंभार - कुंभारीण 
…... माळी - माळीण …………...…. पाटील - पाटलीण 
…... वाघ - वाघीण …………………. तेली - तेलीण 
…... धोबी - धोबीण ……………..… कोळी - कोळीण 
…... सिंह - सिंहीण ………………... मालक - मालकीण 
…... हरीण - हरिणी ……………….. साजन - साजणी 
…... लोहार - लोहारीण ………....…. हत्ती - हत्तीण

नियम 2 - काही प्राणिवाचक अ - कारान्त पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे ई - कारान्त होतात. 
□ पुल्लिंगी - स्त्रीलिंगी ………….. पुल्लिंगी - स्त्रीलिंगी
…... हंस - हंसी ………………….…. वानर - वानरी 
…... गोप - गोपी ……………………. दास - दासी 
…... बेडूक - बेडकी ……………..….. तरुण - तरुणी 
…... देव - देवी ………………………. हरीण - हरिणी

नियम 3 - काही आ - कारान्त पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ई - प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात. 
□ पुल्लिंगी - स्त्रीलिंगी ……... पुल्लिंगी - स्त्रीलिंगी
…... लोटा - लोटी ………………. खडा - खडी 
…... भाकरा - भाकरी ……….… आरसा - आरशी 
…... दांडा - दांडी ……………..... नळा - नळी 
…... गाडा - गाडी ………………. फळा - फळी 
…... विधाता - विधात्री ………..... सुरा - सुरी

नियम 4 - नातेदर्शक आ - कारान्त पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप ई - कारान्त होते. 
□ पुल्लिंगी - स्त्रीलिंगी …... पुल्लिंगी - स्त्रीलिंगी
…... काका - काकी …......... मामा - मामी 
…... आजा - आजी …......... चुलता - चुलता

नियम 5 - संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ई - कारान्त प्रत्यय लागून होतात. 
□ पुल्लिंगी - स्त्रीलिंगी ……. पुल्लिंगी - स्त्रीलिंगी
…... राजा - राज्ञी ………..…. श्रीमान - श्रीमती 
…... भगवान - भगवती ….…. जनक - जननी 
…... युवा - युवती …………... विद्वान - विदुषी 
…... ग्रंथकर्ता - ग्रंथकर्ती …..... गृहस्थ - गृहिणी 
…... धनवान - धनवती ……... बुद्धिमान - बुद्धिमती 
…... दाता - दात्री …………... शक्तिमान - शक्तिमती

2. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी नामांच्या रूपांत लिंगानूसार होणारा बदल

नियम 1 - - कारान्त पुल्लिंगी प्राणिवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप - कारान्त होते व त्याचे नपुंसकलिंगी रूप - कारान्त होते. 
□ पुल्लिंगी ---- स्त्रीलिंगी --- नपुंसकलिंगी 
…. मुलगा ------- मुलगी ------ मुलगे 
…. कुत्रा --------- कुत्री -------- कुत्रे 
…. पोरगा ------- पोरगी ------ पोरगे 
…. घोडा --------- घोडी ------- घोडे

(C) लिंगानूसार नामांच्या स्वतंत्र रूपांत असणारे शब्द

1. स्वतंत्र - पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असणारे शब्द

■ पुल्लिंगी - स्त्रीलिंगी ........ पुल्लिंगी - स्त्रीलिंगी 
…. बंधू - भगिनी ………..……. नातू - नात 
…. नर - नारी/मादी ………...… भाऊ - बहीण 
…. उंट - सांडणी ……………… पती - पत्नी 
…. गृहस्थ - गृहिणी …………… मोर - लांडोर 
…. राजा - राणी ………..……… वर - वधू 
…. पोपट - मैना …………..…… कवी - कवयित्री 
.... बाप - आई / माय ………..… पिता - माता 
.... जनक - जननी ……………. वाघ्या - मुरळी 
…. बोका - भाटी (मांजर) …….. रेडा / हेला - म्हैस 
.... पुत्र - कन्या ……………..… दीर - जाऊ 
.... खोंड - कालवड ………..….. बैल - गाय 
…. व्याही - विहीण …………… साधू - साध्वी 
.... मुलगा - सून …………….… विधुर - विधवा 
…. सासरा - सासू …………..… सुत - सुता 
…. एडका - मेंढी ……………... नवरा - बायको 
…. बोकड-शेळी …………….… दादा - वहिनी 
…. विधाता-विधात्री

2. स्वतंत्र - पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी एकच अर्थ असणारे शब्द

■ पुल्लिंगी --- स्त्रीलिंगी --- नपुंसकलिंगी 
…. रुमाल ----- पगडी ------- पागोटे 
….  ग्रंथ -------- पोथी ------- पुस्तक 
….  देह --------- काया ------ शरीर 
….  वाडा ------- इमारत ----- घर

(D) लिंगानूसार नामांच्या रूपांत सारखेच असणारे शब्द

1. सारखीच - पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असणारे शब्द

■ पुल्लिंगी - स्त्रीलिंगी …. पुल्लिंगी - स्त्रीलिंगी 
.... बाग - बाग …………….. ढेकर - ढेकर 
.... वेळ - वेळ ……………... वेल - वेल 
.... व्याधी - व्याधी ……….. मजा - मजा 
.... तंबाखू - तंबाखू ……..... संधी - संधी 
.... वीणा - वीणा ……….... वाणी - वाणी 
.... माळ - माळ .………….. हार - हार

2. सारखीच - पुल्लिंगी व नपुंसकलिंगी असणारे शब्द

■ पुल्लिंगी --------- नपुंसकलिंगी 
.... हरीण ------------- हरीण 
.... नेत्र --------------- नेत्र 
.... मास -------------- मांस

3. सारखीच - पुल्लिंगी, स्त्रीलिंगी व नपुंसकलिंगी असणारे शब्द

■ पुल्लिंगी ---- स्त्रीलिंगी ---- नपुंकलिंगी 
.... मूल --------- मूल ---------- मूल 
.... पोर ---------- पोर ---------- पोर

(E) लिंगानूसार नेहमी एकाच लिंगात असणारे शब्द

1. नेहमी - पुल्लिंगीच असणारे शब्द

■ खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग पुल्लिंगी मानतात. 
□ उदाहरण -: मासा, गरुड, पोपट, साप, टोळ, सुरवंट, कावळा इ. या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, कीटकांच्या नामाचा उल्लेख पुल्लिंगीच करतात.

2. नेहमी - स्त्रीलिंगीच असणारे शब्द

■ खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असले तरी त्यांचे लिंग स्रीलिंगी मानतात. 
□ उदाहरण -: घार, सुसर, घूस, ऊ, पिसू, जळू, मैना इ. या प्राण्यांच्या / पक्ष्यांच्या / कीटकांच्या नामांचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगीचचळ  करतात.

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव