प्रकरणचे नाव - केवलप्रयोगी अव्यय

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - केवलप्रयोगी अव्यय

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) केवलप्रयोगी अव्ययाची व्याख्या

1. केवलप्रयोगी अव्यय म्हणजे काय?

■ आपल्या मनातील अचानक निर्माण होणाऱ्यां भावना ज्या शब्दाने व्यक्त करतात, त्याला केवलप्रयोगी अव्यय / उद्गारार्थी अव्यय असे म्हणतात.
□ खालील वाक्ये पाहा.
१. अरेरे! सचिन तेंडुलकर आऊट झाला!
२. शाब्बास! आरोही, चांगले यश मिळविलेस!
३. अबब! केवढी गर्दी ही!
४. बाप रे! तो पाहा वाघ!
○ वरील वाक्यांमध्ये आपल्या मनात दाटून आलेल्या भावनांचा स्फोट व्यक्त झाला आहे. अरेरे!, अबब!, शाब्बास!, बाप रे! अशा अव्ययांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
□ हे उद्‌गार दाखविणारे शब्द वाक्यांच्या आरंभी येतात. ते वाक्याचा भाग नसतात. ते स्वतंत्र उद्गार असतात, हे शब्द वाक्याच्या बाहेर असतात. .
□ केवलप्रयोगी अव्ययाचा वाक्याशी काही संबंध नसतो.
□ उद्गारवाची अव्ययापुडे नेहमी उद्गारवाचक चिन्ह हवे.
□ केवलप्रयोगी अव्यये ही वाक्याच्या आरंभी येतातभावना व्यक्त करतात.

(B) भावना व्यक्त करणारे केवलप्रयोगी अव्यय

1. हर्षदर्शक केवलप्रयोगी अव्यय

■ हर्षदर्शक अव्यय दर्शविणारे - शब्द
वा, वावा, अहा, आहा, ओहो, आ-हा, अहाहा, आम्हा इ.

2. शोकदर्शक - केवलप्रयोगी अव्यय

■ शोकदर्शक अव्यय दर्शविणारे - शब्द
ऊं, अरेरे, अयाई, अगाई, हायहाय, हाय, शिव-शिव, हरहर, देवा रे, रामा रे, आई गं, अं इ‌.

3. आश्चर्यदर्शक - केवलप्रयोगी अव्यय

■ आश्चर्यदर्शक अव्यय दर्शविणारे - शब्द
ऑ, ओहो, अबब, बापरे, अहाहा, अरेच्चा, ओ, अय्या, अगं बाई इ.

4. प्रशंसादर्शक - केवलप्रयोगी अव्यय

■ प्रशंसादर्शक अव्यय दर्शविणारे - शब्द
शाब्बास, भले, वाहवा, छान, ठीक, फक्कड, खासच, भारी!, यंव, खाशी इ.

5. संमतिदर्शक - केवलप्रयोगी अव्यय

■ संमतिदर्शक अव्यय दर्शविणारे - शब्द
हां, ठीक, बराय, हाँ, अच्छा, जीहां, जी, हा इ.

6. विरोधदर्शक - केवलप्रयोगी अव्यय

■ विरोधदर्शक अव्यय दर्शविणारे - शब्द
छे, छ्ट्, हॅट, ऊः, उंहू. अंहं, छे-छे, च्, अहे, च्-च्, उं इ.

7. तिरस्कारदर्शक - केवलप्रयोगी अव्यय

■ तिरस्कारदर्शक अव्यय दर्शविणारे - शब्द
धिक् , थुः, शी!, हुडुत, हुड, फुस्‌, हट्, छी, इश्श, हुडत, हत्, छत् इ.

8. संबोधनदर्शक - केवलप्रयोगी अव्यय

■ संबोधनदर्शक अव्यय दर्शविणारे - शब्द
अगे, अगं, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे इ.

9. मौनदर्शक - केवलप्रयोगी अव्यय

■ मौनदर्शक अव्यय दर्शविणारे - शब्द
चुप, चिप, गप, चुपचाप, गुपचूप इ.

(C) भावना व्यक्त नकरणारे केवलप्रयोगी अव्यय

1. व्यर्थ - केवलप्रयोगी अव्यय

■ जी उद्‌गारवाची अव्यये कोणताही भाव व्यक्त करत नाहीत, तसेच त्यांच्या वापराने वाक्याच्या अर्थावर कोणताही परिणाम होत नाही. अशा शब्दांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय म्हणतात.
□ व्यर्थ अव्यय दर्शविणारे - शब्द
○ बापडा, वेडे, म्हणे, आपला, बेटे, बरीक, घ्या, मग, आणखीन इ.
□ उदाहरणार्थ
१. पण मन बेटे स्वस्थ राहीना.
२. मी आपला काय बोलणार?
३. मी बापडा काय बोलणार!
४. काल म्हणे मुलांनी गडबड केली.
५. काय चाललय मग!

2. पादपूरणार्थक - केवलप्रयोगी अव्यय

■ जी शब्द कोणतीही भावना व्यक्त करीत नाहीत, बोलताना लकब (आठवेनासे झाले) म्हणून किंवा उगीचच पुन:पुन्हा आलेल्या शब्दांना पादपूरणार्थक केवलप्रयोगी अव्यय म्हणतात.
□ म्हणजे काही व्यक्तींच्या बोलण्यात पालुपदासारखे काही शब्द पुनःपुन्हा येताना आढळतात. अशा शब्दांना पादपूरणार्थक केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
□ पादपूरणार्थक अव्यय दर्शविणारे - शब्द
बरं का, आत्ता, जळलं मेलं, कळलं इतक, जेहेत्ते, बरीक , आणखीन इ.
□ उदाहरणार्थ
१. राधाबाई सखाराम पंताशी बोलत आहे बरं का!
२. गाडी केव्हांची गेली काय उपयोग आत्ता जाऊन!

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव