प्रकरणचे नाव - वचन विच्चार

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - वचन विच्चार

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) मराठीतील वचनाची उजळणी

1. वचन म्हणजे काय?

■ नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो, त्याला वचन असे म्हणतात. 
वचन म्हणजे संख्या होय. 
मराठीत वचनाचे दोन प्रकार पडतात. 
○ 1. एकवचन  
○ 2. अनेकवचन  
संस्कृतमध्ये वचनाचे तीन प्रकार पडतात. 
○ १. एकवचन  
○ २. द्विवचन  
○ ३. अनेकवचन

2. वचनाचे प्रकार व उजळणी

एकवचन - म्हणजे काय?
□ जेव्हा नामाच्या रूपावरून एका वस्तूचा बोध होतो, त्यास “एकवचन” म्हणतात. 
○ उदा. मुलगा, गाय, झाड, पुस्तक, इमारत..... 

अनेकवचन - म्हणजे काय?
□ जेव्हा नामाच्या रूपावरून अनेक वस्तूचा बोध होतो, त्यास “अनेकवचन” म्हणतात. 
○ उदा. मुले, घरे, पुस्तके, पराती......
○ नामाच्या रूपावरून जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो, तेव्हा त्याचे “अनेकवचन” असते. 
○ अनेकवचनाला “बहुवचन” असेही म्हणतात.

3. वचनासंबंधी काही महत्त्वाचे नियम

■ नामांच्या तीन प्रकारांपैकी फक्त “सामान्यनामाचेच” अनेकवचन होते
विशेषनामांचीभाववाचक नामांची अनेकवचने होत नाहीत
□ पदार्थवाचक, भाववाचक तसेच विशेषनामाचे शक्‍यतो अनेकवचन होत नाही. 
विशेषनाम हे एकाच व्यक्तीचे नाम असते. त्यामुळे त्याचे अनेकवचन होत नाही. 
भाववाचक नामे ही गुणधर्मांना दिलेली नामे असल्यामुळे गुणधर्म हे सर्वत्र एकच असतात, म्हणून भाववाचक नामे एकवचनी असतात. 
विशेषनामेभाववाचकनामांची अनेकवचने झाल्यास ती सामान्यनामे म्हणूनच मानली जातात. 
□ विशेषनामाचे व भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही. त्यांचे जर अनेकवचन केले तर ते सामान्यनाम होते.
आपण, कोण, काय या सर्वनामांचा वापर एकवचनीअनेकवचनी अशा दोन्ही प्रकारे होऊ शकतो. 
□ नामाच्या वचनाचा क्रियापदावरही परिणाम होतो. 
□ आकारान्त विशेषणावर नामाच्या वचनाचा परिणाम होतो.

(B) वचनानूसार नामांच्या रूपांत होणारा बदल

1. पुल्लिंगी नामांच्या रूपांत वचनानूसार होणारा बदल

■ नियम 1 -: "आ-कारान्त" पुल्लिंगी नामाचे अनेकवचन "ए-कारान्त" होते. 
□ एकवचन - अनेकवचन ....... एकवचन - अनेकवचन
.......... कुत्रा - कुत्रे ...................… वडा - वडे 
........... ससा - ससे ..................... आरसा - आरसे 
.......... आंबा - आंबे .................... मासा - मासे 
........... घोडा - घोडे ..................... डबा - डबे
........... स्स्ता - सस्ते .................... झरा - झरे 
........... वाडा - वाडे ..................... दांडा - दांडे
........... ओढा - ओढे ................... पंखा - पंखे 
.......... अनारसा - अनारसे ........... बोका - बोके
........... राजा - राजे .................... मुलगा - मुलगे
........... पेढा - पेढे ...................... फळा - फळे
........... कावळा - कावळे ............. लांडगा - लांडगे
........... रेडा - रेडे ....................... मळा - मळे
........... दिवा - दिवे .................... कोल्हा - कोल्हे

2. स्त्रीलिंगी नामांच्या रूपांत वचनानूसार होणारा बदल

■ नियम 1 -: काही "अ-कारान्त" स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन "आ-कारान्त" होते, तर काहींचे "ई-कारान्त" होते. 
□ एकवचन - अनेकवचन ....... एकवचन - अनेकवचन
.......... वीट - विटा ......................... चूक - चुका 
.......... वेळ - वेळा ......................... भिंत - भिंती 
.......... तारीख - तारखा .................. विहीर - विहिरी 
.......... म्हैस - म्हशी ........................ सून - सुना 
.......... खारीक - खारका ................ बहिण - बहिणी
.......... काच - काचा ....................... गार - गारा
.......... वाट - वाटा .......................... शीर - शिरा
.......... वात - वाती ......................... चिंच - चिंचा
.......... माळ - माळा ....................... पाल - पाली

■ नियम 2 -: “” नंतर “” आल्यास उच्चारात “” चा लोप होतो. 
□ एकवचन - अनेकवचन 
........... गाय - (गायी) - गाई
............ सोय - (सोयी)- सोई

■ नियम 3 -: "ऊ-कारान्त" स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन "वा-कारान्त" होते. 
□ एकवचन - अनेकवचन 
.......... सासू - सासवा 
.......... जाऊ - जावा 
.......... पिसू - पिसवा 
.......... जळू - जळवा 
............. ऊ - उवा

■ नियम 4 -: "ओ-कारान्त" स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन "आ-कारान्त" होते. 
□ एकवचन - अनेकवचन
....... बायको - बायका

■ नियम 5 -: "ई-कारान्त" स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन "या-कारान्त" होते.
□ एकवचन - अनेकवचन ....... एकवचन - अनेकवचन
.......... नदी - नद्या ...................... पणती - पणत्या 
.......... काठी - काठ्या ................ टाचणी - टाचण्या 
.......... नळी - नळ्या .................. चांदणी - चांदण्या 
.......... भाकरी - भाकऱ्या ......…... बी - बिया 
.......... लेखणी - लेखण्या ........…. स्त्री - स्त्रिया 
.......... बाई - बाया ..................... गाडी - गाड्या 
.......... साडी - साड्या ................ वाडी - वाड्या
.......... वेणी - वेण्या ................... वही - वह्या
.......... बाटली - बाटल्या ............. सुरी - सुऱ्या

3. नपुंसकलिंगी नामांच्या रूपांत वचनानूसार होणारा बदल

■ नियम 1 -: "अ-कारान्त" नपुंसक लिंगी नामाचे अनेकवचन "ए-कारान्त" होते. 
□ एकवचन - अनेकवचन ....... एकवचन - अनेकवचन
.......... घर -घरे ......................... पुस्तक - पुस्तके
.......... फूल - फुले .................... घड्याळ - घड्याळे 
.......... शेत - शेते ...................... दार - दारे 
.......... झाड - झाडे ................... मंडळ - मंडळे
.......... फळ - फळे .................... चित्र - चित्रे
.......... माणूस - माणसे .............. पान - पाने

■ नियम 2 -: "ई-कारान्त" व "उ-कारान्त" नामांची अनेक वचने होताना बऱ्याचदा " य, व " हे आदेश होऊन अनेक वचन तयार होते. 
□ एकवचन - अनेकवचन 
.......... मोती - मोते / मोत्ये  
.......... मिरी - मिरे / मिऱ्ये

■ नियम 3 -: "उ/ऊ-कारान्त" नपुंसक लिंगी नामाचे अनेकवचन "ए-कारान्त" होते. 
□ एकवचन-अनेकवचन
.......... लिंबू -लिंबे 
.......... तट्टू - तट्टे 
.......... वासरू - वासरे 
.......... पाखरू - पाझो 
.......... पिलू - पिले 
.......... गळू - गळवे
.......... आसू - आसरे

■ नियम 4 -: "ए-कारान्त" नपुंसक लिंगी नामाचे अनेकवचन "ई-कारान्त" होते. 
□ एकवचन - अनेकवचन ....... एकवचन - अनेकवचन
.......... केळे - केळी ....................... कुत्रे - कुत्री 
.......... रताळे - रताळी ................... तळे - तळी 
.......... लाटणे - लाटणी .................. मडके - मडकी
.......... गाणे - गाणी ....................... खेडे - खेडी 
.......... नाणे - नाणी ...…………….. दाडके - दोडकी

(C) नेहमी दोन्ही वचनात सारखीच असणारे शब्द

1. पुल्लिंगी नामाचे दोन्ही वचनात सारखीच असणारे शब्द

■ नियम 1 -: "आ-कारान्त" शिवाय इतर पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनांत सारखीच असतात. 
□ एकवचन - अनेकवचन ....... एकवचन - अनेकवचन
............ देव - देव ......................... खडू - खडू 
............ कवी - कवी .................... उंदीर - उंदीर 
............ शत्रू - शत्रू ....................... लाडू - लाडू 
............ फोनो- फोनो ................... तेली - तेली
............ गहू - गहू ........................ फोटो - फोटो 
............ मनुष्य - मनुष्य ................ बैल - बैल 
............ वाघ - वाघ ..................... राक्षस - राक्षस 
............ दगड - दगड ................... पर्वत - पर्वत 
............ साप - साप ..................... गरुड - गरुड 
............ पक्षी - पक्षी ..................... हत्ती - हत्ती 
............ गुरू - गुरू ....................... माळी - माळी
............ कागद - कागद ............... मध - मध
............ चिकू - चिकू .................... रुमाल - रुमाल
............ साधू - साधू ..................... दिवस - दिवस
............ टाहो - टाहो ..................... नातू - नातू

2. स्त्रीलिंगी नामाचे दोन्ही वचनात सारखीच असणारे शब्द

■ नियम 1 -: "आ, ई, ऊ - कारान्त" स्त्रीलिंगी नामे दोन्ही वचनात सारखीच असतात. 
□ एकवचन - अनेकवचन ....... एकवचन - अनेकवचन
............ भाषा - भाषा ................... पूजा - पूजा 
............ दिशा - दिशा .................... सभा - सभा 
............ आज्ञा - आज्ञा .................. विद्या - विद्या 
............ माता - माता .................... गती - गती 
............ धनू - धेनू ........................ आशा - आशा
............ वीणा - वीणा ................... कन्या - कन्या
............ कला - कला .................... माला - माला
............ व्याख्या - व्याख्या ............. माया - माया
............ इच्छा - इच्छा ................... निंदा - निंदा
............ विधवा - विधवा ................ वधु - वधु
............ दासी - दासी..................... देवी - देवी
............ लेणी - लेणी. ................... बालिका - बालिका
............ मैना - मैना ....................... घंटा - घंटा
............ शिक्षिका - शिक्षिका ........... नारी - नारी
............ गालिचा - गालिचा ............. वाळू - वाळू
............ वस्तू - वस्तू ...................... बाजू - बाजू

3. नपुंसकलिंगी नामाचे दोन्ही वचनात सारखीच असणारे शब्द

■ नियम 1 -: "ई, उ, ऊ - कारान्त" नपुंसकलिंगी नामे दोन्ही वचनात सारखीच असतात. 
□ एकवचन - अनेकवचन ....... एकवचन - अनेकवचन
............ सोने - सोने ...................... रुपे - रुपे 
............ पाणी - पाणी ................... लोणी - लोणी
............ दही - दही ........................ अस्थी - अस्थी
............ दासी - दासी ..................... दृष्टी - दृष्टी
............ वळू - वळू ........................ वस्तू - क्स्तू
............ बाजू - बाजू ...................... लाली - लाली
............ युवती - युवती ................... तरुणी - तरुणी
............ तांबे - तांबे ........................ शिसे - शिसे

(D) नेहमी एकाच वचनात असणारे शब्द

1. नेहमी - एकवचनच असणारे शब्द

■ काही शब्दांच्या अनेकत्वाचा बोध होत असला तरी ते एकवचनीच असतात.
... रात ........... सहस्त्र ........ लक्ष 
... ढीग ............ रास .......... जोडपे 
... पंचक ........ आठवण ..... डझन 
... समिती ....... मंडळ ......... सैन्य 
... कोटी .......... त्रिकुट

2. नेहमी - अनेकवचनच असणारे शब्द

■ काही नामे नेहमी अनेकवचनीच आढळतात.
... डोहाळे ......... कांजिण्या ........ शहारे
... रोमांच .......... चिपळ्या ........ आट्यापाट्या
... क्लेश ............. हाल

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव