प्रकरणचे नाव - सामान्यरूप

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - सामान्यरूप

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) मराठीतील सामान्यरूपची उजळणी व फरक

1. सामान्यरूप म्हणजे काय?

नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो, त्याला सामान्यरूप असे म्हणतात.
○ पुढील वाक्य पाहा.
उदाहरण - शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली.
○ या वाक्यातील शिक्षक, सुरेश, वर्ग ही नामे जशीच्या तशी वाक्यात न ठेवता शिक्षकां-नी , सुरेश-ला, वर्गा-त असा त्यांच्या रूपात बदल केला आहे.
○ हे प्रत्यय लागताना शब्दांच्या मूळ रूपात बदल होतो. शिक्षक या शब्दाचे शिक्षकां, वर्ग या शब्दाचे वर्गा असे जे रूप होते त्याला सामान्यरूप असे म्हणतात.
○ नामाचे सामान्यरूप हे नामाच्या लिंगाप्रमाणेत्याच्या शेवटी असणाऱ्या स्वराप्रमाणे तयार होतात.

■ उदाहरणार्थ
झाड - मूळ शब्द
झाडाला - विभक्ती प्रत्ययान्त सामान्यरूप
झाडा - सामान्यरूप

■ उदाहरणार्थ
झाड - मूळ शब्द
झाडाखाली - शब्दयोगी अव्ययान्त सामान्यरूप
झाडा - सामान्यरूप

2. विभक्ती प्रत्येय व शब्दयोगी अव्यय यातील सामान्यरूप

■ 1. विभक्ती प्रत्ययान्त सामान्यरूप
विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप म्हणजेच शब्दाचे सामान्यरूप होय.
○ उदाहरण -: तळे - तळ्या, शिक्षकांनी, वर्गा इ.
□ विभक्तीप्रत्यय लागलेले शब्द व सामान्यरूप
○ उदाहरण -: तळ्या , शिक्षकांनी, वर्गा
सामान्यरूप - तळ्या , शिक्षकां , वर्गा
मुळ शब्द - तळे, शिक्षक, वर्ग

■ 2. शब्दयोगी अव्ययान्त सामान्यरूप
□ विभक्तीप्रत्यय लागण्यापूर्वी जसे शब्दाचे सामान्यरूप होते, तसेच शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी ही सामान्यरूप होते.
○ उदाहरण -: घराजवळ , तळ्यामध्ये , घोड्यासाठी
□ शब्दयोगी अव्यय लागलेले शब्द व सामान्यरूप
○ उदाहरण -: घराजवळ , तळ्यामध्ये , घोड्यासाठी इ.
सामान्यरूप - घरा, तळ्या, घोड्या
मुळ शब्द - घर, तळे, घोडा

(B) सामान्यरूपाचे नियम व उजळणी

1. पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप

नियम 1 - कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप कारान्त होते.
□ उदाहरण -: खां - खांबास, का - काळाने, वर्ग - वर्गात.

नियम 2 - कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप याकारान्त होते.
□ उदाहरण -: घोडा - घोड्याला, कोयता - कोयत्याने, दोरा - दोऱ्याचा.
○ (अपवाद - आजोबा, दादा, काका, मामा, नाना, चहा, इत्यादी.)

नियम 3 - कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप याकारान्त होते.
□ उदाहरण -: धोबी - धोन्याला, माळी - माळ्याचा.
○ (अपवाद - हत्ती, नंदी, कोबी, कवी, मुनी, कषी, इत्यादी.)

नियम 4 - कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप वाकारान्त होते.
□ उदाहरण -: भा - भावाने, विंचू - विंचवाने, नातू - नातवाचे.
○ (अपवाद - पेरू, चाकू, खडू, शत्रू, खेळाडू, पशू, गुरु, साधू)

नियम 5 - कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप कारान्तच राहते.
□ उदाहरण -: किलो - किलोस, धनको - धनकोचा, ऋणको - ऋणकोने.

2. स्त्रीलिंगी नामांचे सामान्यरूप

नियम 1 - कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात कारान्त व अनेकवचनात कारान्त होते.
□ उदाहरणार्थ
○ एकवचन - वी - विटेचा, जी - जिभेला.
○ अनेकवचन - वी - विटांचा, जी - जिभांनी.
● ( नियम अपवाद ) - काही कारान्त स्त्रीलिंगी नामांची सामान्यरूपे एकवचनात व अनेकवचनात कारान्त होतात.
□ उदाहरणार्थ
○ एकवचन - भिं - भिंतीला, विही विहिरीत.
○ अनेकवचन - भिं - भिंतीना, विही विहिरीमध्ये.

नियम 2 - कारान्त स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्यरूप कारान्त होते, तर अनेकवचनी नामाचे सामान्यरूप फक्त अनुस्वार देऊन होते.
□ उदाहरणार्थ
○ एकवचन - शाळा - शाळेत , भाषा - भाषेचा , माता - मातेला.
○ अनेकवचन - शाळा - शाळांचा, भाषा - भाषांचा, माता - मातांचा.

नियम 3 - कारान्त स्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात कारान्त व अनेकवचनात याकारान्त होते.
□ उदाहरणार्थ
○ एकवचन - नदी - नदीचा, पेटी - पेटीचा, खिडकी - खिडकीचा. (सामान्यरूप होत नाही.)
○ अनेकवचन - नदी - नद्यांचा, पेटी - पेट्यांचा, खिडकी - खिडक्यांचा.
○ (अपवाद - देवी, दासी, मूर्ती यासारखे)

नियम 4 - कारान्त स्त्रीलिंगी एकवचनी नामाचे सामान्यरूप कारान्त होते व अनेकवचनात वाकारान्त होते.
□ उदाहरणार्थ
○ एकवचन - जा - जावेला, पिसू - पिसवेला.
○ अनेकवचन - जा - जावांना, पिसू - पिसवांना.
○ (अपवाद - काकू, वधू, वस्तू)

नियम 5 - कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात होत नाही व अनेकवचनात कारान्त होते.
□ उदाहरणार्थ
○ एकवचन - बायको - बायकोला. (सामान्यरूप होत नाही.)
○ अनेकवचन - बायको - बायकांना.

3. नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप

नियम 1 - कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप कारान्त होते.
□ उदाहरण -: मू - मुलाने, पा - पानाचा, दुका - दुकानात, फू - फुलात.
○ अशा वेळी (शेवटून दुसरे अक्षर - दीर्घ असल्यास ऱ्हस्व होते.

नियम 2 - कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप याकारान्त होते.
□ उदाहरण -: पाणी - पाण्यात, दही - दद्याचा, लोणी - लोण्याचा.

नियम 3 - कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप कारान्त होते.
□ उदाहरण -: लिंबू - लिंबाचे, कोकरू - कोकराचे. 
● ( नियम अपवाद ) - काही कारान्त नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप वाकारान्त होते.
□ उदाहरण -: कुंकू - कुंकवाचा, गळू - गळवाचा, आसू - आसवाने.

नियम 4 - कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप याकारान्त होते.
□ उदाहरण -: तळे - तळ्यात, केळे - केळ्यांची, नाणे - नाण्यात.

4. विशेषणांचे सामान्यरूप

नियम 1 - कारान्त, कारान्त व कारान्त विशेषणांचे सामान्यरूप होत नाही.
□ उदाहरणार्थ
1) जगात गरीब माणसांना कोणी विचारीत नाही.
2) त्याचे लोकरी कपड्यांचे दुकान आहे.
□ (अपवाद - विकारी विशेषणांचे सामान्यरूप होते)
1. मला कडू कारल्याची भाजी आवडते.

नियम 2 - विभक्तिप्रत्यय लागलेल्या नामांच्या कारान्त विशेषणांचे सामान्यरूप याकारान्त होते.
□ उदाहरणार्थ
1) भल्या माणसाने.
2) वेड्या मुलीने.
3) खऱ्या गोष्टीस.

5. सर्वनामांचे सामान्यरूप

■ उदाहरणार्थ
1) मी - मला, माझे, माझ्या
2) आम्ही - आम्हाला, आमचे,आमच्या
3) तो - त्याला, त्याने, त्याचे
4) ते - त्यांना, त्यांनी, त्यांचे
5) ती - तिला, तिने, तिचे, तिच्या

6. सामान्यरूप केव्हा होत नाही? - नियम

नियम 1 - नामाच्याऐवजी एखादे अक्षर वापरले तर एक अक्षरी शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
□ उदाहरणार्थ
1) च्या घरी एक मोटार आहे.
2) ने ला मारले.

नियम 2 - व्यक्तींच्या विशेषनामांचे सामान्यरूप करत नाहीत.
□ उदाहरण -: राजीवने, कमलला इ.
अपवाद - पौराणिक / ऐतिहासिक व्यक्तींच्या नामांचा होते.
○ उदा. - रामाने, बाजीरावाने

नियम 3 - खालील शब्दांचे सामान्यरूप होत नाही.
□ उदाहरण -: आजोबा, दादा, काका, राजा, नाना, चहा, भटजी, हत्ती, नंदी, मुनी, ऋषी, पेरू, चाकू, खडू, शत्रू, खेळाडू, पशू इ.

नियम 4 - परकीय भाषेतील शब्दांचे सामान्यरूप बऱ्याचदा होत नाही.
□ उदाहरणार्थ
1) पर्समध्ये पैसे आहेत.
2) बसमध्ये तीस माणसे आहेत.

नियम 5 - सामान्यरूपात -काराचा -कार होतो.
□ उदाहरण -: ससा - सशाला, मासा - माशाचा.

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव