प्रकरणचे नाव - विभक्ती विच्चार

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - विभक्ती विच्चार

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) मराठीतील विभक्तीची उजळणी व फरक

1. विभक्ती म्हणजे काय? व विभक्तीचे प्रकार

■ 1. विभक्ती म्हणजे काय? 
□ वाक्‍यातील नाम किंवा सर्वनामांचा क्रियापदाशी असणारा संबंध ज्या विकारांनी दाखविला जातो, त्यास “विभक्ती” असे म्हणतात. 
□ नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.  
□ लिंग, वचन, विभक्तीमुळे नामाच्या मूळ रूपात विकार होते. 

■ विभक्तीचे एकूण आठ प्रकार 
□ नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध आठ प्रकारचा असतो.
□ म्हणजे व्याकरणामध्ये नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी येणारा संबंध आठ प्रकारचा असतो. 
○ म्हणून मराठीमध्ये आठ विभक्ती मानल्या जातात. 
१) प्रथमा ........ २) द्वितीया ...... ३) तृतीया 
४) चतुर्थी ........ ५) पंचमी ........ ६) षष्ठी 
७) सप्तमी ........८) संबोधन
○ आठव्या संबंधाच्या वेळी हाक मारली जाते, म्हणून त्याला “अष्टमी” असे म्हणता “संबोधन” असे नाव दिले आहे. 
संबोधन म्हणजे हाक मारणे, बोलावणे.

2. विभक्तीचे प्रत्यय व सामान्यरुप म्हणजे काय?

■ विभक्ती - प्रत्यय
नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यांस विभक्ती प्रत्यय असे म्हणतात.
□ नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीत रूपांतर करताना त्याला जी अक्षरे जोडली जातात, त्यास विभक्तीचे प्रत्यय असे म्हणतात. 
○ प्रत्ययांना स्वतंत्र अर्थ नसतो. तसेच ते स्वतंत्रपणे वापरले जात नाहीत. 
प्रत्यय नेहमी मूळ शब्दांना जोडूनच येतात. 
□ उदाहरण -: मुलास - , मुलाचा - चा, मुलाने - ने 
□ उदाहरणार्थ -: शेजारच्या मधूने रस्त्या कुत्र्याला काठीने मारले.
○ या वाक्यात " च्या, ने, त, ला " हे विभक्तीचे प्रत्यय होत. 

■ विभक्ती - सामान्यरूप
□ विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो, त्याला सामान्यरूप असे म्हणतात. 
□ उदाहरण -: 
○ रस्त्यात, कुत्र्याला → ही विभक्तीची रूपे 
○ सस्त्या, कुत्र्या → ही रस्ता व कुत्रा या नामांची सामान्यरूपे
□ उदाहरणार्थ 
○ फूल - मूळ शब्द
○ फुला - सामान्यरूप
○ फुलाचा - विभक्तीचे रूप ( चा - प्रत्यय )

3. विभक्तीचे कारकार्थ व उपपदार्थ म्हणजे काय?

■ विभक्ती - कारकार्थ 
नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध असतो, त्या संबंधाला “कारकार्थ” म्हणतात.
□ वाक्यात नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी जो संबंध असतो, त्याला "कारक संबंध" किंवा "कारकार्थ" किंवा "कारक विभक्ती" असे म्हणतात. 

■ विभक्ती - उपपदार्थ
□ वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामांचा क्रियापदाव्यतीरिक्त इतर शब्दांशी जो संबंध असतो त्याला “उपपदार्थ” असे म्हणतात. 
□ नाम व सर्वनाम यांचा क्रियापदाव्यतिरिक्त इतर शब्दांचा जो संबंध असतो, त्यास "उपपदार्थ" किंवा "उप-पद-अर्थ" किंवा "उपपदविभक्ती" असे म्हणतात. 

■ विभक्तीचे एकूण सहा कारकार्थ
नामाकडून होत असनारे एकूण सहा कारकार्थ 
१) कर्ता ........... २)कर्म 
३) करण (साधन) 
४) संप्रदान (एखादी वस्तू भेट देणे) 
५) अधिकरण (स्थळ / वेळ) 
६) अपादान (वियोग / दुरावा) 

■ वाक्यातील - कारकार्थ शोधणे
कारकार्थ शोधण्यासाठी खालीलप्रमाणे क्रियापदाला प्रश्‍न विचारावे लागतात.
□ उदाहरणार्थ
☆ सकाळी कमलने विमलचा परकर मशिनने शिवला.
1. क्रियापद - शिवला
2. क्रिया कोणी केली? - कमलने (कर्ता)
3. क्रिया केव्हा घडली ? - सकाळी (अधिकरण)
4. क्रियेचे साधन कोणते? - मशिनने (करण)
5. किया कशावर घडली.? - परकर (कर्म) -> संबंध (विमलचा)
विमल या नामाचा क्रियेशी कोणत्याच प्रकारे संबंध येत नाही. तर तो दुसर्‍या नामाशीच येतो; म्हणून येथे येणाऱ्या संबंधास उपपदार्थ म्हणतात.
उपपदार्थात एका नामाचा संबंध लगेच जवळच्या नामाशी असतो, तर कारकार्थामध्ये नामाचा संबंध क्रियापदाशी असतो
○ वाक्यात जी नामे क्रियापदाशी संबंध दर्शवितात तेथे कारकार्थ तयार होतो. तर क्रियापद सोडून इतर शब्दांच्या संबंधाने उपपदार्थ तयार होतात. 
○ कारकार्थामध्ये षष्ठीसंबोधन यांचा समावेश होत नाही, ते उपपदार्थ निर्माण करतात.

(B) विभक्तीचे एकूण आठ प्रकार व उजळणी

1. प्रथमा - विभक्ती

■ प्रथमा विभक्ती - उजळणी  
कर्ता, कर्म, अधिकरण ( स्थळ / वेळ ) हे दर्शविणाऱ्या नामांना प्रत्यय नसल्यास ते प्रथमेत असतात तर कारकार्थ कार्यावरून ठरतात.  
□ एखाद्या शब्दाच्या मूळ रूपाला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो, तेव्हा त्या शब्दाची विभक्ती प्रधमा असते.  
□ कर्ता, कर्म, परिमाण, अंतर, मूल्य हे दर्शविणाऱ्या नामांना प्रत्यय नसल्यास ते प्रथमेत असतात.  
○ ज्या एकवचनी व अनेकवचनी नामाला प्रत्यय नाही ते प्रथमेत मानावे.  
○ प्रथमा विभक्तीचा कारकार्थ "कर्ता" असतो. 

■ प्रथमा विभक्ती - Tricky नियम  
○ प्रथमा विभक्तीचे कारकार्थ → कर्ता 
○ प्रथमा विभक्तीचे एकवचणी प्रत्येय → नाही 
○ प्रथमा विभक्तीचे अनेकवचणी प्रत्येय → नाही 
○ विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय → नाही 

■ प्रथमा विभक्ती उदाहरणे
एकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फूल (प्रत्येय नाही) 
अनेकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुले (प्रत्येय नाही) 
१. मधू चार आठवडे क्रिकेट खेळला.  
मधू - कर्ता (प्रथमा) 
क्रिकेट - कर्म (प्रथमा) 
आठवडे - अधिकरण (प्रथमा)  
२. रावण राक्षस होता.  
रावण - कर्ता (प्रथमा) 
राक्षस - कर्म (प्रथमा)  
३. रामरावांनी पाच पोती धान्य पिकविले.  
→ पाच पोती - परिमाण (प्रथमा) (पाच हे विशेषण आहे.)  
४. मी चार मैल चालतो. 
मैल - अंतर (प्रथमा)  
५. दूध वीस रुपये लिटर मिळते.  
रुपये - मूल्य (प्रथमा)

2. द्वितीया - विभक्ती

■ द्वितीया विभक्ती - उजळणी  
□ वाक्यातील कर्माला (प्रत्यक्ष कर्माला) स, ला, तेस, ला, ना, ते ही प्रत्यये लागतात, तेव्हा त्यांची विभक्ती द्वितीया असते.  
□ कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल व कर्माला स, ला, ना, ते प्रत्यय असतील व दानाचा / भेटीचा संबंध नसेल तर कर्माची विभक्ती द्वितीया मानावी; परंतु कर्माला प्रत्यय नसल्याप्रथमा मानावी. कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाची विभक्ती द्वितीया नसते.  
□ द्वितीया विभक्तीचा कारकार्थ "कर्म" असले. 
□ द्वितीया विभक्तीला उपपदार्थ नाही.

■ द्वितीया विभक्ती - Tricky नियम  
○ द्वितीया विभक्तीचे कारकार्थ → कर्म 
○ द्वितीया विभक्तीचे एकवचणी प्रत्येय → स, ला, ते 
○ द्वितीया विभक्तीचे अनेकवचणी प्रत्येय → स, ला, ना, ते  
○ विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय → प्रत, लागी. 

■ द्वितीया विभक्ती प्रत्येययुक्त : उदाहरणे 
एकवचणी प्रत्येययुक्त शब्द → फुला, फुलाला 
अनेकवचणी प्रत्येययुक्त शब्द → फुलां, फुलांना 
१. पोलिसाने चोरा पकडले. - कर्म (द्वितीया) 
→ पोलिसाने चोर पकडला. - कर्म (प्रथमा)  
२. पोलिस चोरांना पकडतात.  
३. राजाने प्रधानाला बोलावले.  
४. मी शूराते वंदिले. 

■ द्वितीया विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय : उदाहरणे 
१. कृष्ण अर्जुनाप्रत (अर्जुनाला) बोलला.  
२. जिवालागी (जिवाला) घोर.

3. तृतीया - विभक्ती

■ तृतीया विभक्ती - उजळणी
□ क्रिया कोणत्या साधनाने केली, कोणी केली, कोठे झाली हे दर्शविणाऱ्या नामांना जर ने, ए, शी, नी प्रत्यय असतील तर विभक्ती तृतीया असते व कारकार्थ त्या नामाच्या वाक्यातील कार्यावरून ठरतात. 
□ रीत, निमित्त, न्यूनत्व, परिमाण, प्रमाण, सान्निध्य, कालावधी हे उपपदार्थ दर्शविण्यासाठीसुद्धा तृतीयेचे प्रत्येय वापरतात.
□ तृतीय विभक्तीचा कारकार्थ "करण" असते.
ज्या साधनाने क्रिया केली जाते, त्याला "करण" म्हणतात. 

■ तृतीया विभक्ती - Tricky नियम 
○ तृतीया विभक्तीचे कारकार्थ → करण (साधन)
○ तृतीया विभक्तीचे एकवचणी प्रत्येय → ने, ए, शी 
○ तृतीया विभक्तीचे अनेकवचणी प्रत्येय → नी, ही, शी, ई
○ विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय → कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे, सह, बरोबर, हाती. 

■ तृतीया विभक्ती प्रत्येययुक्त : उदाहरणे
एकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुलाने, फुलाशी
अनेकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुलांनी, फुलांशी
१. मुलाने चाकूने सफरचंद कापले. 
→ मुलाने - कर्ता (तृतीया),
→ चाकूने - (करण/साधन) तृतीया 
२. मी रस्त्याच्या कडेने गेलो. 
→ कडेने - (स्थळ / अधिकरण) तृतीया 
३. ती तोऱ्याने चालते. - (रीत) तृतीया 
४. घर पावसाने पडले. - (निमित्त) तृतीया 
५. तो कानाने बहिरा आहे. - (न्यूनत्व) तृतीया 
६. साखर किलोने मिळते. - (परिमाण) तृतीया 
७. ती चार इंचांनी कमी भरते. - (प्रमाण) तृतीया 
८. कुत्रा पायथ्याशी बसला. - (सान्निध्य) तृतीया 
९. काका चार वर्षांनी येतात. - (कालावधी) तृतीया 

■ तृतीया विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय : उदाहरणे
१. त्याच्याकडून (त्याच्याने) हे काम होणार नाही. 
२. वाऱ्यामुळे (वार्‍याने) कपडे वाळतात. 
३. ज्ञानयोगे (ज्ञानाने) व्यक्‍तीला महत्त्व आहे. 
४. मला मित्राद्वारा निरोप मिळाला. 
५. तो मला देवाप्रमाणे भेटला. 
६. सीता रामासह वनवासात गेली.

4. चतुर्थी - विभक्ती

■ चतुर्थी विभक्ती - उजळणी
कर्त्याचे स, ला, ना, ते प्रत्यय चतुर्थीचे असतात. दान घेणाऱ्या अप्रत्यक्ष कर्माचे स, ला, ना, ते प्रत्यय चतुर्थीचे असतात, तर कारकार्थ संप्रदान असतो. दान जाणारे प्रत्यक्ष कर्म प्रथमेत असते. याशिवाय साधन, दुरावा, स्थळ यांचे स, ला, ना, ते प्रत्यय चतुर्थीचे असतात व कारकार्थ त्या नामाच्या कार्यावरून ठरतात. 
□ उद्देश, परिमाण, मूल्य, विषय, स्वामित्व, योग्यता, नाते, वियोग हे उपपदार्थ दर्शविण्यासाठी चतुर्थी प्रत्यय वापरले जातात.
□ चतुर्थी विभक्‍तीचा कारकार्थ “संप्रदान” (दान करणे, देणे) असले.
प्रत्यक्ष कर्माला स, ला, ते ; स, ला, ना, ते हे प्रत्यय लागले तर ती द्वितीया विभक्ती असते.
प्रत्यक्ष कर्माव्यतिरिक्‍त स, ला, ते ; स, ला, ना, ते हे प्रत्यय लागले असतील तर ती चतुर्थी विभक्ती असते.

■ चतुर्थी विभक्ती - Tricky नियम 
○ चतुर्थी विभक्तीचे कारकार्थ → संप्रदान (दान/भेट)
○ चतुर्थी विभक्तीचे एकवचणी प्रत्येय → स, ला, ते
○ चतुर्थी विभक्तीचे अनेकवचणी प्रत्येय → स, ला, ना, ते
○ विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय → करिता, कडे, साठी, प्रत, बद्दल, प्रीत्यर्थ, ऐवजी, स्तव. 

■ चतुर्थी विभक्ती प्रत्येययुक्त : उदाहरणे
एकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुला, फुलाला
अनेकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुलां, फुलांना
१. दशरथाने कैकेयीला दोन वर दिले. - (अप्रत्यक्ष कर्म : संप्रदान) चतुर्थी 
२. मी खेळायला जातो. - (उद्देश/कर्ता) चतुर्थी 
३. नदी सागराला भेटते. - (स्थळ : अधिकरण) चतुर्थी 
४. काका पुण्या गेले. - (स्थळ : अधिकरण) चतुर्थी 
५. तो रेल्वे लटकून गेला. - (करण/ साधन) चतुर्थी 
६. त्याच्या डोळ्याला धार लागली. - (अपादान / वियोग ) चतुर्थी 
७. दुधासाठी लिटरला दहा रुपये पडतात. - (परिमाण) चतुर्थी 
८. चाराण्याला दोन गोळ्या मिळतात. - (मूल्य) चतुर्थी 
९. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बक्षीस दिले. 

■ चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय : उदाहरणे
१. मी भाचीकरिता (भाचीला) खेळणे घेतले. 
२. बाबांनी मधूसाठी (मधूला) शर्ट आणला.
३. शेठजीकडे खूप पैका आहे. 
४. मला संविधानाप्रत श्रदधा आहे.

5. पंचमी - विभक्ती

■ पंचमी विभक्ती - उजळणी
अंतर, तुलना, भेद दर्शविताना वापरलेले ऊन, हून प्रत्यय उपपदार्थ दर्शवितात व विभक्ती पंचमी असते. 
□ दुरावा दर्शविताना व साधन म्हणून वापरलेल्या नामाला जर ऊन, हून प्रत्यय असतील तर ते खालीलप्रमाणे कारकार्थ दर्शवितात. 
□ पंचमी विभक्तीचा कारकार्थ “अपादान” (वियोग होणे) असतो. 

■ पंचमी विभक्ती - Tricky नियम 
○ पंचमी विभक्तीचे कारकार्थ → अपादान (दुरावा/वियोग)
○ पंचमी विभक्तीचे एकवचणी प्रत्येय → ऊन, हून
○ पंचमी विभक्तीचे अनेकवचणी प्रत्येय → ऊन, हून
○ विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय → पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, कडून, वाचून. 

■ पंचमी विभक्ती प्रत्येययुक्त : उदाहरणे
एकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुलाहून
अनेकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुलांहून
१. साप बिळातून बाहेर गेला. - (अपादान/वियोग) पंचमी 
२. फक्त त्याच्या हातुन हे काम होऊ शकते. - (करण/साधन) पंचमी 
३. पुण्याहून मुंबई २१.० कि.मी. आहे. - (अंतर) पंचमी 
४. खेड्याहून शहर मोठे असते. - (तुलना) पंचमी 
५. घोड्याहून खेचर दिसायला वेगळे आहे. - (भेद) पंचमी 

■ पंचमी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय : उदाहरणे
१. गावापासून (एकवचनी पंचमी) 
२. पुण्यापेक्षा (पुण्याहून) मुंबई मोठी आहे. 
३. तो विचारल्याखेरीज (विचारल्याहून) बोलत नाही. 
४. मला पुस्तकाशिवाय करमत नाही.

6. षष्ठी - विभक्ती

■ षष्ठी विभक्ती - उजळणी 
षष्ठीचा संबंध क्रियापदाशी येत नसला तरी काही प्रसंगी कर्ता, करण, अपादान, अधिकरण दर्शविण्यासाठी षष्ठीचे प्रत्यय वापरतात.  
□ प्रयोजन, स्थित्यंतर, मूल्य, कार्य कारण, जनकत्व, मालकी, योग्यता , नाते, बाह्यवाहक, साकल्य - ह्या बाबी दर्शविण्यासाठी षष्ठीचे चा, ची, चे, च्या हे प्रत्यय वापरले जातात. 
□ षष्ठी विभक्तीचा कारकार्थ “संबंधी” (मालकी) असतो.  
□ कारकार्थ - संबंध (दोन शब्दांतील संबंध प्रत्यय याद्वारे दाखविला जातो.)  
□ सर्वनामांचे झा, झी, झे, झ्या प्रत्ययसुद्धा षष्ठीचे असतात.  
○ उदा. माझा सदरा, तुझे पुस्तक 

■ षष्ठी विभक्ती - Tricky नियम  
○ षष्ठी विभक्तीचे कारकार्थ → संबंध 
○ षष्ठी विभक्तीचे एकवचणी प्रत्येय → चा, ची, चे (झा, झी, झे) 
○ षष्ठी विभक्तीचे अनेकवचणी प्रत्येय → चे, च्या, ची (झे, झ्या, झी) 
○ विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय → विषयी, संबंधी. 

■ षष्ठी विभक्ती प्रत्येययुक्त : उदाहरणे 
एकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुलाचा, फुलाचे, फुलाची 
अनेकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुलांचे, फुलांची, फुलांच्या 
१. काकां"चे" खाऊन झाले. - (कर्ता) षष्ठी  
२. आमचा बस"चा" प्रवास संपला. - (करण/साधन) षष्ठी  
३. ससा हात"चा" निसटला. - (अपादान/दुरावा) षष्ठी  
४. जेवाय"ची" खोली बंद आहे. - (प्रयोजन) षष्ठी  
५. मी रुपयां"ची" भाजी आणली. - (मूल्य) षष्ठी  
६. ती मुला"ची" आई आहे. - (जनकत्व) षष्ठी  
७. तो रामू"चा" भाऊ आहे. - (नातेसंबंध) षष्ठी  
८. मा"झे" पुस्तक आहे.  
९. मा"झ्या" गाडीतून पुस्तक पोहोचते केले. 

■ षष्ठी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय : उदाहरणे 
१. मी कुत्र्याविषयी (कुत्र्याचा) निबंध वाचला.  
२. त्यासंबंधी (त्याची) चर्चा झाली नाही.

7. सप्तमी - विभक्ती

■ सप्तमी विभक्ती - उजळणी
स्थळ, वेळ, साधन दर्शविण्याऱ्या नामांना जोडलेले त, ई, आ प्रत्यय कारकार्थ दर्शवितात.
□ हेतू , विषय, सहितत्व, श्रेष्ठत्व दर्शविताना जोडलेले त, ई, आ. प्रत्यय उपपदार्थ दर्शविता.
□ सप्तमी विभक्तीचा कारकार्थ “अधिकरण (स्थान, काळ, वेळ, ठिकाण)” असते. 

■ सप्तमी विभक्ती - Tricky नियम 
○ सप्तमी विभक्तीचे कारकार्थ → अधिकरण (स्थळ / वेळ)
○ सप्तमी विभक्तीचे एकवचणी प्रत्येय → त, ई, आ
○ सप्तमी विभक्तीचे अनेकवचणी प्रत्येय → त, ई, आ
○ विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय → आत, मध्ये, ठायी, खाली, सभोवार, भोवती, ऐवजी. 

■ सप्तमी विभक्ती प्रत्येययुक्त : उदाहरणे
एकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुला
अनेकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुलां
१. मी सकाळी अभ्यास करतो. - (अधिकरण/वेळ) सप्तमी 
२. माझ्या घरा सात माणसे आहेत. - (अधिकरण/स्थळ) सप्तमी 
३. मी पायी शाळेत जातो. - (करण/साधन) सप्तमी 
४. दारूपायी त्याने घरदार विकले. - (हेतू) सप्तमी
५. तो इतिहासा कच्चा आहे. - (विषय) सप्तमी 
६. त्याने वाद्या ठेका धरला. - (सहितत्व) सप्तमी
७. त्याची बायको लाखा देखणी आहे. - (श्रेष्ठत्व) सप्तमी
८. गाई घरा आल्या. 

■ सप्तमी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय : उदाहरणे
१. माझ्या घरामध्ये (घरा) सहा माणसे आहेत. 
२. आम्ही क्रीडांगणावर खेळतो.

8. संबोधन - विभक्ती

■ संबोधन विभक्ती - उजळणी 
□ ज्या नामाने हाक मारली जाते त्याला संबोधन असे म्हणतात. 
□ संबोधनाला अनेकवचनात प्रत्यय लागतात.  
सर्वनामांना हाक मारता येत नाही, त्यामुळे त्यांची संबोधन विभक्ती होत नाही
□ संबोधन विभक्तीचा कारकार्थ “हाक” असते. 

■ संबोधन विभक्ती - Tricky नियम  
○ संबोधन विभक्तीचे कारकार्थ → हाक 
○ संबोधन विभक्तीचे एकवचणी प्रत्येय → प्रत्यय नाही 
○ संबोधन विभक्तीचे अनेकवचणी प्रत्येय → नो, ओ, ना, हो 
○ विभक्ती प्रतिरूपक शब्दयोग अव्यय → नाही 

■ संबोधन विभक्ती उदाहरणे 
एकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुला 
अनेकवचणी प्रत्यययुक्त शब्द → फुलांनो 
१. मुलां"नो" रांगत उभे रहा. - (अने.प्रत्येय)
२. लोकहो, तुम्ही सजग राहा ! - (अने.प्रत्येय) 
३. रामा पाणी आण. - (हाक) 
४. चिऊ, इकडेये ! - (हाक) 
५. राम, शाळेत जा ! - (हाक) 
६. देवा, परीक्षेत मला पास करा ! - (हाक)

# द्वितीया व चतुर्थी विभक्तीतील फरक

नियम 1 - वाक्यात एकच कर्म असेल तर तेच प्रत्यक्ष कर्म मानावे. काही लेखकांनी जर वाक्यात व्यक्तिरूपी एकच कर्म असेल व त्याला प्रत्यय असेल तर ते अप्रत्यक्ष कर्म माणले आहे; परंतु वाक्यात वस्तूरूपी किंवा व्यक्तीरूपी एकच कर्म असेल व त्याला प्रत्यय नसेल तर ती प्रथमा मानावी. प्रत्यय असल्यास मात्र द्वितीयाच मानावी.  
□ उदाहरणार्थ  
१. धोंडू "गाय" बांधतो. - कर्म (प्रथमा)  
२. धोंडू "गाईला" बांधतो. - कर्म (द्वितीया)  
३. राम "रावनाला" मारतो. - कर्म (द्वितीया) 

नियम 2 - वाक्‍य जर द्विकर्मक असेल तर दान जाणारे प्रत्यक्ष कर्म असते व त्याची विभक्ती प्रथमा असते, तर दान घेणारे कर्म अप्रत्यक्ष कर्म असून त्याची विभक्ती चतुर्थी असते.  
□ उदाहरणार्थ  
१. आजीने नातीला गोष्ट सांगितली.  
नातीला - अप्रत्यक्ष कर्म (चतुर्थी), गोष्ट - प्रत्यक्ष कर्म (प्रथमा) 

■ नियम 3 - स्थळ, माध्यम, साधन, कर्म नसते. दान / भेट याचा अर्थ वास्तविक अगर काल्पनिक वस्तूदान व्हावे लागते. एखाद्या ठिकाणची उपस्थिती किंवा स्थळाला दिलेली भेट. याचा अर्थ दान असा होत नाही.  
□ उदाहरणार्थ  
१. नदी सागराला भेटते.  
नदी - कर्ता (प्रथमा), सागराला - अधिकरण (चतुर्थी)
२. ओढा नदीला भेटतो.  
ओढा - कर्ता (प्रथमा), नदीला - अधिकरण (चतुर्थी)

☆ Trick : विभक्तीचे ( प्रत्येय )

प्रथमा --- प्रत्यय नाही
द्वितीया -- स, ला, ना, ते 
तृतीया --- ने, ए, शी / नी, ई, ही
चतुर्थी ---  स, ला, ना, ते 
पंचमी ---- ऊन, हून 
षष्ठी ----- चा, ची, चे, च्या (झा,झी,झे,झ्या)
सप्तमी --- त, ई, आ 
संबोधन -- हो, नो, ओ
■ trick : तपस - नेऊत (तृतीया,पंचमी,सप्तमी)

☆ Trick : विभक्तीचे ( कारकार्थ )

प्रथमा --- कर्ता
द्वितीया -- कर्म
तृतीया --- करण (साधन)
चतुर्थी --- संप्रदान (दान/भेट)
पंचमी --- अपादान (दुरावा)
षष्ठी ----- संबंध (मालकी)
सप्तमी -- अधिकरण (वेळ/ठिकाण)
संबोधन -- हाक मारणे
■ trick : तृतीया - सप्तमी (करण - अधिकरण) ई - प्रत्यय
□ चतुर्थी - पंचमी (संप्रदान - अपादान)

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव