प्रकरणचे नाव - काळ व काळाचे प्रकार

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - काळ व काळाचे प्रकार

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) काळ, काळाचे प्रकार व उजळणी

1. काळ म्हणजे काय?

■ वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो. तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो, त्याला काळ असे म्हणतात.
□ उदाहरणार्थ 
१) मी अभ्यास करतो
२) मी अभ्यास केला
३) मी अभ्यास करीन.

2. काळाचे मुख्य तीन प्रकार व उजळणी

■ काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात.
१) वर्तमानकाळ (घडत असणारी क्रिया)
२) भूतकाळ (घडलेली क्रिया)
३) भविष्यकाळ (घडणारी क्रिया)

■ 1. वर्तमानकाळ
□ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते,  तेव्हा तो वर्तमानकाळ असतो.
□ वाक्यातील क्रिया चालू असल्याचे दर्शविते तेव्हा तो वर्तमानकाळ काळ होय.
□ जेव्हा वाक्याच्या क्रियापदावरून क्रिया चालू आहे असे जेव्हा समजते तेव्हा क्रियापद “वर्तमानकाळ” असते.
○ उदा -: मी अभ्यास करतो

■ 2. भूतकाळ 
□ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते, तेव्हा तो भूतकाळ असतो. 
□ वाक्यातील क्रिया पूर्ण झाली असे भूतकाळ काळ दर्शविते.
□ जेव्हा वाक्याच्या क्रियापदावरून क्रिया पूर्वी झाली असे जेव्हा समजते तेव्हा क्रियापद “भूतकाळी” असते.
○ उदा -: मी अभ्यास केला

■ 3. भविष्यकाळ
□ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे जेव्हा कळते, तेव्हा तो भविष्यकाळ असतो. 
□ वाक्यातील क्रिया पुढे होईल असा बोध होतो तेव्हा भविष्यकाळ काळ होय ? 
□ जेव्हा वाक्याच्या क्रियापदावरून क्रिया पुढे व्हायची आहे असे जेव्हा समजते तेव्हा “भविष्यकाळ” असतो.
○ उदा -: मी अभ्यास करीन.

3. काळाचे एकूण उपप्रकार

■ काळाचे एकूण उपप्रकार बारा आहेत.
उपप्रकार ह्या चार भागात विभागले आहे.
१) साधा काळ 
२) चालू / अपूर्ण काळ
३) पूर्ण काळ 
४) रीती काळ 

■ काळाचे एकूण उपप्रकार व बोध दर्शवतात.
१) साधा काळ : क्रिया सध्या घडते.
२) चालू / अपूर्ण काळ : क्रिया पूर्ण नाही.
३) पूर्ण काळ : क्रिया नुकतीच पूर्ण झाली
४) रीती काळ : सवय / रीत दाखविणे

■ वर्तमानकाळ / भूतकाळ / भविष्यकाळ
१) साधा वर्तमानकाळ / भूतकाळ / भविष्यकाळ 
२) चालू वर्तमानकाळ / भूतकाळ / भविष्यकाळ 
३) पूर्ण वर्तमानकाळ / भूतकाळ / भविष्यकाळ 
४) रीती वर्तमानकाळ / भूतकाळ / भविष्यकाळ

4. काळाचे प्रकार ओळखण्याची trick (ट्रिक)

■ काळाचे मुख्य प्रकार ओळखण्याची trick
□ वर्तमान काळ : वाक्यातील क्रिया चालू आहे, असे दर्शविते. 
□ भूतकाळ : वाक्यातील क्रिया पूर्ण झाली, असे दर्शविते.
□ भविष्य काळ : वाक्यातील क्रिया पुढे होईल, असे दर्शविते. 

■ काळाचे उपप्रकार ओळखण्याची trick
□ वाक्यात एकच क्रियापद असणे. ( फक्त मुख्य क्रियापद )
१) साधा काळ असतो.
□ वाक्यात दोन क्रियापद असणे. ( संयुक्त क्रियापद ) खालील तिन्ही काळापैकी एक असते.
१) चालू / अपूर्ण काळ असेल.
२) पूर्ण काळ असेल.
३) रीती काळ असेल.

5. काळाचे आख्यात विकार व अर्थ

■ काळाचे आख्यात  
□ संस्कृतात क्रियापदाला “आख्यात” असे म्हणतात. 
क्रियापदांना म्हणजेच आख्यातांना "तो, ला, ई, ईल, ऊ, वा" वगैरे प्रत्यय लागून विविध काळअर्थ यांची रूपे तयार होतात. त्यांना आख्यात प्रत्यय असे म्हणतात. 
□ कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुष यानुसार विविध काळात क्रियापदाचे रूप बदलते. त्याचप्रमाणे क्रियापदाच्या अर्थानुसार क्रियापद बदलते. याला आख्यात विकार असे म्हणतात. 
□ आख्यात विकार एकूण सात आहेत. यात चार काळतीन अर्थ आहेत.

☆ क्रियापद आधारित - चार काळाचे आख्यात विकार

■ 1. वर्तमानकाळ  
□ आख्यात →तो - आख्यात / प्रथम → ता-आख्यात 
□  उदाहरण -: बसतो, पळतो, करतो……..

■ 2. भूतकाळ  
□ आख्यात → ला - आख्यात  
□  उदाहरण -: बसला, पळाला, केला…….

■ 3. भविष्यकाळ  
□ आख्यात -> ईल - आख्यात 
□  उदाहरण -: बसेल , पळेल, करेल……

■ 4. रीति भूतकाळ 
□ आख्यात -> ई - आख्यात 
□  उदाहरण -: बसे, पळे ( = अ + ), करी…..

☆ क्रियापद आधारित - तीन अर्थचे आख्यात विकार

■ 1. संकेतार्थ  
□ आख्यात → द्वितीय→ ता - आख्यात 
□  उदाहरण -: बसता, पळता, करता……….

■ 2. विध्यर्थ  
□ आख्यात → वा - आख्यात 
□  उदाहरण -: बसावा, पळावा, करावा…….

■ 3. आज्ञार्थ   
□ आख्यात → ऊ - आख्यात 
□  उदाहरण -: बसू, पळू, करू…….

(B) काळाचे उपप्रकार व उजळणी

1. साधा काळ - ओळखण्याची ट्रिक व उजळणी

■ साधा काळ - ओळखण्याची trick 
□ वाक्यात एकच क्रियापद असणे. ( फक्त मुख्य क्रियापद )
□ शेवटी क्रियापदाला हे प्रत्येय पाहणे.
साधा वर्तमान काळ → ता/ती/ते/तो 
साधा भूतकाळ → ला/ली/ले/लो 
साधा भविष्यकाळ → ल, न
○ वाक्यात एकच क्रियापद असेल किंवा दोन स्वतंत्र वेगळे क्रियावाचक शब्द असतील तर हा साधा काळ असतो.
वर्तमान काळ : वाक्यातील क्रिया चालू आहे, असे दर्शविते. 
भूतकाळ : वाक्यातील क्रिया पूर्ण झाली, असे दर्शविते.
भविष्य काळ : वाक्यातील क्रिया पुढे होईल, असे दर्शविते.
● उदाहरणार्थ 
१) तो पुस्तक वाचतो. (साधा वर्तमान काळ)
क्रियापद एकच → वाचतो
२) त्याने पुस्तक वाचले. (साधा भूतकाळ)
क्रियापद एकच → वाचले
३) तो पुस्तक वाचे. (साधा भविष्यकाळ)
क्रियापद एकच → वाचेल
वाक्याच्या शेवटी दोन क्रियावाचक शब्द असतील व दोन्ही शब्दांतून वेगवेगळ्या क्रिया दर्शविल्या असतील तर फक्त  शेवटच्या शब्दावरून काळ ओळखावा. अशा वाक्याचा कोणतातरी साधा काळ असतो.
३) बाळ पुस्तक फाडून फेकते. (साधा वर्तमानकाळ) 
१) आई मंदिरात जाऊन आली. (साधा भूतकाळ) 
२) मी पुण्याला जाऊन येईल. (साधा भविष्यकाळ) 

■ साधा वर्तमानकाळ
□ जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडत आहे असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ "साधा वर्तमानकाळ" असतो.
□ उदाहरणे
१.मी पत्र लिहितो
२. चिऊ धडा वाचते
३. मी पुस्तक वाचतो
□ ज्या वाक्यात "क्रियापद दिलेले नसते" तो शक्यतो साधा वर्तमान काळ असतो.
○ उदा. पाण्याचा उत्कलनांक 100°C आहे

■ साधा भूतकाळ
□  जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया नुकतीच घडली असा बोध होतो तेव्हा त्यास "साधा भूतकाळ" असे म्हणतात.
○ साध्या भूतकाळातून पूर्वी घडलेली क्रिया दर्शविली जाते.
□ उदाहरणे
१. मी पुस्तक वाचले
२. मी पत्र लिहिले
३. महाराज शौर्याने लढले
४. तिने गृहपाठ केला
५. तो शाळेत गेला

■ साधा भविष्यकाळ
□  जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यात घडेल इतकाच बोध होतो, तेव्हा त्यास "साधा भविष्यकाळ" असे म्हणतात.
भविष्यात घडणारी क्रिया दर्शविण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. 
□ उदाहरणे
१. मी पुस्तक वाचे 
२. मी पत्र लिही
३. पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाई
४. आई घरात असे
५. बाबा झोपले असती
६. सर्वच नापास कसे असती
७. सगळेच कसे बुडती?
८. आज पाऊस पडे

2. चालू / अपूर्ण काळ - ओळखण्याची ट्रिक व उजळणी

■ चालू / अपूर्ण काळ - ओळखण्याची trick 
□ वाक्यात दोन क्रियापद असणे. ( संयुक्त क्रियापद )
□ शेवटी क्रियापदाला हे प्रत्येय पाहणे.
○ चालू / अपूर्ण वर्तमान काळ → त + आहे / आहेत
○ चालू / अपूर्ण भूतकाळ → त + होता / होती / होते
○ चालू / अपूर्ण भविष्यकाळ → त + असेन / असेल / असतील
● उदाहरणार्थ 
१) मी पुस्तक वाचत आहे. (चालू/अपूर्ण वर्तमान काळ)
क्रियापद दोन → वाचत आहे
२) मी पुस्तक वाचत होतो. (चालू/अपूर्ण भूतकाळ)
क्रियापद दोन → वाचत होतो
३) मी पुस्तक वाचत असेन. (चालू/अपूर्ण भविष्यकाळ)
क्रियापद दोन → वाचत असेन 

■ चालू / अपूर्ण वर्तमानकाळ 
□ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानामध्ये चालू असण्याचा बोध होतो, तेव्हा वाक्याचा काळ "चालू / अपूर्ण वर्तमानकाळ" असतो.
○ एखादी क्रिया चालू आहे हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. 
□ उदाहरणे
१) तो मुलगा खेळत आहे
२) मी पुस्तक वाचत आहे
३) माळी झाडांना पाणी देत आहे
४) आई स्वयंपाक करत आहे
५) बाबा जेवत आहेत

■ चालू / अपूर्ण भूतकाळ 
□ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळात चालू असण्याचा बोध होतो, तेव्हा वाक्याचा काळ "चालू / अपूर्ण भूतकाळ" असतो.
○ भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. 
□ उदाहरणे
१. मी पुस्तक वाचत होतो
२. मी पत्र लिहीत होतो
३. तो मुलगा खेळत होता
४. आई स्वयंपाक करत होती
५. तो वाचत होता

■ चालू / अपर्णू भविष्यकाळ 
□ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यात चालू असण्याचा बोध होतो, तेव्हा वाक्याचा काळ "चालू / अपूर्ण भविष्यकाळ" असतो.
○ एखादी क्रिया चालू असेल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात.
□ उदाहरणे
१. मी पुस्तक वाचत असेन
२. मी पत्र लिहीत असेन
३. तो जेवण करत असेन
४. ती खेळत असेल
५. तो बोलत असेल.

3. पूर्ण काळ - ओळखण्याची ट्रिक व उजळणी

■ पूर्ण काळ - ओळखण्याची trick 
□ वाक्यात दोन क्रियापद असणे. ( संयुक्त क्रियापद )
□ शेवटी क्रियापदाला हे प्रत्येय पाहणे.
○ पूर्ण वर्तमान काळ → ला/ली/ले + आहे / आहेत
○ पूर्ण भूतकाळ → ला/ली/ले + होता / होती / होते
○ पूर्ण भविष्यकाळ → ला/ली/ले + असेन / असेल / असतील
● उदाहरणे
१) मी पुस्तक वाचले आहे. (पूर्ण वर्तमान काळ)
क्रियापद दोन → वाचले आहे
२) मी पुस्तक वाचले होते. (पूर्ण भूतकाळ)
क्रियापद दोन → वाचले होते
३) मी पुस्तक वाचले असेन. (पूर्ण भविष्यकाळ)
क्रियापद दोन → वाचले असेन 

■ पूर्ण वर्तमानकाळ
□ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया नुकतीच पूर्ण झाल्याचा बोध होतो, तेव्हा वाक्याचा काळ "पूर्ण वर्तमानकाळ" असतो.
नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात.
□ उदाहरणे
१. तो मुलगा खेळला आहे
२. मी पुस्तक वाचले आहे
३. माळीने झाडांना पाणी दिले आहे
४. मुलाने पुस्तक वाचले आहे
५. ताईने निबंध लिहिला आहे

■ पूर्ण भूतकाळ
□ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळात पूर्ण झाल्याचा बोध होतो, तेव्हा वाक्याचा काळ "पूर्ण भूतकाळ" असतो.
भूतकाळात एखादी क्रिया घडून गेली होती, हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात.
□ उदाहरणे
१. मी पुस्तक वाचले होते
२. मी पत्र लिहिले होते.
३. तो मुलगा खेळला होता
४. त्याने निबंध लिहिला होता
५. ती जेवली होती

■ पूर्ण भविष्यकाळ
□ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यात पूर्ण झाल्याचा बोध होतो, तेव्हा वाक्याचा काळ "पूर्ण भविष्यकाळ" असतो.
भविष्यात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. 
□ उदाहरणे
१. मी पुस्तक वाचले असेन.
२. मी पत्र लिहीले असेन
३. मी जेवण केले असेन
४. त्याने पुस्तक वाचले असेल
५. ती नाचली असेल.

4. रीती काळ - ओळखण्याची ट्रिक व उजळणी

■ रीती काळ - ओळखण्याची trick  
□ वाक्यात दोन क्रियापद असणे. ( संयुक्त क्रियापद
□ शेवटी क्रियापदाला हे प्रत्येय पाहणे. 
○ रीती वर्तमान काळ → त + असेतो / असते / असतात 
○ रीती भूतकाळ → त + असे / असू 
○ रीती भविष्यकाळ → त + राहील / जाईल / जातील / जाईन 
● उदाहरणे 
१) मी पुस्तक वाचत असतो. (रीती वर्तमान काळ
क्रियापद दोन → वाचत असतो 
२) मी पुस्तक वाचत असे. (रीती भूतकाळ
क्रियापद दोन → वाचत असे 
३) मी पुस्तक वाचत जाईन. (रीती भविष्यकाळ
क्रियापद दोन → वाचत जाईन

■ रीती वर्तमानकाळ 
□ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानात सतत घडत असल्याची सवय किंवा रीत दिसून येत असेल, तर त्या वाक्याचा काळ "रीती वर्तमानकाळ" असतो.
वर्तमानकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. ( पुनरावृत्ती - एखादी सतत घडणारी क्रिया) 
□ उदाहरणे 
१. तो मुलगा खेळत असतो.  
२. मी पुस्तक वाचत असतो
३. माळी झाडांना पाणी देत असतो
४. ती नाचत असते.  
५. तो नेहमीच उशिरा उठतो. (व्याख्या)

■ रिती भूतकाळ 
□ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भूतकाळात सतत घडत असल्याची सवय किंवा रीत दिसून येत असेल, तर त्या वाक्याचा काळ "रीती भूतकाळ" असतो. 
भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. 
□ उदाहरणे 
१. मी पुस्तक वाचत असे.  
२. मी पत्र लिहीत असे.  
३. तो मुलगा खेळत असे.  
४. मी नदीकाठी खेळत असे.  
५. तो खोटे बोलत असे.  
६. लहानपणी मी शेतात जाई. (व्याख्या)

■ रीती भविष्यकाळ 
□ जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया भविष्यात सतत घडत असल्याची सवय किंवा रीत दिसून येत असेल, तर त्या वाक्याचा काळ "रीती भविष्यकाळ" असतो. 
भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात.  
□ उदाहरणे 
१. मी पुस्तक वाचत जाईन.  
२. मी पत्र लिहीत जाईन.  
३. तो जेवण करीत जाईन
४. ती नाचत जाईल.  
५. मी वाचत जाईल.

■ हे लक्षात ठेवा.
सर्व १२ काळापैकी कोणत्याही साध्या काळाच्या वाक्यात “ दररोज, नेहमी, सदा, सतत, नियमीत, रोज, सदोदीत ” असे शब्द आले तर तो काळ रीती काळ असतो (साधा काळ नाही). 
□ उदाहरणार्थ 
१. मी दररोज अभ्यास करतो. (रीति वर्तमानकाळ) 
२. सदा सर्वदा योग तुझा घडावा. (रीति भविष्यकाळ)
३. मी नियमीत अभ्यास केला. (रीति भूतकाळ)

■ येथे गोंधळू नका 
□ काळाच्या बारा उपप्रकारापैकी साधा काळ सोडून इतर क्रियापदामध्ये संयुक्‍त क्रियापद असते, पण रिती भूतकाळामध्ये संयुक्‍त तसेच साधे क्रियापदही वापरता येते.
□ उदाहरणार्थ
१) मी रोज पुस्तक वाची. (वाचत असे - संयुक्‍त क्रियापद) 
२) आई शेतात काम करी. (करीत असे - संयुक्‍त क्रियापद)

5. एकत्रीत काळाचे एकूण उपप्रकार व ट्रिक

■ साधा काळ ओळखण्याची trick
□ वाक्यात एकच क्रियापद असणे. ( फक्त मुख्य क्रियापद )
□ शेवटी क्रियापदाला हे प्रत्येय पाहणे.
○ साधा वर्तमानकाळ → ता/ती/ते/तो (आहे, नाही)
○ साधा भूतकाळ → ला/ली/ले/लो (होता/होती/होते, नव्हता/नव्हती,नव्हते)
○ साधा भविष्यकाळ → ल, न (असेल, असेन, नसेल, नसेन, णारा, ईल,ईन,एल,एन)

■ चालू/अपूर्ण काळ ओळखण्याची trick
□ वाक्यात दोन क्रियापद असणे. ( संयुक्त क्रियापद )
□ शेवटी क्रियापदाला हे प्रत्येय पाहणे.
○ चालू/अपूर्ण वर्तमानकाळ → त + आहे / आहेत
○ चालू/अपूर्ण भूतकाळ → त + होता / होती / होते
○ चालू/अपूर्ण भविष्यकाळ → त + असेन / असेल / असतील (णारा)

■ पूर्ण काळ ओळखण्याची trick
□ वाक्यात दोन क्रियापद असणे. ( संयुक्त क्रियापद )
□ शेवटी क्रियापदाला हे प्रत्येय पाहणे.
○ पूर्ण वर्तमानकाळ → ला/ली/ले + आहे / आहेत
○ पूर्ण भूतकाळ → ला/ली/ले + होता / होती / होते
○ पूर्ण भविष्यकाळ → ला/ली/ले + असेन / असेल / असतील (णारा)

■ रीती काळ ओळखण्याची trick
□ वाक्यात दोन क्रियापद असणे. ( संयुक्त क्रियापद )
□ शेवटी क्रियापदाला हे प्रत्येय पाहणे.
○ रीती वर्तमानकाळ → त + असतो / असते / असतात
○ रीती भूतकाळ → त + असे / असू
○ रीती भविष्यकाळ → त + राहील / जाईल / जातील / जाईन (राहणार, जाणार)

(C) काळाचे उपयोग / वापर

1. वर्तमानकाळाचे उपयोग

त्रिकालबाधित सत्य (कधीही न बदलणारे), स्थिर सत्य किंवा वैज्ञानिक सत्य सांगण्यासाठी वर्तमानकाळाचा वापर होतो.  
१. पाणी १००° सें. ला उकळते. (वैज्ञानिक सत्य) 
२. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. (स्थिर सत्य)

ऐतिहासिक वर्तमानकाळ म्हणजेच एखादी भूतकाळामध्ये होऊन गेलेली घटना वर्तमानकाळात सांगणे.
१. गांधीजी देशवासियांना म्हणतात. 
२. श्रीकृष्ण अर्जूनाला म्हणतो. 
३. सुर्य पूर्वेला उगवतो.

सुविचार, म्हणी आपण नेहमी वर्तमानकाळात सांगतो. १. नेहमी खरे बोला. 
२. अक्षर हा सुंदर दागिना आहे.

अवतरणचिन्ह देण्यासाठी वर्तमानकाळाचा वापर करतात. 
१. दादाभाई नौरोजी म्हणत, "चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा."
२. समर्थ रामदास म्हणतात, "जगी सर्वसुखी असा कोण आहे?"

■ क्रिया भूतकाळात नेहमी घडते व ती आताही घडते तेव्हा वर्तमानकाळाचा वापर करतात.
१. मी दररोज सकाळी उठतो. (उठत असतो)

2. भूतकाळाचे उपयोग

क्रिया भूतकाळात घडली असे सांगताना 
१. राजुने पुण्याला फ्लॅट घेतला. 
२. तो काल गावी गेला.

वर्तमानकाळात एखादी क्रिया चालू आहे, पण ती संपण्याच्या बेतात आहे. हे दर्शवण्यासाठी भूतकाळ वापरतात. 
१. ती पहा आपली गाडी आली. (येत आहे) 
२. तो पहा तुझा मित्र आला. (येत आहे)

भविष्यकाळात खात्रीने एखादी क्रिया घडणार या अर्थाने वापरतात. (निःसंशय भविष्यकाळ व्यक्त होतो.) म्हणजेच नि:संशय भूतकाळातून एखादी क्रिया भविष्यकाळात खात्रीने होणार हे दर्शविण्यासाठी (अट व परिणाम) 
१. गृहपाठ पूर्ण कर, नाहीतर शिक्षा झालीच म्हणून समज
२. तुझे वर्तन सुधार, नाहीतर नोकरी गेलीच म्हणून समज.
३. चांगला अभ्यास करा की यश मिळालेच समजा.

2. भविष्यकाळाचे उपयोग

संकेतदर्शक वाक्यातून किंवा संकेतार्थ (जर - तर) दर्शवण्यासाठी भविष्यकाळाचा वापर होतो. 
१. तू पैसे देशील, तर फार चांगले होईल. 
२. तू अभ्यास करशील, तर नक्की अधिकारी होशील.

■ एखादी गोष्ट शक्‍य आहे/नाही (शक्यताअशक्यता), हे दर्शवण्यासाठी भविष्यकाळ वापरतात. 
१. सगळेच कसे तलाठी होतील. 
२. सर्वांनाच पहिला नंबर कसा मिळेल. 
३. सगळेच मूर्ख कसे असतील.

■ एखाद्या गोष्टीचा अंदाज (संभव) दर्शविण्यासाठी भविष्यकाळाचा वापर होतो. 
१. आई आता घरी असेल. (असण्याचा अंदाज) 
२. बाबा आता ऑफिसमध्ये असतील. 
३. शिक्षक आता शिकवत असतील.

क्रिया पुढे घडेल हे सांगताना या काळाचा उपयोग होते.
१. उद्यापासून शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील.

3. संनिहित भविष्यकाळ व भूतकाळ

संनिहित भविष्यकाळ : भविष्यकाळात लगेच घडणारी क्रिया साध्या वर्तमानकाळातून / साध्या भूतकाळातून दर्शवतात, याला संनिहित भविष्वकाळ असे म्हणतात. अशी वाक्ये शक्यतो आज्ञा व कृती प्रकारची असतात, कारण आज्ञा दिल्यानंतर भविष्यकाळात कृती होते. 
○ १) आपण मोठ्याने सांगा, मी लिहून घे"तो". (वर्तमान काळ - आज्ञा व कृती) 
○ २) तुम्ही पुढे व्हा, मी ये"तोच". (साधा वर्तमान काळ - आज्ञा व कृती) 
○ ३) तुम्ही पुढे व्हा, मी आ"लोच". (साधा भूतकाळ - आज्ञा व कृती) 
□ trick : संनिहित भविष्वकाळात → तोच, लोच शेवटी असते. व शेवटी (.) हे चिन्ह असते.

संनिहित भूतकाळ : लगतचा भूतकाळ सांगताना "साध्या वर्तमानकाळाचा" वापर करतात. याला संनिहित भूतकाळ असे म्हणतात. 
○ घटना व परिणाम दर्शविते यात परिणाम जर वर्तमानकाळात असेल तर त्याच्या लगतच्या भूतकाळात घटना घडलेली असते.
○ १) गुरुजी येतात, "तोच" मुले गायब! (घटना - परिणाम) 
○ २) ती उठते, "तोच" तुम्ही पसार! (घटना - परिणाम) 
○ ३) मी स्टेशनवर पोहोचतो, "तोच" गाडी हजर! (घटना - परिणाम) 
□ trick : संनिहित भूतकाळ → तोच, लोच मध्ये असते. व शेवटी (!) हे चिन्ह असते.

4. उद्देश वर्तमानकाळ/भूतकाळ/भविष्यकाळ ची ओळख.

■ उद्देश वर्तमानकाळ/उद्देश भूतकाळ/उद्देश भविष्यकाळ
□ जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्त्याचा वर्तमानकाळ किंवा भविष्यकाळातील उद्देश / हेतू सांगितला जातो त्या वाक्याचा काळ हा अनुक्रमे उद्देश वर्तमानकाळ, उद्दे भूतकाळ किंवा उद्देश भविष्यकाळ असतो.
■ trick नियम (रचना)
□ उद्देश वर्तमानकाळ - .... णार + आहे
□ उद्देश भूतकाळ - .... णार + होता / होता
□ उद्देश भविष्यकाळ - ... णार + असेल
■ उदाहरणार्थ 
□ मी अभ्यास करणार आहे. (उद्देश वर्तमानकाळ) 
□ मी अभ्यास करणार होतो. (उद्देश भूतकाळ)
□ मी अभ्यास करणार असेल. (उद्देश भविष्यकाळ)

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव