प्रकरणचे नाव - वाक्य पृथक्करण

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - वाक्य पृथक्करण

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) वाक्य पृथक्करण उजळणी व विभाग

1. वाक्य म्हणजे काय?

■ एखाद्या शब्दसमुहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो.  
वाक्य म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूह होय.
○ पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य होय.  
□ उदाहरणार्थ   
१. हा झाड आहे.   
२. तो झाड डोंगरावर आहे.

■ मराठी वाक्यरचना अशी असते.  
कर्ता + कर्म + क्रियापद

2. वाक्य पृथक्करण म्हणजे काय?

■ वाक्‍यातील विविध शब्दांचा वाक्यातील विविध घटकांचा एकमेकांशी असणारा संबंध स्पष्ट करणे म्हणजे "वाक्य पृथक्करण" होय. 
■ पृथक्करणाच्या भाषेत 
कर्ता म्हणजेच - उद्देश
क्रियापद म्हणजेच - विधेय

3. वाक्य पृथक्करणचे दोन विभाग

■ वाक्याचे पृथक्करण दोन विभागात करतात.
1. उद्देश विभाग
2. विधेय विभाग
उद्देश्य विभागविधेय विभाग यांना उद्देश्यांगविधेयांग असेही म्हणतात. 

■ उद्देश्य विभागाचे (उद्देश्यांगाचे) दोन भाग पडतात. 
○ १. मूळ उद्देश्य (कर्ता)
○ २. उद्देश्य विस्तार 

■ विधेय विभागाचे (विधेयांगाचे) पाच भाग पडतात.
○ १. मूळ विधेय (क्रियापद)
○ २. विधेय विस्तार 
○ ३. कर्मपूरक (कर्म)
○ ४. कर्म विस्तार 
○ ५. विधेयपूरके

(B) उद्देश्य विभागाचे (उद्देश्यांगाचे) दोन भाग

1. मूळ उद्देश्य (कर्ता)

■ वाक्याचा कर्ता म्हणजेच मूळ उद्देश्य होय.
□ उदाहरणार्थ
1. कोळ्याच्या जाळ्यात मासे आले. 
मासे → मूळ उद्देश्य (कर्ता)

2. उद्देश्य विस्तार

■ कर्त्याबद्दल माहिती सांगणारे शब्द म्हणजेच कर्त्याची अधिविशेषणेसमानाधिकरण शब्द उद्देश्य विस्तारांचे कार्य करतात. 
○ कर्त्याबद्दल माहिती सांगणारे शब्द म्हणजेच कर्त्याची अधिविशेषणे हे "उद्देश्य विस्तार" होय.
□ उदाहरणार्थ
1. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. 
त्याचा धाकटा - उद्देश्य विस्तार

3. उद्देश्य विभागाचे (उद्देश्यांगाचे) Tricky नियम

■ उद्देश्य विभागाचे (उद्देश्यांगाचे) दोन भाग पडतात.
1. मूळ उद्देश्य (कर्ता) 
2. उद्देश्य विस्तार 
कर्ताकर्त्याशी संबंधित असणारे शब्द यांचा समावेश उद्देश्य विभागात होतो.
○ वाक्याचा कर्ता म्हणजेच "मूळ उद्देश्य" होय.
○ कर्त्याबद्दल माहिती सांगणारे शब्द म्हणजेच कर्त्याची अधिविशेषणे हे "उद्देश्य विस्तार" होय. 

■ उदाहरणार्थ 
1. त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. 
मूळ उद्देश्य (कर्ता) - मुलगा
उद्देश्य विस्तार - त्याचा धाकटा

(C) विधेय विभागाचे (विधेयांगाचे) पाच भाग

1. मूळ विधेय (क्रियापद)

■ वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणजेच मूळ विधेय असे म्हणतात. 
□ उदाहरणार्थ 
1. मंदिराचा दरवाजा उघडला
उघडला → मूळ विधेय

2. विधेय विस्तार (क्रियाविशेषण)

■ क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना विधेय विस्तार असे म्हणतात.   
○ क्रियापदाला केव्हा, कोठे, कसे, किती वेळा, किती प्रमाणात असे प्रश्‍न विचारल्यास येणारे उत्तर विधेय विस्तार असते.  
○ वाक्यातील क्रियाविशेषणे हे विधेय विस्ताराचे कार्य करतात. 
□ उदाहरणार्थ  
1. काल सकाळी शेजारच्या मैदानावर अमित जोरात धावला.  
○ केव्हा धावला → काल सकाळी   
○ कसा धावला → जोरात   
○ कुठे धावला → मैदानावर   
○ विधेय विस्तार → काल सकाळी, जोरात, मैदानावर

3. कर्मपूरक (कर्म)

■ वाक्यात ज्याच्यावर कर्त्याची प्रत्यक्ष क्रिया घडते ते कर्म असते. 
○ क्रिया सोसणारे किंवा भोगणारे कर्म असते. 
○ कर्मसुद्धा पूरकाचाच एक प्रकार आहे, म्हणून त्याला कर्मपूरक असेही म्हणतात. 
□ उदाहरणार्थ 
1. अभयने स्वराचा पतंग कापला. 
पतंग → कर्मपूरक (कर्म)

4. कर्म विस्तार

कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर तो शब्द कर्मविस्तार किंवा कर्मपूरकाचा विस्तार असतो. 
○ कर्माची अधिविशेषणे कर्मपूरकाच्या विस्ताराचे कार्य करतात. 
□ उदाहरणार्थ 
1. शेजारचा मधू खूप तन्मयतेने गोष्टीचे पुस्तक वाचतो.
गोष्टीचे - कर्मविस्तार (कर्मपूरकाचा विस्तार)

5. विधेयपूरके (कर्मपूरक, विधानपूरक, आधारपूरक)

■ वाक्याचा कर्ता आणि क्रियापद जेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ ठरतात तेव्हा एखादा शब्द किंवा शब्दसमूह वाक्यात येतो व विधानाचा अर्थ पूर्ण करतो. त्या शब्दाला पूरक किंवा विधेयपूरक असे म्हणतात.
तीन प्रकारचे विधेयपूरक असतात.
१. कर्मपूरक (कर्म) -------------------- (सकर्मक वाक्य)
२. विधानपूरक (विधिपूरक) ---------- (अकर्मक वाक्य)
३. आधारपूरक ------------------------ (अकर्मक वाक्य)

■ 1. कर्मपूरक (कर्म)
○ जेव्हा एकाच वाक्यात दोन कर्मे असतात, तेव्हा त्यातील अप्रत्यक्ष कर्म हे विधेयपूरक असते. तर प्रत्यक्ष कर्म हे कर्मपूरक (कर्म) असते.
□ उदाहरणार्थ 
1. गणेश रामाला कमळ दिले.
कमळ (प्रत्यक्ष कर्म) → कर्मपूरक (कर्म)
रामाला (अप्रत्यक्ष कर्म) → विधेयपूरक

■ 2. विधीपूरक (विधानपूरक)
○ विधीपूरकालाच विधानपूरक असेही म्हणतात. 
कर्त्यापूर्वी आलेले चतुर्थी विभक्तीतील नाम किंवा सर्वनाम विधीपूरकाचे कार्य करते. 
○ वाक्याचा कर्ताकर्त्यानंतर येणारे नाम दोघेही एकाच व्यक्ती किंवा वस्तूला दर्शवित असतील, तर कर्त्यानंतर येणारे नाम विधीपूरकाचे कार्य करते. 
कर्त्याची विधीविशेषणे ही विधीपूरकाचे कार्य करतात. 
□ उदाहरणार्थ 
१. शिवाजी महाराज छत्रपती झाले.
छत्रपतीविधीपूरक (विधानपूरक)
२. वसंतऋतूत वृक्षांना पालवी फुटते. 
वृक्षांनाविधानपूरक (विधीपूरक)

■ 3. आधारपूरक 
क्रियेला आधार देणाच्या घटकांना आधारपूरक असे म्हणतात. 
○ वाक्यातील स्थलवाचक क्रियाविशेषण आधारपूरकाचे कार्य करते. 
□ उदाहरणार्थ 
1. सूर्य डोंगराआड गेला. 
डोंगराआड → आधारपूरक

6. विधेय विभागाचे (विधेयांगाचे) Tricky नियम

(D) केवल, संयुक्त व मिश्र वाक्यांचे वाक्यपृथक्करण

1. केवल वाक्यांचे - वाक्यपृथक्करण

2. संयुक्त वाक्यांचे - वाक्यपृथक्करण

3. मिश्र वाक्यांचे - वाक्यपृथक्करण

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव