प्रकरणचे नाव - प्रयोग व प्रयोगाचे प्रकार

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - प्रयोग व प्रयोगाचे प्रकार

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) प्रयोग, प्रयोगाचे प्रकार व उजळणी

1. प्रयोग म्हणजे काय? व एकूण मुख्य प्रकार

■ प्रयोग म्हणजे काय? 
□ वाक्यातील कर्ता, कर्म क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला "प्रयोग" असे म्हणतात.
○ म्हणजे कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी रचना असते, तिलाच व्याकरणात "प्रयोग" असे म्हणतात.
प्रयोग हा शब्द संस्कृत "प्र + युज" (योग) यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ जुळणी किंवा रचना असा आहे. 
प्रयोग = प्र + युज म्हणजे ( रचना करणे

■ प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार 
1. कर्तरी प्रयोग 
2. कर्मणी प्रयोग 
3. भावे प्रयोग
☆ क्रियापदाचा रूप कधी कर्त्यावर अवलंबून असते, तर कधी कर्मावर अवलबून, तर कधी कोणावरही अवलंबून नसते. यावरून प्रयोगाचे वरील तीन प्रकार ठरतात.
□ क्रियापदाची रचना कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर तो “कर्तरी प्रयोग” असतो. 
□ क्रियापदाची रचना कर्माच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर “कर्मणी प्रयोग” असतो. 
□ क्रियापदाची रचना वरील दोघांनुसार नसून ती तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी तटस्थ असेल तर तो “भावे प्रयोग” असतो.

2. प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार व उजळणी

■ कर्तरी प्रयोग  
कर्त्याच्या लिंग, वचनानुसार क्रियापदाचे रूप जेव्हा बदलते, तेव्हा त्यास "कर्तरी प्रयोग" असे म्हणतात. 
□ कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमान्तच असतोकर्म हे प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते
○ वाक्य वर्तमान, भूत व भविष्य तिन्ही काळात असतात. 
कर्ता → हा नेहमी प्रथमान्तच असतो. 
○ म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसते. 
कर्म → हा प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते. 
○ म्हणजे कर्माला प्रत्यय असते किंवा नसते. 
क्रियापदकर्त्यानुसार बदलते.  
● उदाहरणे 
१. राम आंबा खातो. (प्रथमान्त कर्ता)  
२. पोपट पेरू खातो. (प्रथमान्त कर्म) 
३. शिक्षक मुलांना शिकवितात. (द्वितीयान्त कर्म)  
४. राम रावणास मारतो. (प्रथमान्त कर्ता)  
५. पक्षी आकाशात उडतात. (प्रथमान्त कर्ता)   

■ कर्मणी प्रयोग 
कर्माच्या लिंग, वचनानुसार क्रियापदाचे रूप जेव्हा बदलते, तेव्हा त्यास "कर्मणी प्रयोग" असे म्हणतात. 
○ कर्मणी प्रयोगात कर्म हा नेहमी प्रथमान्तच असतो, व कर्ता हे प्रथमान्त कधीच नसतो. (कर्ता तृतीयान्त, चतुर्थ्यन्त, षष्ठी विभक्तीत किंवा शब्दयोगी अव्ययान्त असतो.) 
○ वाक्य फक्त भूतकाळात असतात. 
कर्म → हा नेहमी प्रथमान्तच असते.  
○ म्हणजे कर्माला प्रत्यय नसते. 
कर्ता → हा प्रथमान्त कधीच नसतो. कर्ता तृतीयान्त किंवा शब्दयोगी अव्ययान्त असते. 
○ म्हणजे कर्त्याला प्रत्यय असते. 
क्रियापदकर्मानुसार बदलते.  
● उदाहरणे 
१. रामाने आंबा खाल्ला (प्रथमान्त कर्म)  
२. तिने गाणे म्हटले. (तृतीयान्त कर्ता)  
३. मांजराकडून उंदीर मारला गेला. (शब्दयोगी अव्ययान्त कर्ता) 
४. शेतकऱ्यांनी शेत नागरले. (प्रथमान्त कर्म)  
५. पोलिसांनी चोर पकडला. (प्रथमान्त कर्म)

■ भावे प्रयोग 
कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचनानुसार क्रियापदाचे रूप जेव्हा बदलत नाही, तेव्हा त्यास "भावे प्रयोग" असे म्हणतात.
○ वाक्य फक्त भूतकाळात असतात. 
□ भावे प्रयोगात कर्ताकर्म हे प्रथमान्त नसते.  
○ म्हणजे कर्त्याला व कर्माला विभक्ती प्रत्यय असते. 
कर्ता → हा प्रथमान्त कधीच नसतो. तृतीयान्त किंवा अन्य विभक्तीत असते. 
○ म्हणजे कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो.  
कर्म → हा प्रथमान्त कधीच नसतो. द्वितीयान्त असते. 
○ म्हणजे कर्माला विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो.  
क्रियापदकर्त्यानुसार किंवा कर्मानुसार बदलत नाही.  
○ म्हणजे क्रियापद स्वतंत्र, तृतीयपुरुषी नंपुसकलिंगी व एकवचनी असते. 
● उदाहरणे 
१. रामाने आंब्याला खाल्ले. 
२. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. 
३. रामाने रावणा मारले.  
४. आईने मुलाला समजावले.  
५. पोलिसांनी चोरा पकडले.

(B) कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार व उजळणी

1. सकर्मक कर्तरी प्रयोग

■ ज्या वाक्यात कर्ताकर्म दोन्ही असेल व कर्त्याच्या लिंग, वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत असेल, तर त्यास "सकर्मक कर्तरी प्रयोग" असे म्हणतात.
□ ज्या कर्तरी प्रयोगात कर्म असते, त्यास "सकर्मक कर्तरी प्रयोग" असे म्हणतात. 
□ वाक्यात कर्म असावेच लागते, ते प्रथमेत किंवा द्वितीयेत असते.
क्रियापद कर्त्याच्या लिंग-वचनानुसार बदलते, कर्मानुसार बदलत नाही. 

■ सकर्मक कर्तरी प्रयोग ओळखण्याची खूण (Trick-ट्रिक)
○ → कर्ता हा प्रथमान्त असते. म्हणजे कर्त्याला विभक्ती प्रत्यय नसते.
○ → कर्म असते, कर्म प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते. म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय लागलेले असते किंवा नसते. 

■ उदाहरणे
१. राम आंबा खातो.
२. गणेश पत्र लिहितो. 
३. सचिन क्रिकेट खेळतो. 
४. राम पुस्तक वाचतो. 
५. शिक्षक विद्यार्थ्यांना बसवितात. 
६. रामू कुत्र्याला पळवतो.

2. अकर्मक कर्तरी प्रयोग

■ ज्या वाक्यात फक्त कर्ता असेल व कर्त्याच्या लिंग, वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत असेल, तर त्यास "अकर्मक कर्तरी प्रयोग" असे म्हणतात.
□ ज्या कर्तरी प्रयोगात कर्म नसते, त्यास "अकर्मक कर्तरी प्रयोग" असे म्हणतात. 
□ वाक्यात कर्म नसते
कर्त्याला प्रत्यय नसून तो प्रथमेत असतो.
क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचनानुसार बदलते

■ अकर्मक कर्तरी प्रयोग ओळखण्याची खूण (Trick-ट्रिक) 
○ → कर्ता हा प्रथमान्त असतो. म्हणजे कर्त्याला विभक्ती प्रत्यय नसते.
○ → कर्म नसते

■ उदाहरणे
१. पक्षी आकाशात उडतात. 
२. राजाला मुकुट शोभतो. 
३. रामाला थंडी वाजते. 
४. सूर्य पूर्वेला उगवतो.
५. मला पपई आवडते.
६. सचिन छान खेळतो.

(C) कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार व उजळणी

1. प्रधान कर्तृक कर्मणी

■ ज्या वाक्यात कर्ताकर्म दोन्ही असेल व कर्माच्या लिंग, वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत असेल, तर त्यास "प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग" असे म्हणतात.
कर्त्याला बहुधा तृतीया किंवा चतुर्थीचे प्रत्यय असतो. कर्माला प्रत्यय नसतो
□ कर्मणी प्रयोगात कर्माला महत्त्व असते; परंतु या प्रकारात मात्र कर्त्यालाच महत्त्व दिले जाते. 

■ प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण (Trick-ट्रिक)
○ → कर्म हा प्रथमान्त असते. म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो.
○ → कर्ता हे तृतीयान्त किंवा अन्य विभक्तीत असते. म्हणजे कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला असतो. 

■ उदाहरणे
१. रामाने आंबा खाल्ला. 
२. शेतकऱ्यांनी शेते नांगरली. 
३. त्याने पत्र लिहिले. 
४. रामने काम केले.
५. चिऊने पत्र लिहिले.

2. पुराण कर्मणी

■ पुराण कर्मणी प्रयोगात क्रियापदाचे रूप (धातू + इज) या प्रत्ययांनी युक्त असते.   
□ अशी वाक्यरचना फक्त प्राचीन काव्यात आढळते.   
□ हा प्रयोग मूळ संस्कृत कर्मणी प्रयोगापासून आला आहे. 

■ पुराण कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण (Trick-ट्रिक)  
○ → कर्म हा प्रथमान्त असते. म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय नसते.   
○ → सकर्मक धातूला” प्रत्यय असतो. म्हणजे क्रियापदाच्या शेवटी "जे" प्रत्यय असतो. 
उदा. करिजे, बोलीजे, कीजे, देईजे.... 

■ उदाहरणे  
१. त्वा काय कर्म करिजे लघू लेकराने.   
२. नळे इंद्रासी असे बोलिजेले.   
३. एथं अवधान ऐकले देईजे.   
४. सर्वस्व संतोष पाविजेती.  
५. द्विजी निषिधापासव म्हणीजेला.

3. नवीन कर्मणी

■ कर्मणी प्रयोगातील कर्त्याला "कडून" हे शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे (passive voice) रचना करण्याचा जो नवीन प्रकार आहे, त्यास "नवीन कर्मणी" किंवा "कर्मकर्तरी" असे म्हणतात.
□ हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आला आहे. 
□ कर्त्याला कडून प्रत्यय असतो. 
□ कर्म प्रथमेत असते. 

■ नवीन कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण (Trick-ट्रिक) 
○ → कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेले असतो. 
○ → कर्म प्रथमान्त असते. म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय नसते. 

■ उदाहरणे
१. मांजराकडून उंदीर मारण्यात येतो.
२. शेतकऱ्याकडून शेत नांगरले गेले. 
३. रामाकडून रावण मारला गेला. 
४. शिपायाकडून चोर धरला गेला. 
५. रामाकडून गाय बांधली जाते.

4. शक्य कर्मणी

क्रियापदातून क्रिया करण्याची शक्‍यता, सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा असा अर्थ व्यक्त होतो. 
□ क्रियापदाने शक्‍यता सुचविली आहे, त्यास “शक्‍य कर्मणी” असे म्हणतात.  
□ कर्त्यास तृतिया / चतुर्थीचा विभक्ती प्रत्यय असतो.  
□ कर्म प्रथमेत असते.  
□ धातुस व, अव, अवव असे प्रत्यय जोडून शक्‍यार्थ क्रियापद तयार केलेले असते. 

■ शक्य कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण (Trick-ट्रिक)  
○ → क्रियापद शक्‍यता दर्शवितो. म्हणजे क्रियापदाला " वते, वतो " प्रत्यय लागलेले असते.  
○ → कर्त्याला "च्याने" प्रत्यय लागलेले असते.  
○ → कर्म प्रथमान्त असते. म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय नसते. 

■ उदाहरणे 
१. आईच्याने भांडी घासवते.  
२. रामाच्याने काम करवते.  
३. राणीच्याने पर्वत चढवतो.  
४. बाबाच्याने आता बसवते. (शक्यता)
५. मला हे काम करवते. (शक्यता)

5. समापन कर्मणी

■ ज्या कर्मणी प्रयोगात संयुक्त क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो, अशा प्रकारच्या प्रयोगाला "समापन कर्मणी प्रयोग" असे म्हणतात. 
□ क्रियापदाचा अर्थ कार्य समाप्ती दर्शवितो.
□ या प्रयोगात कर्त्याला षष्ठी विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो व क्रियापद नेहमी संयुक्त असते

■ समापन कर्मणी प्रयोग ओळखण्याची खूण (Trick-ट्रिक)
○ → संयुक्त क्रियापदाला “ ऊन / हून ” प्रत्यय लागलेले असते. व पुढे झाला/ली/ले, होईल, व्हावे असे सहायक क्रियापद असते.
○ → कर्त्याला षष्ठीचे प्रत्यय असतो.
○ → कर्म प्रथमान्त असते. म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय नसते. 

■ उदाहरणे
१. त्याची गोष्ट लिहुन झाली
२. त्याचा चहा पिऊन झाला
३. तिचे पत्र वाचून झाले
४. लताचा धडा वाचून होईल.
५. राजूचे पत्र लिहून व्हावे.

(D) भावे प्रयोगाचे उपप्रकार व उजळणी

1. सकर्मक भावे प्रयोग

■ ज्या वाक्यात कर्ताकर्म हे दोन्ही असेलकर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग, वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत नसेल, तर त्यास "सकर्मक भावे प्रयोग" असे म्हणतात.
□ ज्या भावे प्रयोगात कर्म असते, त्याला "सकर्मक भावे" प्रयोग असे म्हणतात.
□ या प्रकारात कर्त्याला प्राधान्य दिले जाते. 

■ सकर्मक भावे प्रयोग ओळखण्याची खूण (Trick)
○→ कर्ताकर्म प्रथमान्त नसते. म्हणजे कर्त्याला व कर्माला विभक्ती प्रत्यय असते.
○→ कर्ता हा तृतीयान्त किंवा अन्य विभक्तीत असते. म्हणजे कर्त्याला विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो. कर्त्याला शक्‍यतो तृतीयेचे “ ने / नी ” हे प्रत्यय असते. 
○→ कर्म हे द्वितीयान्त असते. म्हणजे कर्माला विभक्तीचा प्रत्यय लागलेला असतो. 

■ उदाहरणे
१. गणेशने गाईला बांधले. 
२. रामाने रावणा मारले. 
३. चिऊने पत्रा लिहिले. 
४. आईने मुलाला समजावले. 
५. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवले.

2. अकर्मक भावे प्रयोग

■ ज्या वाक्यात फक्त कर्ता असेलकर्त्याच्या लिंग, वचनानुसार क्रियापदाचे रूप बदलत नसेल, तर त्यास "अकर्मक भावे प्रयोग" असे म्हणतात. 
□ ज्या भावे प्रयोगात कर्म नसते, त्याला "अकर्मक भावे प्रयोग" असे म्हणतात. 
□ अकर्मक भावे प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो, तर क्रियापद शक्‍यतो विध्यर्थी किंवा शक्यार्थ असते

■ अकर्मक भावे प्रयोग ओळखण्याची खूण (Trick-ट्रिक) 
○→ कर्ता हा प्रथमान्त नसतो. म्हणजे कर्त्याला विभक्ती प्रत्यय असते. 
○→ वाक्यात कर्म नसते.
○→ क्रियापद शक्‍यतो शक्यार्थ असते.

■ उदाहरणे 
१. त्याने आता घरी जावे.  
२. त्याने उगीच रडले.  
३. मुलींनी आता पळावे.  
४. तिला तिकडे बोलवावे.  
५. विद्यार्थ्यांनी आता पळावे.

3. भावकर्तृक / अकर्तृक भावे प्रयोग

■ विशिष्ट परिस्थितीचे किंवा भाववाक्याचे वर्णन असल्यामुळे त्यांना "भावकर्तृक प्रयोग" किंवा "अकर्तृक प्रयोग" असे म्हणतात. 

■ अकर्तृक भावे प्रयोग ओळखण्याची खूण (Trick-ट्रिक)
○ → वाक्‍य अकर्मक असते
○ → क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो. म्हणजेच क्रियापदाचा भावच कर्ता दर्शवितो. म्हणजेच कर्ता क्रियापदातच लपलेला असतो

■ उदाहरणे
१. आज सारखे गडगडते. (गडगडणे) 
२. गावी जाताना वडगावजवळ उजाडले. (उजेड) 
३. कात्रजला जाताना घाटात मावळले. (मावळणे)
४. दिवसभर सारखे धडधडते. (धडधडणे)
५. पित्त झाल्यामुळे मला मळमळते. (मळमळणे)

(E) वाक्यातील संकर प्रयोग व उजळणी

1. कर्तृ-कर्म संकर प्रयोग

■ ज्या वाक्यात “कर्तरी” व “कर्मणी” प्रयोगाची लक्षणे आढळतात त्यास "कर्तृ-कर्म संकर प्रयोग" म्हणतात. 
□ यात कर्तरीकर्मणी प्रयोगाची छटा असते
कर्त्यानुसार क्रियापद बदलते म्हणून कर्तरी प्रयोगाची छटा.
कर्मानुसार क्रियापद बदलते म्हणून कर्मणी प्रयोगाची छटा

■ कर्तृ-कर्म संकर प्रयोग ओळखण्याची खूण (Trick)
○ → वाक्याचा कर्ता " तू, तुम्ही " पैकी असतो
○ → क्रियापदाला " स / त " प्रत्यय असतो
○ → कर्माला प्रत्यय नसतो

■ उदाहरणे
१. तू मला पुस्तक दिले
२. तू मला पुस्तके दिली
३. तुम्ही काम केले
४. तुम्ही कामे केली.
५. तू फूल तोडले.
○ तू मला पुस्तके दिलीस
रामाने मला पुस्तक दिले. (कर्त्यामध्ये बदल) 
→ रामाने मला पुस्तके दिले. (कर्मामध्ये बदल)

2. कर्म-भावे संकर प्रयोग

■ ज्या वाक्यात “कर्तरी” व “भावे” प्रयोगाची लक्षणे आढळतात त्यास "कर्तृ-भावे संकर प्रयोग" म्हणतात. 
□ यात कर्तरीभावे प्रयोगाची छटा असते
कर्त्यानुसार क्रियापद बदलते, म्हणून कर्तरी प्रयोगाची छटा.
कर्मानुसार किंवा कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही, म्हणून भावे प्रयोगाची छटा.

■ कर्म-भावे संकर प्रयोग ओळखण्याची खूण (Trick)
○ → वाक्याचा कर्ता " तू, तुम्ही " पैकी असतो
○ → क्रियापदाला " स / त " प्रत्यय असतो.
○ → कर्माला प्रत्यय असतो

■ उदाहरणे
१. तू गाईला घालविले
२. तू बाळाला घेतले
३. तू कुत्र्याला मारले.
४. तू त्या घरी न्यायचे होते.
५. तू कार्यालयातून जायचे होते.

3. कर्तृ-भावे संकर प्रयोग

■ ज्या वाक्यात “कर्मणी” व “भावे” प्रयोगाची लक्षणे आढळतात त्यास "कर्म-भावे संकर प्रयोग" म्हणतात.  
कर्मणीभावे प्रयोगाची छटा असते.  
कर्मानुसार क्रियापद बदलते, म्हणून कर्मणी प्रयोगाची छटा
कर्मानुसार किंवा कर्त्यानुसार क्रियापद बदलत नाही, म्हणून भावे प्रयोगाची छटा

■ कर्तृ-भावे संकर प्रयोग ओळखण्याची खूण (Trick) 
○ → कर्त्यालाकर्माला प्रत्यय असतो.  
○ → वाक्याचा कर्ता शक्‍यतो " तू, तुम्ही " पैकी नसतो
○ → क्रियापदाला " ला/ली/ले " हे प्रत्यय असते.  
○ → क्रियापदाला " स / त " प्रत्यय नसते

■ उदाहरणे 
१. बापाने पोराला धोपटले / धोपटला.  
२. नवऱ्याने बायकोला झापले / झापली.  
३. बापाने पोराला शाळे घातले / घातला.  
४. सासूने सुनेला माहेरी धाडले / धाडली.  
५. बाळाने पुस्तकाला फाडले.

(F) वाक्यातील सर्व प्रयोग व Tricky नियम

1. प्रयोगाचे मुख्यप्रकार ओळखण्याची Trick (ट्रिक)

■ प्रयोगाचे मुख्य तीन प्रकारांना ओळखण्याची Trick 
□ वाक्यातील क्रियापद वरून कर्ता व कर्म ओळखे. नंतर प्रयोग ओळखणे. सुरूवात कर्त्याकडून करावे कारण अकर्मक वाक्यात फक्त कर्ता असतो कर्म नसतो. 
कर्तरी प्रयोग --> कर्त्याला प्रत्यय नसते
---------------------> कर्माला प्रत्यय असते किंवा नसते.
कर्मणी प्रयोग -> कर्त्याला प्रत्यय असतेच
---------------------> कर्माला प्रत्यय नसते.
भावे प्रयोग ----> कर्त्याला प्रत्यय असतेच
---------------------> कर्माला प्रत्यय असतेच

■ कर्तरी प्रयोग - trick (ट्रिक)
कर्ता हा नेहमी प्रथमान्तच असतोकर्म हे प्रथमान्त किंवा द्वितीयान्त असते
○ म्हणजे - कर्ताला विभक्ती प्रत्यय नसेल. (प्रथमात) व कर्माला विभक्ती प्रत्यय असेल किंवा नसेल. 
○ क्रियापदाची रचना कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर तो कर्तरी प्रयोग असतो. 

■ कर्मणी प्रयोग - trick (ट्रिक)
कर्म हा नेहमी प्रथमान्तच असतोकर्ता हे प्रथमान्त नसते.
○ म्हणजे - कर्माला विभक्ती प्रत्यय नसेल (प्रथमात) व कर्ताला विभक्ती प्रत्यय असेल.
○ क्रियापदाची रचना कर्माच्या लिंग, वचन व पुरुषानुसार असेल तर कर्मणी प्रयोग असतो. 

■ भावे प्रयोग - trick (ट्रिक)
कर्ताकर्म हे नेहमी प्रथमान्तच नसतात
○ म्हणजे - कर्ताला व कर्माला विभक्ती प्रत्यय असेल. 
○ क्रियापदाची रचना वरील दोघांनुसार नसून ती तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी तटस्थ असेल तर तो भावे प्रयोग असतो.

2. प्रयोगाचे उपप्रकार ओळखण्याची Trick (ट्रिक)

■ वाक्यात क्रियापदाला कर्ताकर्म असेल तर, खालील प्रयोगांपैकी एक असते.
1. सकर्मक कर्तरी प्रयोग असेल.
2. सकर्मक भावे प्रयोग असेल.
3. कर्मणी प्रयोगातील सर्व उपप्रकारांपैकी एक असेल. 

■ वाक्यात क्रियापदाला फक्त कर्ता असेल, कर्म नसेल तर, खालील प्रयोगांपैकी एक असते.
1. अकर्मक कर्तरी प्रयोग 
2. अकर्मक भावे प्रयोग
3. अकर्तृक भावे / भावकर्तृक प्रयोग

3. कर्तरी व भावे प्रयोगाचे उपप्रकार व Trick (ट्रिक)

■ वाक्यात क्रियापदाला कर्ताकर्म असेल, तेंव्हा
सकर्मक कर्तरी प्रयोग व सकर्मक भावे प्रयोग कसे ओळखावे.
कर्ताला विभक्ती प्रत्यय नसेल, तर 
सकर्मक कर्तरी प्रयोग
कर्ताला व कर्माला विभक्ती प्रत्यय असेल, तर 
सकर्मक भावे प्रयोग 

■ वाक्यात क्रियापदाला फक्त कर्ता असेल, कर्म नसेल, तेंव्हा
अकर्मक कर्तरी प्रयोग व अकर्मक भावे प्रयोग कसे ओळखावे.
कर्ताला विभक्ती प्रत्यय नसेल, तर 
अकर्मक कर्तरी प्रयोग
कर्ताला विभक्ती प्रत्यय असेल, तर 
अकर्मक भावे प्रयोग 

■ वाक्यात क्रियापदाला फक्त कर्ता असेल, कर्म नसेल, तेंव्हा
अकर्तृक भावे / भावकर्तृक प्रयोग कसे ओळखावे.
→ वाक्‍य हे अकर्मक असते.
→ यात विशिष्ट परिस्थितीचे किंवा भाववाक्याचे वर्णन असते.
क्रियापदातच कर्ता सामावलेला असतो. म्हणजे क्रियापदात कर्ता हा लपलेला असतो.
उदाहरण -: उजाडले, मावळले, मळमळते, गडगडते, धडधडते,......

4. कर्मणी प्रयोगाचे उपप्रकार व Trick (ट्रिक)

■ प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग कसे ओळखावे.   
○ → कर्म हा प्रथमान्त असते. म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय लागलेला नसतो.   
○ → कर्ता हे तृतीयान्त किंवा अन्य विभक्तीत असते. म्हणजे कर्त्याला विभक्ती प्रत्यय लागलेला असतो. 

■ शक्य कर्मणी प्रयोग कसे ओळखावे.   
○ → क्रियापद शक्‍यता दर्शवितो. म्हणजे क्रियापदाला " वते, वतो " प्रत्यय लागलेले असते.     
○ → कर्त्याला "च्याने" प्रत्यय लागलेले असते.     
○ → कर्म प्रथमान्त असते. म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय नसते. 

■ नवीन कर्मणी प्रयोग कसे ओळखावे.   
○ → कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेले असतो.    
○ → कर्म प्रथमान्त असते. म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय नसते. 

■ समापन कर्मणी प्रयोग कसे ओळखावे.   
○ → संयुक्त क्रियापदाला “ ऊन / हून ” प्रत्यय लागलेले असते. व पुढे झाला/ली/ले, होईल, व्हावे असे सहायक क्रियापद असते.   
○ → कर्त्याला षष्ठीचे प्रत्यय असतो.   
○ → कर्म प्रथमान्त असते. म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय नसते. 

■ पुराण / प्राचीन कर्मणी प्रयोग कसे ओळखावे.   
○ → कर्म हा प्रथमान्त असते. म्हणजे कर्माला विभक्ती प्रत्यय नसते.      
○ → सकर्मक धातूला” प्रत्यय असतो. म्हणजे क्रियापदाच्या शेवटी "जे" प्रत्यय असतो.    
उदा. करिजे, बोलीजे, कीजे, देईजे....

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव