प्रकरणचे नाव - शब्दसिद्धी (सिद्ध व साधित शब्द)

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - शब्दसिद्धी (सिद्ध व साधित शब्द)

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) शब्दसिद्धी उजळणी व एकूण प्रकार

1. शब्दसिद्धी म्हणजे काय? - प्रकार व उजळणी

■ शब्दसिद्धी म्हणजे काय? 
एका शब्दापासून किंवा धातूपासून अन्य शब्द तयार करणे म्हणजे शब्दसिद्धी होय. 
शब्द कसा बनतो (म्हणजेच सिद्ध होतो) ते पाहणे याला शब्दसिद्धी म्हणतात. 

■ शब्दसिद्धीचे (शब्दांचे) दोन प्रकार 
1. सिद्ध शब्द 
2. साधित शब्द 

□ भाषेतील जे मूळ धातू किंवा मूळ शब्द असतात त्यांना “ सिद्ध शब्द ” म्हणतात.
सिद्ध शब्दाला उपसर्ग अथवा प्रत्यय जोडल्यास तयार होणाऱ्या शब्दाला “ साधित शब्द ” म्हणतात.
□ उदाहरणार्थ 
सिद्ध शब्द → कर 
साधित शब्दकार, करिता, करमुक्त, करकर.

2. सिद्ध शब्द म्हणजे काय? - प्रकार व उजळणी

■  सिद्ध शब्द म्हणजे काय?  
जा, ए, दे, घे, कर, बस, बोल, खा, पी या सारख्या मूळ धातू किंवा शब्दांना  “ सिद्ध शब्द ” म्हणतात.   
□ सिद्ध शब्दांचे तीन प्रकार   
१. तत्सम शब्द   
२. तदभव शब्द   
३. देशी शब्द 

■ 1. तत्सम शब्द   
संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेल्या शब्दांना " तत्सम शब्द " म्हणतात.   
○ संस्कृती शब्दाच्या मूळ रूपात बदल न झालेल्या शब्दांना " तत्सम शब्द " म्हणतात.  
□ उदाहरण -: राजा, संत, मंदिर, सूर्य, आकाश, धर्म. 

■ 2. तद्भव शब्द  
संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत न येता त्यात बद्दल होऊन आलेल्या शब्दांना " तद्भव शब्द " म्हणतात. 
○ संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या मूळ रुपात बदल झाला आहे, त्यांना " तद्‌भव शब्द " म्हणतात. किंवा संस्कृती शब्दाच्या मूळ रूपात बदल होऊन तयार झालेल्या शब्दांना " तत्सम शब्द " म्हणतात.  
□ उदाहरण -: " गृह " या संस्कृत शब्दापासून " घर " हा शब्द तयार झाला आहे. सर्प → साप, कर्ण → कान, पुष्प → फुल. 

■ 3. देशी शब्द   
○ जे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाशांच्या बोलीभाषेतील मानले जातात, त्यांना " देशी शब्द " किंवा " देशज शब्द " म्हणतात.   
□ उदाहरण -: घोडा, पोट, दगड, डोळा, चिमणी, पीठ.

3. साधित शब्द म्हणजे काय? - प्रकार व उजळणी

■ साधित शब्द म्हणजे काय?  
सिद्ध शब्दांच्या मागे उपसर्ग किंवा पुढे प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात, त्यांना “ साधित शब्द ” म्हणतात. 
○ उदाहरण -: कर → या शब्दापासून करून, करिता, करीत, करणारा
□ साधित शब्दाचे तीन प्रकार  
1. उपसर्ग घटित शब्द 
2. प्रत्यय घटित शब्द 
3. अभ्यस्त शब्द 

■ उपसर्गघटीत शब्द  
○ शब्दाच्या आधी लागलेल्या अक्षरांना “ उपसर्ग ” म्हणतात, व त्यापासून बनलेल्या शब्दाला “ उपसर्गघटीत शब्द ” म्हणतात. 
○ शब्दांच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात, त्यांना उपसर्ग असे म्हणतात. उपसर्ग जोडून तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्गघटित शब्द म्हणतात. 
□ उदाहरण -: उपहार, प्रतिकार, अवगुण, भरदिवसा, अतिक्रमण, अधिपती 

■ प्रत्ययघटीत शब्द  
○ शब्दाच्या नंतर लागलेल्या अक्षरांना “ प्रत्यय ” म्हणतात, व त्यापासून बनलेल्या शब्दाला “ प्रत्ययघटीत शब्द ” म्हणतात.  
शब्दांच्या किंवा धातूच्या शेवटी जी एक किंवा अधिक अक्षरे जोडली जातात, त्यांना प्रत्यय असे म्हणतात. प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या शब्दांना प्रत्ययघटित शब्द म्हणतात. 
○ उदाहरण -: खाणारा, जाताना, बसून, जडत्व, गावकी. 

□ प्रत्ययघटित शब्दांचे दोन प्रकार  
1. कृदन्ते (थातुसाधिते)  
2. तद्धिते (शब्दसाधिते)  

● (अ) कृदन्ते (थातुसाधिते)  
धातूंना प्रत्यय लागुन जे शब्द तयार होतात, त्यांना “ कृदन्ते ” किंवा “ धातुसाधिते ” म्हणतात.  
○ उदाहरणार्थ  
खा - खाणारा, जा - जाताना, बस - बसून  

● (ब) तद्धिते (शब्दसाधिते)  
धातुखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून, जे नवीन शब्द तयार होतात त्यांना “ शब्दसाधिते ” किंवा “ तद्धिते ” म्हणतात.  
○ उदाहरणार्थ  
जड (विशेषण) - जडत्व (भाववाचक नाम) 
गाव (नाम) - गावकी (भाववाचक नाम)  
○ शब्दाच्या मूळ रूपाला “ प्रकृती ” म्हणतात तर त्यात बदल केल्यास “ विकृती ” म्हणतात. 

■ अभ्यस्त शब्द  
○ शब्दाची पुनरावृत्ती होवून जे शब्द बनलेले असतात त्यास “ अभ्यस्त शब्द ” म्हणतात. 
○ अभ्यस्त या शब्दाचा अर्थ दुप्पट करणे असा होतो. एकाच शब्दाची किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती होते. अशा तयार होणाऱ्या शब्दाला अभ्यस्त शब्द म्हणतात.  

□ अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार 
1. पूर्णाभ्यस्त शब्द 
2. अंशाभ्यस्त शब्द 
3. अनुकरणवाचक शब्द 

● (अ) पूर्णाभ्यस्त शब्द 
एक पूर्ण अर्थाचा शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो, अशा दोंन्ही शब्दांना अर्थ असतो; म्हणजेच द्विरुक्त शब्दाला “ पूर्णाभ्यस्त शब्द ” म्हणतात.  
○ यात एक पूर्ण शब्द पुन्हा येवून एक जोडशब्द बनतो. 
□ उदाहरण -: हळुहळू, लाललाल, मळमळ, भडभड, समोरासमोर, मधूनमधून. 

● (ब) अनुकरणवाचक शब्द 
○ ज्या शब्दात स्पष्ट किंवा अस्पष्ट, वास्तविक किंवा काल्पनिक ध्वनीवाचक किंवा त्या ध्वनींची पुनरावृत्ती /अनुकरण झालेले असते अशा शब्दांना “ अनुकरणवाचक ” किंवा “ नादानुकारी शब्द ” म्हणतात. 
○ यात ध्वनीवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते. 
□ उदाहरण -: बडबड, किरकिर, गडगड, फडफड, सरसर, गुटगुटीत, खळखळाट, टिकटिक, हळुहळू, सळसळ. 

● (क) अंशाभ्यस्त शब्द 
○ एक पुर्ण शब्द जसाच्या तसा पुन्हा न येता एखादे अक्षर बदलून येतो. त्यास “ अंशाभ्यस्त ” म्हणतात. 
○ जेव्हा पूर्ण शब्द पुन्हा जशाच्या तसा न येता एखादे अक्षर बदलून येते. अर्थात बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ नसतो, त्या जोडशब्दाला अंशाभ्यस्त शब्द म्हणतात.  
○ उदाहरण -: ड, झाबीड, शेजारीपाजारी, गडबिगड, बारीकसारीक, पार, र्धामुर्धा, कडे-तिकडे. 

■ अंशाभ्यस्त मध्ये कधी कधी एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येतात. 
फारसी + फारसी शब्द : अक्कलहुशारी, जुलुमजबरी  
फारसी + मराठी शब्द : खबरबात, कागदपत्र, बाजारहाट  
मराठी + फारसी शब्द : दंगामस्ती, थट्टामस्करी, रितीरिवाज

(B) मराठी भाषेतील एकूण सिद्ध शब्द

1. तत्सम शब्द (संस्कृतमधून - मराठीत : जसेच्या तसे)

..... राजा ..... संत ..... निस्तेज ..... कर ..... जगन्नाथ ...
..... कवि ..... गंध ..... दर्शन ..... उमेश ..... स्वामि ........
..... मंदिर ..... तिथी ..... सूर्य ..... स्वल्प ..... घृणा ........
..... मधु ..... पिंड ..... कलश ..... प्रात:काल ..... दंड ....
..... गुरु ..... जल ..... पत्र ..... ..... वाङ्निश्चय ..... उत्तम 
..... पिता ..... ग्रंथ ..... निर्माल्य ..... आकाश ..... पाप ..
..... भगवान ..... मंत्र ..... शिखर ..... सुत्र ..... कार्य ......
..... होम ..... पुत्र ..... भीति ..... गणेश ..... सभ्य .........
..... कन्या ..... पृथ्वी ..... देवर्षि ..... वृद्ध ..... संसार .....
..... भूगोल ..... प्रीत्यर्थ ..... पुरुष ..... विद्वान ..... कविता 
..... महर्षि ..... उपकार ..... परंतु ..... गायन ..... अश्रू .....
..... प्रसाद ..... यथामति ..... अब्ज ..... भोजन ..... यद्यपि
..... सन्मति ..... घंटा ..... पुण्य ..... बुद्धि ..... तट्टिका .....
..... वृक्ष ..... अभिषेक ..... संगती ..... श्राद्ध ..... नृप .....
..... धर्म ..... भोजन ..... प्रकाश ..... सत्कार ..... देवालय 
..... तारा ..... समर्थन ..... नयन ..... पुष्प ..... उत्सव .....
..... दुष्परिणाम ..... नैवेद्य ..... विश्राम ..... ऋण ..... राज्य 
..... विचार ..... तर्क ..... दुष्ट ..... विभूती ..... गीता .........
..... लीला ..... भगिणी ..... सेना ..... ..... पत्नी ..... मूर्ख 
..... विष ..... दही ..... कलश ..... क्लेश ..... राज्य ........

2. तद्भव शब्द (संस्कृतमधून - मराठीत : बद्दल होऊन)

भगिणी → बहिन ...... मर्कट → माकड ...... तृण → तण  
श्वसुर → सासरा ...... पाद → पाय ...... सर्प → साप 
देवालव → देऊळ ...... कर्म → काम ...... शर्करा → साखर 
पश्चाताप → पस्तावा ...... ग्रास → घास ...... स्वसृ → सासू 
अग्नी → आग ...... अश्रू → आसू ...... अंजुली → ओंजळ 
अज्ञानी → अडाणी ...... अंध → आंधळा ...... उद्यम → उद्योगी 
कंटक → काटा ...... क्षेत्र → शेत ...... धूम्र → धूर 
पय → पाणी ...... पंक → पंख ...... पेटिका → पेटी 
दुग्ध → दूध ...... कोमल → कोवळा ...... तक्र → ताक 
हस्त → हात ...... पर्ण → पान ...... विनति → विनंती 
कर्ण → कान ...... भ्राता → भाऊ ...... ग्राय → गाय 
चक्र → चाक ...... शीर्ष → शिर ...... दीप → दिवा 
मूल → मूळ ...... विश्राम → विश्रांती ...... घर्म → घाम
मस्तक → माथा ...... चंचू → चोच ...... शाला → शाळा 
कलश → कळस ...... नील → निळा ...... व्रण → वण 
काष्ठ → काठी ...... मार्जर → मांजर ...... वृश्चिक → विंचू 
वृद्धी → वाढ  ...... अरण्य → रान ...... मृदू → मऊ 
व्याघ्र → वाघ ...... पृष्ठ → पाठ ...... राज्ञी → राणी 
गृह → घर ...... मक्षिका → माशी ...... मुष्ठी → मुठ 
तृष्णा → तहान ...... पुत्र → पुत ...... पुष्प → फूल 
तैल → तेल ...... कुठार → कुर्‍हाड

3. देशी शब्द (मूळ मराठीतील शब्द)

..... घोडा ..... पोट ..... वांगे ..... रेडा ..... खुळा ..... दगड ...
..... डोळा ..... अवकळा ..... लाजरा ..... वेढा ..... गार .......
..... लाकूड ..... उनाडकी ..... पोरकट ..... ओटी ..... कंबर 
..... पीठ ..... चिमणी ..... बोका ..... वेडा ..... धोंडा ..... डोके 
..... अबोला ..... लूट ..... अंघोळ ..... उडी ..... शेतकरी ......
..... धपाधप ..... आजार ..... गुडघा ..... ढेकूण ..... झोप .....
..... झाड ..... फटकळ ..... रोग ..... ओढा ..... चोर .............
..... वारकरी ..... मळकट ..... धड ..... ओटा ..... लुगडे .......
..... डोंगर ..... उतरंड ..... ओसरी ..... डहाळी ..... बाजरी ...
..... जोंधळा ..... खेटर ..... घोसाळे ..... चिखल ..... हाड ....
..... हत्यार ..... उजेड ..... राघू ..... मुसकट ..... पाऊस .......
..... डिंक ..... लोटी ..... पेंढी ..... कचरा ..... पोळी .............

(C) मराठी भाषेतील उपसर्गघटित शब्द

1. संस्कृत उपसर्ग लागून बनलेले - उपसर्गघटित शब्द

■ संस्कृत उपसर्ग “ अ, आ, अनु, अप, अति, अव, अधि, अभि, उप, उत्, निः, परि, प्र, प्रति, वि, सम्, सु, स ” लागून तयार झालेले उपसर्गघटित शब्द. 

अ → अव्यय (अ+व्यय), अन्याय (अ+न्याय), अजिंक्य (अ+जिंक्य), अभय (अ+भय)

आ → आमरण (आ+मरण), आक्रोश (आ+क्रोश), आजन्म (आ+जन्म), आजीव (आ+जीव), आकर्ण (आ+कर्ण) (आ चे अर्थ - पासून, पर्यंत, पलिकडे)

अनु → अनुरूप (अनु+रूप), अनुकूल (अनु+कूल), अनुमती (अनु+मती), अनुभव (अनु+भव), अनुवाद (अनु+वाद), अनुस्वार, अनुकरण, अनुक्रम

अप → अपकीर्ती (अप+कीर्ती), अपवाद (अप+वाद), अपशकुन (अप+शकुन), अपशब्द (अप+शब्द), अपमान (अप+मान), अपराध (अप+राध), अपकार (अप+कार)

अति → अतिलोभ (अति+लोभ), अतिक्रमण (अति+क्रमण), अतिरेक (अति+रेक), अतिशय (अति+अशय), अत्यंत (अति+अंत), अतिप्रसंग (अति+प्रसंग)

अव → अवलक्षण (अव+लक्षण), अवतरण (अव+तरण), अवकृपा (अव+कृपा), अवगुण, अवनत (अव+नत), अवमान (अव+मान)

अधि → अध्यक्ष (अधि+अक्ष), अध्ययन (अधि+अयन), अधिकार (अधि+कार), अधिदैवत (अधि+दैवत), अधिपती (अधि+पती), अधिकरण (अधि+करण)

अभि → अभिनंदन (अभि+नंदन), अभिमान (अभि+मान), अभिरुची (अभि+रुची), अभिमुख, अभ्युदय (अभि+उदय)

उप → उपजीविका (उप+जीविका), उपप्रमुख (उप+प्रमुख), उपपद (उप+पद), उपकार (उप+कार), उपाध्यक्ष (उप+अध्यक्ष), उपवास (उप+वास), उपग्रह (उप+ग्रह)

उत् → उद्गम (उत्+गम), उद्ध्वस्त (उत्‌+ध्वस्त), उत्तीर्ण (उत्‌+तीर्ण), उत्तम (उत्‌+तम), उत्कर्ष (उत्‌+कर्ष), उत्पत्ती (उत्‌+पत्ती), उल्लेख (उत्‌+लेख)

निः → निरपराध (नि:+अपराध), नि:स्वार्थी (नि:+स्वार्थी), निर्धन (नि:+धन), निर्गत (नि:+गत), निरंतर (नि:+अंतर), निराकार (नि:+आकार), नि:शेष (नि:+शेष)

पारि → परिपक्व (परि+पक्व), परिवार (परि+वार), परिपाठ (परि+पाठ), परिश्रम (परि+श्रम), परिणाम (परि+णाम), परिपूर्ण (परि+पूर्ण), परिहार (परि+हार)

प्र → प्रवेश (प्र+वेश), प्रशाला (प्र+शाला), प्रयोग (प्र+योग), प्रसाद (प्र+साद), प्रकाश (प्र+काश), प्रगती (प्र+गती), प्रवाह (प्र+वाह), प्रबल (प्र+बल), प्रशांत (प्र+भशांत), प्रकृती (प्र+कृती), प्रवास (प्र+वास)

प्रति → प्रतिबिंब (प्रति+बिंब), प्रतिध्वनी (प्रति+ध्वनी), प्रत्येक (प्रति+एक), प्रतिदिन (प्रति+दिन), प्रतिकूल (प्रति+कूल), प्रतिकार (प्रति+कार), प्रतिज्ञा (प्रति+अज्ञा)

वि → विकार (वि+कार), विपत्ती (वि+पत्ती), विख्यात (वि+ख्यात), विज्ञान (वि+ज्ञान), विशेष (वि+शेष), विसंगती (वि+संगती), विकृती (वि+कृती)

सम्‌ → संशय (सम्‌+शय), संयोग (सम्‌+योग), संस्कार (सम्‌+कार), संगीत (सम्‌+गीत), संतोष (सम्‌+तोष), संगम (सम्‌+गम), संपादन (सम्‌+पादन), संताप (सम्‌+ताप)

सु → सुविचार (सु+विचार), सुगंध (सु+गंध), सुसह्य (सु+सह्य), सुकर (सु+कर), सुगम (सु+गम), सुभाषित (सु+भाषित), सुखत (सु+खत), सुदिन (सु+दिन)

स → सफल (स+फल), सकाम (स+काम), सप्रेम (स+प्रेम), सजीव (स+जीव)

2. मराठी उपसर्ग लागून बनलेले - उपसर्गघटित शब्द

■ मराठी उपसर्ग " आड, अव, नि, पड, फट, भर, अद, अ " लागून तयार झालेले उपसर्गघटित शब्द.
आड → आडवाट, आडकाळी, आडनाव, आडवळण, आडकाठी
अव → अवघड, अवकळा, अवदसा 
नि → निकोप, निकामी, निगर्वी, निनावी, निरिगी 
पड → पडछाया, पडताळा, पडसाद, पडजीभ 
फट → फटकळ, फटफजिती 
भर → भरदिवसा, भरजरी 
अद → अदमास, अदमुरे , अदपाव 
→ अजाण, अनोळखी, अडाणी, अबोल

3. फारसी व अरबी उपसर्ग लागून बनलेले - शब्द

■ फारशी व अरबी उपसर्ग " ऐन, कम, गैर, दर, बद, सर, हर " लागून तयार झालेले उपसर्गघटित शब्द.
ऐन - ऐनहंगाम, ऐनखर्च, ऐनदौलत, ऐनवेळ 
कम - कमकुवत,कमजोर, कमनशीब 
गैर - गैरसमज, गैरहजर, गैरमार्ग, गैरसोय 
दर - दररोज, दरमहा, दरसाल, दरमजल 
ना - नाकबूल, नाउमेद, नापसंद, नाइलाज 
बद - बदसूर, बदफैल, बदनाम 
सर - सरहद्द, सरदार, सरपंच, सरकार, सरचिटणीस 
हर - हरसाल, हरकाम्या, हरघडी, हररोज

(D) मराठी भाषेतील प्रत्ययघटित शब्द

1. संस्कृत प्रत्येय लागून बनलेले - प्रत्ययघटित शब्द

■ संस्कृत प्रत्यय " अक, इ-ई, अन, इक, अना, त, अनीय, तव्य, अ, ति, आ, य " लागून तयार झालेली कृदन्ते. (कृदन्त शब्द)
अक → रक्षक, पालक, जनक, लेखक, तारक, मारक
इ-ई → हरि, त्यागी 
अन → नयन, वदन, पालन, वंदन 
इक → रसिक, पथिक 
अना → तुलना, वेदना, कल्पना, प्रार्थना 
→ कृत, भूत, हत, रत, व्यक्त 
अनीय → पूजनीय, माननीय, रमणीय, श्रवणीय, वंदनीय 
तव्य → कर्तव्य, भवितव्य 
→ चोर, भाव, सर्प, लाभ 
ति → शक्ति, स्तुति, युक्ती 
→ चिंता, कथा, इच्छा 
→ कार्य, पेय, भोग्य

■ संस्कृत प्रत्यय " अ, इक, इत, ईन, कीय, त्व, मान " लागून तयार झालेले तद्धिते. (तद्धित शब्द)
→ पांडव, यादव, भार्गव 
इक → कायिक, पथिक, मानसिक, धार्मिक 
इत → मूर्च्छित, आनंदित, उत्कंठित 
ईन → नवीन, कुलीन, शालीन 
कीय → परकीय, स्वकीय, राजकीय 
त्व → महत्त्व, विद्वत्व, जडत्व, गुरुत्व
मान → श्रीमान, बुद्धिमान

2. मराठी प्रत्येय लागून बनलेले - प्रत्ययघटित शब्द

■ मराठी प्रत्यय लागून तयार झालेली धातुसाधिते. (कृदन्ते)
→ लूट, फूट, तूट, फोड, कर, डर 
→ ओढा, पुकारा, ठेचा, ठेवा, वेढा, झगडा 
आई → सफाई, शिलाई, खोदाई 
आऊ → टाकाऊ, विकाऊ, जळाऊ, शिकाऊ 
आरी → पिंजारी, पुजारी, रंगारी 
आळू → विसराळू, मायाळू, झोपाळू, लाजाळू
→ कढी, रडी, बुडी, बोली, ऊडी 
ईक → ठरावीक, खर्चीक, पडीक, सडीक 
ईत → सराईत, लखलखीत, चकचकीत 
ईव → रेखीव, घडीव, ओतीव, पाळीव, कोरीव 
ईर → फुगीर, फुटीर 
→ भोंदू, चालू, लागू, झाडू, उतारू 
ऊन → बसून, हसून, खाऊन, जाऊन 
खोर → चिडखोर, भांडखोर 
आवळ → दळणावळ, खाणावळ, धुणावळ 
→ वाढप, कांडप, दळप 
पी → दळपी, वाढपी, कांडपी 
णारा → बोलणारा, नाचणारा, पिणारा, गाणारा 
रा → कापरा, नाचरा, हसरा, दुखरा

■ मराठी प्रत्यय लागून तयार झालेली तद्धित शब्द.
→ वेढा, ओढा 
आई → शिष्टाई, लढाई 
→ चोरी, सावकारी 
कर → दिनकर, प्रभाकर, सुखकर 
करी → भाडेकरी, शेतकरी, वारकरी 
कट → मळकट, पोरकट 
की → शेतकी, पाटीलकी, गावकी
खोर → चेष्टेखोर, चिडखोर, चहाडखोर 
वाईक → तऱ्हेवाईक, नातेवाईक 
सर → काळसर, ओलसर, वेडसर

3. फारसी व अरबी प्रत्येय लागून बनलेले - शब्द

■ फारशी व अरबी प्रत्यय लागून तयार झालेले तद्धित शब्द.
- मजुरी, नेकी, हमाली, खुशी 
गिरी - कारागिरी, गुलामगिरी 
दाणी - पिकदाणी, अत्तरदाणी 
बाज - दगलबाज, दारूबाज 
नामा - करारनामा, पंचनामा 
बंद - चिरेबंद, हत्यारबंद, नालबंद 
स्ताना - कब्रस्तान, पाकिस्तान, तुर्कस्तान 
दार - दुकानदार, पोतदार 
दान - कलमदान 
खाना - तोफखाना, कारखाना 
णीस - पोतणीस, चिटणीस, फडणीस

(E) मराठी भाषेत वापरात येणारे परभाषिय शब्द

1. फारशी शब्द (फारशीमधून - मराठीत)

...... हकिकत ...... सामान ...... पोशाख ...... पेशवा ..........
...... खाना ...... अब्रू ...... अत्तर ...... सौदागर ...................
...... कामगार ...... फडनवीस ...... गुन्हेगार ...... शरमिंदा ...
...... नोकरी ...... गजल ...... दिवाणखाना ...... गुलाब .......
...... बारदान ...... गालिचा ...... बाजार ...... जुलूम ...........
...... अक्कल ...... हुशारी ...... बगिचा ...... बागाईत .........
...... मस्ती ...... दौलत ...... मस्करी ...... डावपेच .............
...... जबरी ...... मेवा ...... मिठाई ...... कागद ...... पालखी 
...... इनाम (फारशी/अरबी) ...... खलाशी ...... दवाखाना ....

2. अरबी शब्द (अरबीमधून - मराठीत)

...... मेहनत ...... हुकूम ...... खर्च ...... मंजूर ...... जाहीर 
...... ऊर्फ ...... अर्ज ...... मनोरा ...... बाद ...... मुदत .....
...... बदल ...... ऐनजमाबंदी ...... ऐनहंगाम .................
...... ऐन आमदनी ...... मालक ...... साहेब ...... शाहीर ..

3. पोर्तूगीज शब्द (पोर्तूगीजमधून - मराठीत)

...... बटाटा ...... तंबाखू ...... घमेले ...... पगार .............
...... बिजागरी ...... कोष्टी ...... फणस ...... हापूस ........
...... पायरी ...... कोबी ...... मेज ...... लोणचे ..............
...... बिस्कीट ...... पाव ...... साबण ...... परात ............
...... लिंबू ...... संत्रा ...... तुरूंग ...... पेरू ...... साबुदाना

4. इंग्रजी शब्द (इंग्रजीमधून - मराठीत)

...... एजंट ...... टेबल ...... बस ...... डॉक्टर ...........
...... सायकल ...... रेडिओ ...... टेलिफोन ..............
...... सिनेमा ...... सर्कस ...... फाईल ...... स्टेशन .... 
...... मास्तर ...... पार्सल ...... पँट ...... बॅट ...... बॉल

5. कानडी शब्द (कानडीमधून - मराठीत)

......भाकरी ...... तूप ...... कुंची ...... कांबळे ...... अक्का 
...... अण्णा ...... अडकित्ता ...... खलबत्ता ...... विळी ....
...... गुढी ...... किल्ली ...... चाकरी ...... तंदूर ...... आई 
...... रजई ...... चिंधी ...... चिंच ...... खोबरे ...... कणीक 
...... उत्तापा ...... चिमटा ...... दाभण ...... गाजर ...... नथ 
...... बांगडी ...... तांब्या ......हंडा ...... उडीद ...... पाट ...
...... गाल ...... काका ...... टाळू ...... गादी ...... खिडकी 
...... गच्ची ...... ताई ...... बांबू ...... चिरगूट ...... अप्पा ...
...... कोलदांडा ......  गोंधळ ...... उपीट ...... भंगार ........
...... मुंडासे ...... आवळा ...... कोशींबीर ...... यळकोट ..
...... अच्छेर ...... गडंगनेर ...... लवंग ...... झुरळ ...........
...... विठोबा ...... परडी ...... कनीक ...... पडवळ .........
...... उसळ ...... कडबोळी ...... दोसा ...... अमसोल ......
...... गाडगे ...... दोडकी ...... पगडी ...... गुंडी ...............
...... खळ ...... खिसा ...... चप्पल ...............................

6. हिंदी शब्द (हिंदीमधून - मराठीत)

...... दिल ...... करोड ...... दाम ...... बात ....
...... भाई ...... और ...... बच्चा ...... मुहावरा 
...... नानी ...... इमली ...... तपास .............

7. गुजराती शब्द (गुजरातीमधून - मराठीत)

...... दादर ...... घी ...... शेट ...... डबा ...... दलाल ............
...... रिकामटेकडा ...... घरी ...... खादी ...... गर्बा .............
...... गिलके ...... हवेली ...... सदरा ...... मलमपट्टी ...........
...... आवकजावक ......छोकरा ...... घरजमाई ...... ढोकळा

8. तेलगू शब्द (तेलगूमधून - मराठीत)

...... अनारसा ...... किडूक-मिडूक ...... ताळा ...... बंडी 
...... शिकेकाई ...... टाळे ...... गदारोळ ...... विटीदांडू

9. तामिळी शब्द (तामिळीमधून - मराठीत)

...... चिल्लीपिल्ली ...... सार ...... मठ्ठा ...... भेंडी 
...... मांजरपाट ...... टेंगूळ ...... डबी ................

10. इतर - कोकणी, फ्रेंच, तुर्की, जपानी, रशियन शब्द

कोकणी 
→ गजाली 
फ्रेंच 
→ काडतूस, फिरंगी, बाक, कुपन, फसगत 
तुर्की 
→ बंदुक, कुर्निसात 
जपानी 
→ रिक्षा, हाराकिरी, हायकू, त्सुनामी 
रशियन 
→ स्फूटनिक

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव