प्रकरणचे नाव - समास

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - समास

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) समास व समासाची उजळणी

1. व्याख्या : समास, सामासिक शब्द व विग्रह

दोन किंवा अधिक शब्द एकत्र होण्याच्या पध्दतीला " समास " म्हणतात. 
○ शब्दांच्या अशा एकत्र येण्याने जो शब्द तयार झालेला असतो, त्यास " सामासिक शब्द " म्हणतात आणि या सामासिक शब्दाची फोड करून दाखविण्याच्या पध्दतीला " सामासिक विग्रह " म्हणतात.

□ उदाहरणार्थ 
सामासिक शब्द ----: वनभोजन, राजपुत्र 
सामासिक विग्रह ---: वनातील भोजन, राजाचा पुत्र 
○ समासात दोन शब्द एकत्र आलेले असतात. 
○ शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात.
○ शब्दाच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द असे म्हणतात.
○ सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे, हे स्पष्ट करण्यासाठी शब्दाची फोड करतो, त्यास सामासिक विग्रह असे म्हणतात.

2. व्याख्या : समासाची पदे (प्रमुख व गौण)

■ समासात शब्दांना पद म्हणतात. 
○ समासात कमीत कमी दोन पदे असतात. 
□ उदाहरणार्थ 
1. रामलक्ष्मण : राम आणि लक्ष्मण 
→ राम - (पहिले पद) , लक्ष्मण - (दुसरे पद)
○ समासामध्ये कमीत कमी दोन पदे असतात (एकत्र येतात) त्या वरून त्याशब्दापैकी कोणते पद महत्त्वाचे आहे यावरून समासाचे प्रकार सांगता येते.

■ समासात कमीत कमी दोन शब्द किंवा पदे एकत्र येतात. 
○ दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला वाक्यात अधिक महत्त्व, म्हणजे कोणत्या पदाबद्दल आपल्याला अधिक बोलावयाचे असते, यावरून समासाचे चार प्रकार ठरविण्यात आलेले आहेत; ते असे.
1. पहिले पद मुख्य + दुसरे गौण = अव्ययीभाव समास 
2. दुसरे पद मुख्य + पहिले गौण = तत्पुरुष समास 
3. दोन्ही पदे मुख्य = द्वंद्व समास 
4. दोन्ही पदे महत्त्वाची नसणे (गौण) = बहुव्रीही समास

3. समासाचे मुख्य चार प्रकार व उजळणी

■ समासाचे प्रमुख चार प्रकार पडतात.
1. अव्ययीभाव - समास
2. तत्पुरुष - समास 
3. द्वंद्व - समास 
4. बहुव्रीही - समास 
□ समासात पदाला (शब्दाला) महत्त्व असते.
अव्ययीभाव समास .... ( प्रथम - पद प्रधान )
तत्पुरुष समास .......... ( द्वितीय - पद प्रधान )
द्वंद्व समास ................ ( दोन्ही - पदे प्रधान )
बहुव्रीही समास .......... ( दोन्ही - पदे गौण )

■ 1. अव्ययीभाव समास (पूर्वपद प्रधान
○ जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो, तेव्हा “ अव्ययीभाव समास ” होतो. 
○ अव्ययीभाव समासाला " प्रथमपदप्रधान समास " असे म्हणतात.
संस्कृतफारसी उपसर्ग लागून तयार झालेले सामासिक शब्द हे अव्ययीभाव समास असते.
□ उदाहरण -: जन्म, यथाशक्ती, प्रतिदिन, प्रतिक्षण, मरण, दररोज, हरघडी, गैरशिस्त, बरहुकूम, बिनशर्त
○ संस्कृतमध्ये उपसर्गांना अव्ययेच मानतात. हे उपसर्ग प्रारंभी लागून बनलेले वरील शब्द हे सामासिक शब्द आहेत.
मराठीत शब्दांची द्विरुक्ती होऊन बनलेले जोडशब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात. 
□ उदाहरण -: गावोगाव, पदोपदी, घरोघर, दारोदार, दिवसेंदिवस
Trick - पहिले पद प्रधान (प्रमुख) असते. स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक शब्द व क्रियाविशेषणसारखा वापर असते.

■ 2. तत्पुरुष समास (उत्तरपद प्रधान
□ ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तिप्रत्यय विग्रह करताना घालावा लागती. त्यास “ तत्पुरुष समास ” असे म्हणतात.
○  उदाहरण -:  तोंडपाठ (तोंडाने पाठ), कंबरपड्डा (कंबरेसाठी पट्टा), महादेव (महान असा देव), अनिष्ट (नाही इष्ट ते).
□ तत्पुरुष समासातील दोन्ही पदे कधी कधी विग्रहाच्या वेळी एकाच विभक्तीत असतात. यास समानाधिकरण तत्पुरुष समास असे म्हणतात.
○  उदाहरण -: काळमांजर (काळे असे मांजर)  
□ तत्पुरुष समासात कधी कधी दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. या प्रकारास व्यधिकरण तत्पुरुष असे म्हणतात.
○  उदाहरण -: देवपूजा (देवाची पूजा) 
● Trick - यात दुसरे पद प्रधान (प्रमुख) असते. दोन घटकांचा उल्लेख होतो; परंतु फक्त दुसऱ्याघटकाचे अस्तित्व जाणवते.

■ 3. द्वंद्व समास (उभयपदप्रधान)
○ ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान (उभयपदप्रधान) म्हणजे समान दर्जाची असतात, त्यास “ द्वंद्व समास ” असे म्हणतात. 
○ “ आणि, व, अथवा, किंवा ” या उभयान्वयी अव्ययांनी ही पदे जोडलेली असतात. 
उभयपदप्रधान म्हणजे ज्यात दोन्ही घटकांचा अर्थ मुख्यतः सारखाच महत्त्वाचा असतो. 
□ उदाहरण-: रामलक्ष्मण (राम आणि लक्ष्मण), पापपुण्य (पाप किवा पुण्य), विटीदांडू (विटी आणि दांडू) 
● Trick - यात दोन्ही पदे प्रधान (प्रमुख) असतात. दोन घटकांचा उल्लेख होतो व समान दर्जाची असतात.  

■ 4. बहुव्रीही समास 
□ जेव्हा सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्यास “ बहुव्रीही समास ” म्हणतात. 
○ हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते. 
□ उदाहरणार्थ 
१. पार्वतीने नीलकंठास वरले. (शंकर)
२. समुद्राने पीतांबराला आपली कन्या दिली. (विष्णू)
● Trick - यात दोन्ही पदे महत्वाची (प्रमुख नसून ) तिसऱ्याच पदाचा बोध. उल्लेख केलेल्या घटकांपेक्षा तिसराच घटक डोळ्यासमोर येतो.

(B) अव्यायीभाव समासाचे उपप्रकार व उजळणी

1. संस्कृत उपसर्ग लागून बनलेले - अव्यायीभाव समास

■ " आ, यथा, प्रति, यावत्‌, वि, नि " हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द हे "अव्यायीभाव समासात" मोडतात.

■ सामासिक शब्द - विग्रह 
आजन्म - जन्मापासून (काल) 
आमरण - मरेपर्यंत (काल) 
यथाक्रम - क्रमाप्रमाणे (रीत) 
प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला (काल) 
यथान्याय - न्यायाप्रमाणे (रीत) 
यथाविधी - विधीप्रमाणे (रीत) 
प्रतिवर्ष - प्रत्येक वर्षाला (काल) 
यथावकाश - अवकाशाप्रमाणे (काल) 
व्यर्थ - अर्थाशिवाय (रीत) 
यावज्जीव - जीव असेपर्यंत (काल) 
यथास्थित - स्थितीप्रमाणे (रीत) 
आकर्ण - कानापर्यंत (स्थल) 
आकंठ - कंठापर्यंत (स्थल) 
आलोचन - लोचनापर्यंत (स्थल) 
असेतुहिमाचल - सेतूपासून हिमालयापर्यंत (स्थल) 
आमुलाग्र - मुळापासून आग्रापर्यंत (स्थल)
आचंद्रसूर्य - चंद्र सुर्य असेपर्यंत (काल) 
नि:संशय - संशयाशिवाय (रीत) 
विनाकारण - कारणाशिवाय (रीत)

2. फारशी उपसर्ग लागून बनलेले - अव्यायीभाव समास

■ " बे, दर, गैर, हर, बर, बिन, बेला " हे फारशी व अरबी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द हे "अव्यायीभाव समासात" मोडतात.

■ सामासिक शब्द - विग्रह 
दरसाल - प्रत्येक वर्षी (काल) 
हररोज - प्रत्येक दिवशी (काल) 
बिनधास्त - धास्तीशिवाय (रीत) 
बेशक - शंका न घेता/शंकेशिवाय (रीत) 
बेलाशक - शंका न घेता/शंकेशिवाय(रीत) 
गैरहजर - हजेरीशिवाय/विरुद्ध (रीत) 
बिनधोक - धोक्याशिवाय (रीत) 
बिनचूक - चुकीशिवाय (रीत) 
बरहुकूम - हुकुमाप्रमाणे (रीत) 
बिनशर्त - शर्तीशिवाय (रीत) 
गैरशिस्त - शिस्तीशिवाय / विरुद्ध (रीत ) 
दररोज - प्रत्येक दिवशी (काल) 
बेमालूम - माहितीशिवाय (रीत) 
दरडोई - प्रत्येक व्यक्ती (स्थल) 
दरमजल - प्रत्येक मजल (स्थल) 
बेसिस्त - शिस्तीशिवाय (रीत) 
बेभान - भानाशिवाय (रीत) 
बेलगाम - लगामाशिवाय (रीत) 
बेकायदा - कायद्याशिवाय (रीत) 
दरचूक - प्रत्येक चुकीला (रीत)

3. मराठी शब्द पुनरावृत्तीत झालेले - अव्यायीभाव समास

■ " मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द हे "अव्यायीभाव समासात" मोडतात. 
○ मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात.

■ सामासिक शब्द - विग्रह 
घरोघरी - प्रत्येक घरी (स्थल) 
वारंवार - प्रत्येक वारी/दिवशी (काल) 
पानोपानी - प्रत्येक पानात (स्थल) 
गल्लोगल्ली - प्रत्येक गल्लीत (स्थल) 
दिवसेंदिवस - प्रत्येक दिवशी (काल) 
दारोदार - प्रत्येक दारी (स्थल) 
जागोजागी - प्रत्येक जागी (स्थल) 
पावलोपावली - प्रत्येक पावलाला (स्थल) 
वृक्षागणिक - प्रत्येक वृक्षाला (स्थल) 
माणसागणिक - प्रत्येक माणसाला (स्थल) 
मधोमध - अगदी मध्यभागी (स्थल) 
खरोखर - अगदी खरे (रीत)

(C) तत्पुरुष समासाचे उपप्रकार व उजळणी

1. विभक्ती - तत्पुरुष समास

■ ज्या तत्पुरुष समासात कोणत्यातरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास “ विभक्ती तत्पुरुष समास ” म्हणतात.

■ द्वितीय - विभक्ती तत्पुरुष समास
□ सामासिक शब्द - विग्रह 
सुखप्राप्त - सुखाला प्राप्त 
दु:खप्राप्त - दु:खाला प्राप्त 
देशगत - देशाला गेलेला
व्याकरण 
द्विजदंड - द्विजास दंड 
रामशरण - रामाला शरण 
कल्पनातीत - कल्पनेला अतित 
आत्मगत - आत्म्याला गत

■ तृतीया - विभक्ती तत्पुरुष समास
□ सामासिक शब्द - विग्रह 
तोंडपाठ - तोंडाने पाठ 
मातृसदृश - मातेशी सदृश 
कपाळकरंटा - कपाळाने करंटा 
तत्सम - त्याशी सम 
नखभिन्न - नखाने भिन्न 
कृपावलोकन - कृपेने अवलोकन 
मन:कल्पित - मनाने कल्पित 
गजमोजणी - गजाने मोजणी 
दुप्पट - दोहोनी जी पट ती 
उपासमार - उपासाने मार 
तोंडजबाणी - तोंडाने जबाणी 
द्रव्यसाध्य - द्रव्याने साध्य 
ईश्वरनिर्मित - ईश्वराने/कडून निर्मित 
भक्तिवश - भक्तीने वश 
बुद्धिजड - बुद्धीने जड 
गुणहीन - गुणाने हीन 
दयार्द्र - दयेने आर्द्र 
मतीमंद - मतीने मंद 
प्यादेमात - प्याद्याने मात 
चौपट - चाऱ्हींनी जी पट ती 
देवदत्त - देवाने दिलेला 
एकोन - एकाने उणा

■ चतुर्थी - विभक्ती तत्पुरुष समास
□ सामासिक शब्द - विग्रह 
क्रीडांगण - क्रीडेसाठी अंगण 
सचिवालय - सचित्रासाठी आलय 
कृष्णार्पण - कृष्णाला अर्पण 
कृष्णाश्रित - कृष्णास आश्रित 
गायरान - गाईंसाठी रान 
राजाश्रित - राजास आश्रित
तपाचरण - तपासाठी आचरण 
पूजाद्रव्य - पूजेसाठी द्रव्य 
ब्राह्मणभोजन - ब्राह्मणासाठी भोजन
बाईलवेडा - बाईसाठी वेडा 
मेंढवाडा - मेंढायांसाठी वाडा 
डोईजड - डोक्यासाठी जड 
पोळपाट - पोळ्यांसाठी पाट 
कमरपट्टा - कमरेसाठी पट्टा 
वाटखर्च - वाटेसाठी खर्च 
चोळखण - चोळीसाठी खण 
परपीडा - दुसऱ्यासाठी पीडा 
विद्यागृह - विद्येसाठी गृह 
अनाथाश्रम - अनाथांसाठी आश्रम 
गावजेवण - गावासाठी जेवण 
ज्ञानयज्ञ - ज्ञानासाठी यज्ञ 
प्रयोगशाळा - प्रयोगासाठी शाळा 
घटमृत्तिका - घटासाठी मृत्तिका 
गुरुदक्षिणा - गुरुसाठी दक्षिणा

■ पंचमी - विभक्ती तत्पुरुष समास
□ सामासिक शब्द - विग्रह 
सेवानिवृत्त - सेवेतून निवृत्त 
स्वर्गपतित - स्वर्गातून पतित 
जन्मस्वभाव - जन्मापासून स्वभाव 
लंगोटीयार - लंगोटीपासून यार/मित्र 
ऋणमुक्त - ऋणातून मुक्त 
स्वर्गभ्रष्ट - स्वर्गातून भ्रष्ट 
रोगमुक्त - रोगातून मुक्त 
गर्भगळीत - गर्भातून गळीत 
चोरभय - चोरांपासून भय 
जातिभ्रष्ट - जातीतून भ्रष्ट 
जन्मखोड - जन्मापासून खोड 
स्थानभ्रष्ट - स्थानातून भ्रष्ट 
पदच्युत - पदातून च्युत (काढलेला) 
भवतारण - विश्वातून तारण 
वडिलोपार्जित - वडिलांपासून अर्जित 
तदभिन्न - त्यापासून भिन्न 
बालमित्र - बालपणापासून मित्र

■ षष्ठी - विभक्ती तत्पुरुष समास
□ सामासिक शब्द - विग्रह 
भगिनीमंडळ - भगिनींचे मंडळ 
पिंपळपान - पिंपळाचे पान 
नदीकाठ - नदीचा काठ 
मगरमिठी - मगरेची मिठी 
घरधनी - घराचा धनी 
हातचाळ - हाताचा चाळ
वाघनख - वाघाचे नख 
तोंडसूख - तोंडाचे सूख 
गावकूस - गावाची कूस 
गायमुख - गाईचे मुख 
आपमतलब - स्वत:चा मतलब 
प्रेमपत्र - प्रेमाचे पत्र 
आंबराई - आंब्यांची राई 
राजपुत्र - राजाचा पुत्र 
राजवाडा - राजाचा वाडा 
घोडदौड - घोड्यांची दौड 
केळफूल - केळाचे फूल 
विद्याभ्यास - विद्येचा अभ्यास 
भूपती - भूमिचा पती/रक्षणकर्ता 
घरमालक - घराचा मालक
गणपती - गणाचा पती 
नदीकाठ - नदीचा काठ 
राजमंदिर - राजाचे मंदिर 
सीताकांत - सीतेचा कांत 
गावदेवी - गावाची देवी 
तळघर - तळाचे घर 
लक्ष्मीकांत - लक्ष्मीचा कांत 
आंबराई - आंब्यांची राई 
भूपती - भूमिचा पती 
देशभक्ती - देशाची भक्ती 
सूर्योदय - सूर्याचा उदय

■ सप्तमी - विभक्ती तत्पुरुष समास
□ सामासिक शब्द - विग्रह 
युद्धचातुर्य - युद्धातील चातुर्य 
प्रसंगावधान - प्रसंगातील अवधान 
घरजावई - घरातील जावई 
मध्यस्त - मध्ये असणारा 
गृहप्रवेश - घरात प्रवेश 
दानशुर - दानात शूर 
वनगाय - वनातील गाय 
गावदेवी - गावातील देवी 
कृषीपंडित - कृषीतील पंडित 
घरधंदा - घगतील धंदा 
कूपमंडूक - कुपातील मंडूक 
शास्त्रपंडित - शास्त्रात पंडित 
वनभोजन - वनातील भोजन 
पाणकोंबडा - पाण्यातील कोंबडा 
पाणसाप - पाण्यातील साप 
स्वर्गवास - स्वर्गातील वास 
पोटशूळ - पोटातील शूळ 
कुलोत्पन्न - कुळात उत्पन्न 
कलाकुशल - कलेत कुशल 
गृहप्रवेश - गृहात प्रवेश 
रानडुक्कर - रानातील डुक्कर 
रणशूर - रनातील शूर

2. उपपद - तत्पुरुष समास

■ ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते " धातुसाधित असते (कृदंत) व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही, त्यास " उपपद किंवा कृदंत किंवा उभय तत्पुरुष समास " म्हणतात. शेवटी येणारा शब्द (धातू + प्रत्यय = धातुसाधित)

■ सामासिक शब्द - विग्रह 
नीरज - नीरात (पाण्यात) जन्मणारा 
पंकज - पंकात (चिखलात) जन्मणारे 
कुंभकारा - कुंभ करणारा 
जलद - जल देणारे 
ग्रंथकार -  ग्रंथ करणारा 
सुखद - सुख देणारे 
शेतकरी - शेती करणारा 
द्विज - दोनदा जन्मणारा (पक्षी, ब्राह्मण, दात) 
लाचखाऊ - लाच खाणारा
आगलाव्या - आग लावणारा 
खग - आकाशात गमन करणारा 
मार्गस्थ - मार्गावर असलेला
नाकतोड्या - नाक तांडणारा 
बोटचेपे - बोटे चेपणारे
घरबुडवे - घर बुडवणारे 
बाजारबसवी - बाजार बसविणारी 
म्लानमुख - मलिनमुख असलेला 
अग्रज - आधी जन्मलेला 
अनुज - मागाहून जन्मलेला 
अण्डज - अंड्यात जन्मलेला 
शेषशायी - शेषावर निजणारा 
पाखरेविक्या - पाखरे विकणारा 
विहंग - आकाशात गमण करणारा 
भुजंग - भुजांनी गमण करणारा 
सेवेकरी - सेवा करणारा 
मळेकरी - मळा करणारा 
वाटेकरी - वाट्याने करणारा 
मारेकरी - ठार मारणारा 
लोहार - लोह काम करणारा 
नृप - नराचे पालन करणारा 
भूप - भूमिचे पालन करणारा 
सूज्ञ - चांगले ज्ञान असणारा 
कृतज्ञ - उपकाराची जाणीव ठेवणारा 
लाकूडतोड्या - लाकूड तोडणारा 
वाढपी - जेवण वाढणारा 
तंत्रज्ञ - तंत्र जाणणारा 
आत्मज - आत्म्यातून जन्मणारा 
वरद - वर देणारा 
जन्मदा - जन्म देणारी 
तटस्थ - तटावर असणारा 
देशस्थ - देशात राहणारा

■ महत्त्वाचे : वरील प्रकारात धातुसाधित शेवटी असते; परंतु खालील शब्दात धातुसाधित सुरुवातील आल्याने याला " धातुपूर्वपद तत्पुरुष समास " असे म्हणतात. 
■ सामासिक शब्द - विग्रह 
कोंडवाडा - कोंडण्यासाठी वाडा 
सोडचिठ्ठी - सोडण्यासाठी चिठ्ठी 
सांडपाणी - सांडलेले पाणी 
खोदकाम - खोदण्याचे काम 
सरगाठ - सरकणारी गाठ 
जोडाक्षर - जोडलेले अक्षर

3. नञ - तत्पुरुष समास

■  ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे " अ, अन्‌, न, ना, बे, नि, गैर " यांसारख्या अभाव किंवा निषेधदर्शक उपसर्गाने सुरू होते त्यास " नञ तत्पुरुष समास " म्हणतात.

■ सामासिक शब्द - विग्रह 
नापसंत - पसंत नसलेला 
अशक्य - शक्‍य नसलेला 
बेकायदा - कायदेशीर नसलेले 
अन्याय - न्याय नसलेला 
अहिंसा - हिंसा नसलेला 
अयोग्य - योग्य नसलेला 
अनादर - आदर नसलेला 
निरोगी - रोग नसलेला 
नाइलाज - इलाज नसलेला 
बेडर - डर नसलेला 
निर्दोष - दोष नसलेला
बेसावध - सावध नसलेला 
अपूर्ण - पूर्ण नसलेला
अचल - चल नसलेला 
अजाण - जाण नसलेला 
अशक्त - शक्ती नसलेला 
असत्य - सत्य नसलेला 
अनुत्तीर्ण - उत्तीर्ण नसलेला 
अनलस - आळस नसलेला 
नालायक - लायक नसलेला 
गैरशिस्त - शिस्त नसलेला 
अक्षय - क्षय नसलेला 
अनीती - नीती नसलेला 
अप्रिय - प्रिय नसलेला 
अनैच्छिक - ऐच्छिक नसलेला 
अनाचार - आचार नसलेला 
अनासक्ती - आसक्ती नसलेला 
अनभिज्ञ - माहिती नसलेला 
गैरलागू - लागू नसलेला 
अधर्म - धर्म नसलेला 
बेशिस्त - शिस्त नसलेला 
नाउमेद - उमेद नसलेला

4. अलूक - तत्पुरुष समास

■ ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्तिप्रत्ययाचा लोप होत नाही, त्यास “ अलुक्‌ तत्पुरुष समास ” असे म्हणतात.
○ तत्पुरुष समास तयार करताना पूर्व पदाचा विभक्ती प्रत्यय लोप करावा लागतो; परंतु या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या " ई " विभक्तिप्रत्ययाचा लोप होत नाही.
○ अलुक म्हणजे लोप न पावणारे

■ सामासिक शब्द - विग्रह 
पंकेरूह (चिखलात वाढणारा) 
कर्मणीप्रयोग (ई) 
कर्तरीप्रयोग (ई) 
तोंडी लावणे (मराठीतील उदाहरण) (ई) 
अग्रेसर (अग्रात पुढे) 
युधिष्ठिर (युद्धात स्थिर) 
खेचर (आकाशात संचार करणारा) 
सरसिज (सरोवरात जन्मणारे-कमळ) 
मनसिज (मनात जन्मणारे) 
खिसेकापू (ई) 
पहारेकरी (पहाऱ्यात असणारा) 
गळेकापू (ई) 
दीनानाथ  (ई) 

■ महत्त्वाचे : सरसिज, मनसिज, पहारेकरी, गळेकापू, खिसेकापू, कडेलोट, खिसेकतरू यासारख्या शब्दात अलुकउपपद अशा दोन्हीही तत्पुरुष समासाची लक्षणे असतात. म्हणून या शब्दांना काही लेखक " उभयविध तत्पुरुष समाससुद्ध " म्हणतात.

5. मध्यमपदलोपी - तत्पुरुष समास

■ सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारी मधली काही पदे लोप केली जाते, अशा समासाला " मध्यमपदलोपी समास " किंवा " लुप्तपद कर्मधारय समास " असे म्हणतात. 
○ ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसर्‍या पदाशी संबंध दाखविणारा शब्द लुप्त असतो व विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते त्यास मध्यमपद लोपी समास म्हणतात. (खाद्य पदार्थ, नातेसंबंध हे समास दर्शवीतात)

■ सामासिक शब्द - विग्रह 
साखरभात - साखर घालून केलेला भात 
पुरणपोळी - पुरण घालून केलेली पोळी 
कांदेपोहे - कांदे घालून केलेले पोहे 
घोडेस्वार - घोडा असलेला स्वार 
चुलत सासरा - नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा 
गुरुबंधू - गुरूचा शिष्य या नात्याने बंधू 
मावसभाऊ - मावशीचा मुलगा या नात्याने भाऊ 
मामेभाऊ - मामाचा मुलगा या नात्याने भाऊ 
गुळांबा - गुळ घालून केलेला आंबा 
वांगीभाता - वांगी घालून केलेला भात 
भोजनभाऊ - भोजनापुरता भाऊ 
पायदळ - पायी चालणारे दल 
नातजावई - नातीचा नवरा या नात्याने जावई 
आजेसासरा - नवऱ्याचा आजोबा या नात्याने 
बालमित्र - बाल वयात असल्यापासूनचा मित्र 
कल्पवृक्ष - कल्पिलेली वस्तू देणारा वृक्ष

6. कर्मधारय - तत्पुरुष समास

■ ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत, प्रथमा विभक्तीत असतात, तेव्हा त्यास " कर्मधारय समास " असे म्हणतात.
○ कर्मधारय समासाला समानाधिकरण समास असे सुद्धा म्हणतात, कारण विग्रह केल्यावर दोन्ही पदे सारख्या (एकाच) विभक्तीतच असतात. 
○ या दोन्ही पदांचा संबंध , विशेषणविशेष्य किंवा विशेषण व विशेषण स्वरूपाचा असतो म्हणून या सामासास कर्मधारय समास म्हणतात.

■ शब्दांच्या स्वरूपावरून कर्मधारय समासाचे सहा प्रकार पडतात. 
1. विशेषण पूर्वपद - कर्मधारय समास
2. विशेषण उत्तरपद - कर्मधारय समास
3. विशेषण उभयपद - कर्मधारय समास
4. उपमान पूर्वपद - कर्मधारय समास
5. उपमान उत्तरपद - कर्मधारय समास
6. रुपक उभयपद - कर्मधारय समास

■ (1) विशेषण पूर्वपद - कर्मधारय समास
○ सामासिक शब्दातील पहिले पद (पूर्व) विशेषण असते.
○ यातील प्रथम पद विशेषण तर दुसरे नाम असते. 
■ सामासिक शब्द - विग्रह 
रक्तचंदन - रक्तासारखे चंदन 
महाराज - महान असाराजा
पीतांबर - पिवळे असे वस्त्र 
महादेव - महान असा देव 
महाराष्ट्र - महान असे राष्ट्र 
काळमांजर - काळे असे मांजर 
सावळाराम - सावळा असा राम 
तांबडी माती - तांबडी अशी माती 
पोकळ खर्च - पोकळ असा खर्च 
भोलानाथ - भोळा असा नाथ 
खडीसाखर - खडी सारखी साखर 
साडेतीन - अर्ध्यासह तीन 
शेंडेनक्षत्र - शेंडी असणारे नक्षत्र 
एकोनतीस - एक उने तीस 
नीलकमल - नीळे असे कमल 
दिव्यदृष्टी - दिव्य अशी दृष्टी 
श्वेतकमल - पांढरे असे कमळ  
घननीळ - निळा असा घन 
महामानव - महान असा मानव 
सुवचन - चांगले असे वचन 
शुभवर्तमान - चांगले असे वर्तमान 
पूर्वरात - पूर्व अशी रात 
दुष्टस्वभाव - दुष्ट असा स्वभाव 
परमेश्वर - परम असा ईश्वर
शीतलतनू - शीतल अशी तनू 
पिठीसाखर - पिठासारखी साखर
साडे तीन - अर्ध्यासह तीन

■ (2) विशेषण उत्तरपद - कर्मधारय समास
○ सामासिक शब्दातील दुसरे पद विशेषण असते.
○ यामध्ये पहिले पद नाम तर दुसरे विशेषण असते. 
■ सामासिक शब्द - विग्रह 
वेशांतर - दुसरा वेश , अन्य वेश
भाषांतर - अन्य भाषा
पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष 
घननील - निळा असा घन 
श्रुतिमघुर - मधुर श्रुती 
अवस्थांतर - अन्य अशी अवस्था 
धर्मांतर - दुसरा धर्म 
स्थलांतर - दुसरे स्थल 
गुणविशेष - विशेष असा गुण 
दालचिनी - चिनी डाळ 
रामदयाळ - दयाळू असा राम 
नरोत्तम - उत्तम असा नर
नामांतर - दुसरे नाम 
देशांतर - दुसरा देश 
घननील - नीळा असा घन

■ (3) विशेषण उभयपद - कर्मधारय समास
○ सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषणे असतात. 
○ यामध्ये पहिले पद व दुसरे पद विशेषण असते. 
■ सामासिक शब्द - विग्रह 
लालभडक - खूप लाल 
हिरवागार - खूप हिरवा 
पांढराशुभ्र - खुप पांढरा
श्यामसुंदर - सुंदर श्याम 
काळाभोर - खूप काळा 
पिवळाधमक - खूप पिवळा 
निळासावळा - निळा सावळा 
उपजत वेडा - उपजत वेडा 
शुक्लकृष्ण - पांढर काळा 
दृष्टादृष्ट - आधी पाहिलेले व नंतर अदृश्य झालेले

■ (4) उपमान पूर्वपद - कर्मधारय समास
○ सामासिक शब्दातील पहिले पद (पूर्व) उपमान असते. 
○ यातील पहिले पद उपमान असून ते गुणाचे अधिक्य दर्शविणारे नाम असते.
■ सामासिक शब्द - विग्रह 
देवबुद्धी - देव आहे अशो बुद्धी 
धर्मबुद्धी - धर्म आहे अशी बुद्धी 
घटशब्द - घट असा शब्द 
पुरुषमाणूस - माणूस जो पुरुष आहे.
कमलनेत्र - कमळासारखे नेत्र 
मेघशाम - मेघासारखा शाम / काळा
चंद्रमुख - चंद्रासारखे मुख
चंद्रवदन - चंद्रासारखे वदन 
घोडनवरी - मोठ्या वयाची नवरी 
सुवर्णमध्य - सुवर्ण असा मध्य
मीनाक्षी - माशासारखे डोळे असणारी 
साखर लिंबू - साखरेसारखे लिंबू

■ (5) उपमान उत्तरपद - कर्मधारय समास
○ सामासिक शब्दातील दुसरे पद (उत्तर) उपमान असते. 
○ यातील दुसरे पद उपमान (अधिक्य) असते. 
■ सामासिक शब्द - विग्रह 
मुखकमल - कमळासारखे मुख 
नरसिंह - सिंहासारखा नर
राजर्षी - ऋवीसारखा राजा
मुखचंद्र - चंद्रासारखे मुख 
पुरुषसिंह - सिंहासारखा पुरुष

■ (6) रुपक उभयपद - कर्मधारय समास 
○ सामासिक शब्दातील दोन्ही (उभय) पदे एकरूप असतात.
○ याप्रकारात दोन्ही शब्दात समानता नसून ते एकच आहेत असे दर्शविले जाते. 
■ सामासिक शब्द - विग्रह 
विद्याधन - विद्या हेच धन 
चरणकमल - चरण हेच कमल 
तपोबल - तप हेच बल 
काव्यमृत - काव्य हेच अमृत 
संसारसागर - संसार हाच सागर 
भवसागर - विश्वरूपी सागर 
ज्ञानामृत - ज्ञान हेच अमृत 
विद्युल्लता - विद्युत हीच लता 

7. द्विगू - तत्पुरुष समास

■ ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो, त्यास " द्विगू समास " म्हणतात. (संख्या + नाम = समूह)

■ सामासिक शब्द - विग्रह 
बारभाई - बारा भावांचा समुदाय 
चौघडी - चार घड्यांचा समुदाय 
त्रैलोक्य - तीन लोकांचा समुदाय 
पंचपाळे - पाच पाळ्यांचा समुदाय 
त्रिभुवन - तीन भुवनांचा समुदाय 
सप्ताह - सात दिवसांचा समूह 
पंचवटी - पाच वडांचा समूह 
चातुर्मास - चार महिन्यांचा समुदाय 
नवरात्र - नऊ रात्रींचा समूह 
पंचपदी - पाच पदांचा समुदाय 
पंचारती - पाच आरत्यांचा समुदाय 
अष्टाध्यायी - आठ अध्यायांचा समुदाय 
त्रिदल - तीन दलांचा समुदाय 
चतुःसूत्री - चार सूत्रांचा समुदाय 
सप्तग्रही - सात ग्रहांचा समुदाय 
नवरत्न - नऊ रत्नांचा समूह 
नवरस - नऊ रसांचा समूह 
षण्मास - सहा महिन्यांचा समूह 
तिसगाव - तीस गावांचा समूह 
चव्हाटा - चार वाटांचा समूह 
षोडशोपचार - सोळा उपचारांचा समूह 
सप्तर्षी - सात ऋषोंचा समूह

■ महत्त्वाचे : दशभुजा (सप्तशृंगी), दशानन (रावण), चौकोन, त्रिकोन, पंचकोन, षटकोन यांच्या सुरुवातीला संख्यावाचक शब्द असूनही हे समूहदर्शक शब्द नाहीत. त्यातून तिसऱ्या एकाच घटकाचा बोध होतो; म्हणून ही " बहुव्रीही समासाची उदाहरणे " आहेत. 

8. प्रादी - तत्पुरुष समास

■ ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद " प्र, वि, सु, उत्‌, अधि, आति, अव, उप, सर " असे उपसर्गस्वरूप असते, त्यास " प्रादि तत्पुरुष समास " म्हणतात.

■ सामासिक शब्द - विग्रह 
प्रवात - प्रकृष्ठ असा वात 
प्राध्यापक - प्रगत असा अध्यापक 
प्रगती - चांगली अशी गती 
विपक्ष - विरूद्ध असा पक्ष 
विज्ञान - विशेष असे ज्ञान 
उत्क्रांती - चांगली अशी क्रांती 
अध्यादेश - प्रमुख असा आदेश 
अधिसूचना - प्रमुख अशी सूचना 
अधिराणी - प्रमुख अशी राणी 
अतिरथ - मोठा असा योद्धा
अवगुण - वाईट असा गुण 
प्राचार्य - प्रगत असा आचार्य 
उपमंत्री - गौण असा मंत्री 
अधिवक्ता - प्रमुख असा वक्ता 
उपकार्यालल - गौण असे कार्यालय 
अतिमान - अति असा मान 
सरसेनानी - प्रमुख असा सेनानी 
सरन्यायाधीश - प्रमुख असा न्यायाधीश 
प्राधिकारी - प्रमुख असा अधिकारी 
अभिनियंता - मुख्य असा नियंता 
सुविचार - चांगले असे विचार 

(D) द्वंद्व समासाचे उपप्रकार व उजळणी

1. इतरेतर - द्वंद्व समास

■ ज्या समासाचा विग्रह करताना " आणि, व " या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास " इतरेतर द्वंद्व समास " असे म्हणतात.
○ सर्व घटकांना समान महत्त्व असते.  
○ इतरेतर द्वंद्व हा समास अनेकवचनी असतो.

■ सामासिक शब्द - विग्रह 
बहीणभाऊ - बहीण व भाऊ 
रामलक्ष्मण - राम आणि लक्ष्मण 
विटीदांडू - विटी आणि दांडू 
आईवडील - आई आणि वडील 
स्त्रीपुरूष - स्त्री आणि पुरुष 
कृष्णार्जुन - कुष्ण आणि अर्जुन 
भीमार्जुन - भीम आणि अर्जुन 
अहिनकुल - अहि आणि नकुल 
ने-आण - ने आणि आण 
दक्षिणोत्तर - दक्षिण आणि उत्तर 
पशुपक्षी - पशू आणि पक्षी 
शर्टपॅन्ट - शर्ट आणि पॅन्ट 
एकवीस - एक आणि वोस 
बत्तीस - दोन (बे) आणि तीस 
सुंठसाखर - सुंठ आणि साखर 
दहीभात - दही आणि भात 
साखरलिंबू - साखर आणि लिंबू
जाये - जा आणि ये 
बॅटबॉल - बॅट आणि बॉल 
एकतीस - एक आणि तीस 
बापलेक - बाप आणि लेक 
बत्तीस - तीस आणि दोन 
डोंगरदन्या - डोगर आणि दऱ्या 
सासूसासरे - सासू आणि सासरे 
सुंठगुळ - सुंठ आणि गुळ 
खलबत्ता - खल आणि बत्ता 
नवराबायको - नवरा आणि बायको 
अजरामर - अजर आणि अमर 
हरिहर - हेरि आणि हर

2. वैकल्पिक - द्वंद्व समास

■ ज्या समासाचा विग्रह करताना " किवा, अथवा, वा " या विकल्प  दाखविणाऱ्या (विकल्पदर्शक) उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो, त्यास " वैकल्पिक द्वंद्व समास " असे म्हणतात.
○ यात दोन्ही पदे विरुद्ध अर्थाची असतात. (विरुद्धार्थी)
○ यात दोन घटकांपैकी एकाची निवड केली जाते.

■ सामासिक शब्द - विग्रह 
पंधरासाळा - पंधरा किंवा साळा 
न्यायान्याय - न्याय किंवा अन्याय 
मागेपुढे - मागे किंवा पुढे 
छोट्यामोठ्या - छोट्या किंवा मोठ्या 
पापपुण्य - पाप किंवा पुण्य 
बरेवाईट - बरे अथवा वाईट 
सत्यासत्य - सत्य किंवा असत्य 
खरेखोटे - खेरे किंवा खोटे 
लहानमोठे - लहान किंवा मोठे 
सारासार - सार किंवा असार 
चांगलेवाईट - चांगले अथवा वाईट 
पाचपंचविस - पाच किंवा पंचविस 
धर्माधर्म - धर्म किंवा अधर्म 
शुद्धाशुद्ध - शुद्ध किंवा अशुद्ध 
काळेपांढरे - काळे किंवा पांढरे 
देवदानव - देव अथवा दानव

3. समाहार - द्वंद्व समास

■ ज्या समासाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश केलेला असतो, त्यास " समाहार द्वंद्व समास " असे म्हणतात.
○ यात दोन वस्तूंचा उल्लेख असतो; परंतु तशा अनेक वस्तू आपोआपच जोडून येतात. 
○ हा समास एकवचनी असतो

■ सामासिक शब्द - विग्रह 
बाजारहाट - बाजारहाट व तत्सम वस्तू 
वेणीफणी - वैणीफणी व इतर साजशृंगार 
चहापाणी - चहा, पाणी व इतर फराळाचे पदार्थ 
मीठभाकर - मीठ, भाकरी व इतर साधे खाद्यपदार्थ 
भाजीपाला - भाजी, पाला व तत्सम वस्तू 
शेतीवाडी - शेती, वाडी व इतर तत्सम जायदाद 
केरकचरा - केरकचरा व इतर टाकाऊ पदार्थ 
पाणसुपारी - पान, सुपारी, कात, चूना 
पालापाचोळा - पाला, पाचोळा, काटक्या 
पानपत्रावळ - पान, पत्रावळ, द्रोण 
चूकभूल - चूक, भूल, घेणे, देणे 
हळदीकुंकू - हळद, कुंकू इतर समारंभातील वस्तू 
नदीनाले - नदी, नाले, ओढे 
कपडालत्ता - कपडा, लत्ता व इतर परिधान वस्त्रे 
पाऊसपाणी - पाऊस, पाणी, गारा, वारा 
साडीचोळी - साडी, चोळी, बांगड्या 
सगासोयरा - सगा, सोयरा, पाहुणा, रावळा 
आदरातिथ्य - आदर, तिथ्य, मान, सन्मान 
काजळकुंकू - काजळ, कुंकू, टिकली, ओष्टशलाका व इतर सौंदर्य प्रसाधनाची साधने 
लाकूडफाटा - लाकूड, फाटा, सर्पण व इतर जळताणाच्या वस्तू 
पैसाअडका - पैसा, अडका, नाणे व इतर विनिमयाची साधने 
भांडीकुंडी - भांडी, कुंडी, काथवट व इतर संसारोपयोगी वस्तू

दगडबिगड, घोडाबिडा, कागदबिगद हे सामासिक शब्द तर्खडकरांच्या मते समाहार द्वंद्व समासात मोडतात.

(E) बहुव्रीही समासाचे उपप्रकार व उजळणी

1. विभक्ती - बहुव्रीही समास

■ ज्या बहुव्रीही समासात विभक्तीचा अर्थ संबंधी सर्वनामानी जोडली जातात, त्यास “ विभक्ती बहुव्रीही समास ” म्हणतात.
○ विभक्ती बहुव्रीही समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. 
○ सामासिक शब्दाची विभक्ती संबंधी सर्वनामावरून सांगावी.
○ सामासिक शब्दाची विभक्ती संबंधी सर्वनामाला जो प्रत्यय जोडला आहे त्यावरून ठरवावी.

■ द्वितीया - विभक्ती बहुव्रीही समास
□ सामासिक शब्द - विग्रह 
प्राप्तधन - प्राप्त आहे धन "ज्यास" तो (लाभार्थी) 
लब्धदृष्टी - लाभली आहे दृष्टी "ज्यास" तो
प्राप्तोदक - प्राप्त आहे उदक ज्यास तो

■ तृतिया - विभक्ती बहुव्रीही समास
□ सामासिक शब्द - विग्रह 
जितेंद्रिय - जिंकली आहेत इंद्रिये ज्याने तो. (मारुती)
कृतकार्य - केले आहे कार्य ज्याने तो (कर्ता)
दत्तधन - दिले आहे धन ज्याने तो (दाता) 
जितकोप - जिंकला आहे कोप ज्याने तो

■ चतुर्थी - विभक्ती बहुव्रीही समास
□ सामासिक शब्द - विग्रह 
एकडोळ्या - एक आहे डोळा ज्याला तो (कावळा) 
रक्तप्रिय - रक्त आहे प्रिय ज्याला तो 
त्रिलोचन - तीन आहेत डोळे ज्याला तो (शंकर)
पंचानन - पाच आहेत आनन ज्याला तो (सिंह)  
मोदकप्रिय - मोदक आहे प्रिय ज्याला तो (गणपती)
दशमुख - दहा आहेत मुखे ज्याला तो (रावण)  
भक्तप्रिय - भक्त आहे प्रिय ज्याला तो (देव) 
चतुर्भुज - चार आहेत भुजा ज्याला तो (विष्णू) 
दुतोंडा - दोन आहेत तोडे ज्याला तो 
त्रिकोन - तीन आहेत कोन ज्याला तो (आकृती) 
लब्धप्रतिष्ठि - लब्ध आहे प्रतिष्ठा ज्याला तो (प्रतिष्ठित) 
चौकोन - चार आहेत कोन ज्याला तो (आकृती) 
दशानन - दहा आहेत तोंडे ज्याला तो (रावण) 
दशभुजा - दहा आहेत भुजा जिला ती (सप्तसृंगी) 
त्रिनयन - तीन आहेत नयन ज्याला तो (शंकर) 
चतुरानन - चार आहेत आनन ज्याला तो (ब्रह्मा) 
पंचमुखी - पाच आहेत मुखे ज्याला तो (हनुमान) 
षटकोन - सहा आहेत कोन ज्याला तो (आकृती)
गजानन - गजाचे आहे आनन ज्याला तो (गणेश)  

■ पंचमी - विभक्ती बहुव्रीही समास
□ सामासिक शब्द - विग्रह 
गलितपर्ण - गेली आहेत पाने ज्यापासून तो (वृक्ष) 
गतवैभव - गेली आहे वैभव ज्यापासून तो (दरिद्री)

■ षष्ठी - विभक्ती बहुव्रीही समास
□ सामासिक शब्द - विग्रह 
लक्ष्मीकांत - लक्ष्मी आहे कांता ज्याची तो (विष्णू)  
रमाकांत - रमा आहे कांता ज्याची तो (विष्णू) 
पितांबर - पिवळे आहे सस्त्र ज्याचे तो (विष्णू) 
वक्रतुंड - वक्र आहे तोंड ज्याचे तो (गणपती) 
नीलकंठ - नीळा आहे कंठ ज्याचा तो (शंकर) 
लंबोदर - लंब आहे उदर ज्याचे असा तो (गणपती)  
पांडुरंग - पांडुर आहे रंग ज्याचा असा तो (विठ्ठल)
मूषकवाहन - मूषक आहे वाहन ज्याचे तो (गणपती)
पांढरपेशा - पांढरा आहे पेशा ज्याचा तो (उच्च व्यावसायिक) 
घारडोळ्या - घारीसारखे डोळे आहेत ज्याचे तो (व्यक्ती)
मानधन - मान हेच आहे धन ज्याचे तो  
गरूडध्वज - गरूड आहे ध्वज ज्याचा तो (विष्णू) 
आखुडशिंगी - आखुड आहेत शिंगे जिची ती (गाय) 
तीर्थपाद - तीर्थ आहे पायाशी ज्याच्या तो (विष्णू) 
सुधाकर - सुधा आहे करात ज्याच्या तो (चंद्र) 
भालचंद्र - भाळी आहे चंद्र ज्याच्या तो (शंकर) 
चक्रपाणि - चक्र आहे पाणित ज्याच्या तो (विष्णू) 
चंद्रशेखर - चंद्र आहे शिखरी ज्याच्या तो (शंकर) 
शूलपाणि - शूल आहे पाणित ज्याच्या तो (शंकर) 
श्रीपाद - श्री/लक्ष्मी आहे पायाशी ज्याच्या तो (विष्णू)

■ सप्तमी - विभक्ती बहुव्रीही समास
□ सामासिक शब्द - विग्रह 
भीष्मादी - भीष्म आहे आदी ज्यात तो (कौरव)  
पूर्णजल - पूर्ण आहे जल ज्यात तो (घडा) 
भीमादी - भीम आहे आदी ज्यात तो (पांडव)
पद्मनाभ - पद्म आहे नाभीत ज्याच्या तो (विष्णू)
पंचांग - पाच आहेत अंगे ज्यात तो (कालमापन)

2. नञ - बहुव्रीही समास

■ ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद “ अ, अन, न, नि “ असे नकारदर्शक असते, त्यास ” नञ बहुव्रीही समास ” म्हणतात. 
○ या सामासिक शब्दांचे पहिले पद नकारदर्शक आहे.

■ सामासिक शब्द - विग्रह 
अव्यय - नाही व्यय ज्याला ते
अखंड - नाही खंड ज्याला असे ते 
अस्पृश्य - ज्याला स्पर्श करत नाही असे ते 
अकर्मक - नाही कर्म ज्याला असे ते 
अभंग - नाही भंग ज्याला तो 
अजान - नाही ज्ञान ज्याला तो 
अथांग - नाही थांग ज्याला असा तो 
अक्षय - नाही क्षय ज्याला असा तो 
अभद्र - नाही भद्र ज्यात असे ते 
अनंत - नाही अंत ज्याला तो
अनादी - नाही आदी ज्याला तो 
अनियमित - नियमित नाही असे ते 
अनाथ - ज्याला नाथ नाही असा तो 
अनेक - नाही एक असे ते 
अनसूया - नाही असूया जिच्यापाशी ती
नास्तिक - नाही आस्तिक असा तो 
नाक - नाही अक (दु:ख) ज्यात तो
निर्धन - गेले आहे धन ज्याच्यापासून असा तो.
नीरस - नाही रस ज्यात ते 
निर्बळ - निघून गेलेले आहे बळ ज्यापासून तो 
निर्बुद्ध - ज्याला बुद्धी नाही असा तो
नि:संशय - नाही संशय ज्यात ते 
निष्कांचन - नाही कांचन ज्यात अस ते

3. सह - बहुव्रीही समास

■ ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद " सह " किंवा " " अशी अव्यये उपसर्ग असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य कारतो त्यास " सहबहुव्रीही समास " म्हणतात. 
○ सामासिक शब्दांचे पहिले पद " सह " असे अव्यय आहे. हा सामासिक शब्द विशेषण असला, तर त्याला सहबहुव्रीही समास असे म्हणतात. (पण हा शब्द क्रियाविशेषणासारखा वापरला, तर अव्ययीभाव समास होतो.)

■ सामासिक शब्द - विग्रह 
सहपरिवार - परिवारासहित असा तो 
सहर्ष - हर्षाने सहित असा तो 
सादर - आदराने सहित असा तो 
सफल - फलाने सहित असे ते 
सवर्ण - वर्णासहित असा तो 
सबल - बलाने सहित असा तो 
सप्रेम - प्रेमाने सहित असे ते 
सविनय - विनयाने सहित असा तो 
सजीव - जोंवाने सहित असा तो 
सशक्त - शक्तीने सहित असा तो 
सतेज - तेजाने सहित असा तो 
साभार - आभाराने सहित असा तो 
सक्रिय - क्रियेने सहित असे ते 
सधन - धनाने सहित असा तो 
सचेतन - चेतनेने सहित असा तो 
सव्याज - व्याजाने सहित असा तो 
सनाथ - माथासहित असा तो 
सवर्ण - वर्णाने सहित असा तो 
सकर्मक - कर्मासहित असा तो

4. प्रादि - बहुव्रीही समास

■ ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद “ प्र, परा, अप, सु, दुर, वि “ अशा उपसर्गानी युक्त असते त्यास ” प्रादिबहुव्रीही समास ” असे म्हणतात. 
○ प्रादि = प्र आदि उपसर्ग असलेले

■ सामासिक शब्द - विग्रह 
प्रबळ - अधिक बलवान असा तो 
सुमंगल - पवत्रिआहेअसेते 
सुलोचन - चांगले डोळे आहेत असा तो 
सुकेशणी - चांगले आहेत केस जिचे अशी ती 
सुलोचन - चांगले आहेत लोचन जिचे अशी ती 
सुलक्षणा - चांगले आहे लक्षण जिचे अशी ती 
दुर्गुणी - गुणांपासून दूर असलेला 
दुर्मती - दुष्ट आहे मती ज्याचे तो 
विरागी - रागापासून दूर आहे असा तो 
विधवा - विगत आहे धव जिचा अशी ती 
विख्यात - विशेष ख्याती असलेला तो 

(F) समासाचे एकूण उपप्रकार ओळखण्याची ट्रिक (Trick)

1. समासाचे मुख्य प्रकार ओळखण्याची ट्रिक

2. अव्यायीभाव समासाचे एकूण उपप्रकार व ट्रिक

3. तत्पुरुष समासाचे एकूण उपप्रकार व ट्रिक

4. द्वंद्व समासाचे एकूण उपप्रकार व ट्रिक

5. बहुव्रीही समासाचे एकूण उपप्रकार व ट्रिक

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव