प्रकरणचे नाव - विरामचिन्हे

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - विरामचिन्हे

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) विरामचिन्हेची व्याख्या व उजळणी

1. विरामचिन्हे म्हणजे काय?

■ मनुष्य बोलत असला म्हणजे त्याच्या आवाजाच्या चढउतारावरून त्याला काय म्हणायचे ते समजते. पण हेच लिहून दाखविले की बोलणाऱ्याच्या मनातला आशय कळत नाही. हा आशय पूर्णपणे कळावाकोठे किती थांबावे हे समजण्यासाठी काही खुणा किंवा चिन्हे ठरविण्यात आली आहेत. त्याला विरामचिन्हे म्हणतात.
○ विरामचिन्हांमुळे वाक्‍य कोठे संपले, कोठे सुरू झाले की अपूर्ण आहे. अशा विविध गोष्टी कळतात. म्हणून विरामचिन्हांना लेखनात महत्त्व असते.
○ विरामचिन्हे इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेत घेण्यात आलेला आहे. 

■ विरामचिन्हेचे दोन प्रकार 
1. विराम दर्शविणारी चिन्हे. (थांबावे)
→ पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम,अपूर्ण विराम 
2. अर्थबोध करणारी चिन्हे
→ प्रश्‍नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह , अवतरण चिन्हे 

(B) विराम दर्शविणारी विरामचिन्हे

1. पूर्णविराम चिन्ह ( . )

■ नियम (1)- विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी
□ उदाहरणार्थ 
१. सचिन क्रिकेट खेळतो. 
२. तो घरी गेला. 

■ नियम (2)- शब्दांचा संक्षेप / संक्षिप्त दाखविण्यासाठी अक्षरांपुढे पूर्णविराम देतात. 
□ उदाहरणार्थ 
१. B.A. (Bachelors of Arts)
२. भा.प्र.से. (भारतीय प्रशासकीय सेवा)

2. स्वल्पविराम चिन्ह ( , )

■ नियम (1)- चढ-उतार प्रमाणे थांबत-थांबत वाचताना स्वल्पविराम वापरतात.
□ उदाहरणार्थ 
१. गुरुजी आले, माझ्याकडे बघितले, किंचीत हसले, खुर्चीत बसले. 

■ नियम (2)- संबोधन दर्शविण्यासाठी स्वल्पविराम वापरतात. 
□ उदाहरणार्थ 
१. जगदीश, इकडे ये. 
२. मधू म्हणाली, “ इकडे ये.” 

■ नियम (3)- एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात.
□ उदाहरणार्थ
१. हुशार, जिद्दी, चिकाटी व मेहनती विद्यार्थी यशस्वी होतात. 
२. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद इ. 
३. 1,2,3,4,...... 
४. मला कथा, नाटके, कादंबऱ्या आवडतात. 
५. हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात. 

■ नियम (4)- "हे", "की" असे यासारख्या शब्दांनी दोन वाक्ये जोडताना स्वल्पविराम वापरतात.
□ उदाहरणार्थ 
१. त्याला वाटले, की आपण तिथे जायला हवे.

3. अर्धविराम चिन्ह ( ; )

■ नियम (1)- एखादा विचार पूर्ण होत असेल; परंतु वाक्‍य पूर्ण होत नसेल त्या ठिकाणी अर्धविराम वापरतात. 
□ उदाहरणार्थ 
१. हेमंत खूप खेळला; पण त्याला गाडी सापडली नाही. 

■ नियम (2)- दोन छोटी वाक्ये, उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा अर्धविराम वापरतात.
□ उदाहरणार्थ 
१. त्याने खूप अभ्यास केला; परंतु चांगले गुण मिळाले नाहीत.
२. ढग खूप गर्जत होते; पण पाऊस नाही.

4. अपूर्णविराम चिन्ह ( : )

■ नियम (1)- वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्णविराम वापरतात.
□ उदाहरणार्थ 
१. ही विद्यार्थ्यांनी आहे : राम, गणेश, किशन,..... 

■ नियम (2)- एखाद्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी, काही उदाहरणे किंवा दाखला देण्यासाठी अपूर्णविराम चिन्हाचा उपयोग करतात. 
□ उदाहरणार्थ 
१. पुढील क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनी उभे राहा : १४, २०, २२, २५ 
२. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले : १,८, १४,२७, ४०

(C) अर्थबोध करणारी विरामचिन्हे

1. प्रश्‍न चिन्ह ( ? )

■ नोट : प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्‍नचिन्ह वापरतात.

■ नियम (1)- या चिन्हाचा उपयोग प्रश्‍न विचारण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी करतात प्रश्‍नचिन्ह वापरतात.
□ उदाहरणार्थ
१. तू केव्हा आलास? 
२. तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आलात? 

■ नियम (2)- एखाद्या माहितीच्या अधिकृततेबद्दल शंका असेल किंवा लेखकाचा मतभेद असेल तर कंसात प्रश्नचिन्ह टाकले जाते. 
□ उदाहरणार्थ 
१. आमचे विद्वान मित्र(?) म्हणाले ......

2. उद्गारवाचक चिन्ह ( ! )

■ नोट : उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गारचिन्ह वापरतात.     

■ नियम (1)- उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी या चिन्हाचा उपयोग करतात.     
□ उदाहरणार्थ    
१. बापरे! एवढा मोठा साप! 

■ नियम (2)- एखादी भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त होताना जे शब्द बाहेर पडतात, त्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह वापरतात. किंवा उत्कट भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गारचिन्ह वापरतात.   
□ उदाहरणार्थ    
१. अरेरे! तो नापास झाला.    
२. शाबास ! छान खेळलास. 
३. शाब्बास! तू खूप चांगलं काम केलं.

3. अवतरण चिन्ह ( '.. ' / ".. ")

■ नोट 
○ (दुहेरी) बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरिता.  
○ (एकेरी) एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास, दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना. 

■ नियम (1)- एखाद्याचे बोलणे किंवा वाक्य महत्त्वाचे असेल, तर त्या ठिकाणी दुहेरी अवरतणचिन्ह वापरतात. 
□ उदाहरणार्थ 
१. स्वामी विवेकानंद म्हणाले, “उठा, जागे व्हा.” 

■ नियम (2)- वाक्यात जर एखाद्या विशिष्ट शब्दाला महत्त्व द्यायचे असेल, तर एकेरी अवतरणचिन्ह वापरतात. 
□ उदाहरणार्थ 
१. मूल ध्वनींना ‘वर्ण’ असे म्हणतात. 

■ नियम (3)- बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरता.  
□ उदाहरणार्थ 
१. तो म्हणाला, " मी येईन." 

■ नियम (4)- एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असता, तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी.  
□ उदाहरणार्थ 
१. मूलध्वनींना ‘वर्ण’ असे म्हणतात. 

■ नियम (5)- दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना.  
□ उदाहरणार्थ 
१. "व्याकरणाचा अभ्यास महत्त्वाचा" असं त्यांनी सांगितलं.

(D) जोडणी करणारी विरामचिन्हे

1. संयोग चिन्ह ( - )

■ नोट -: केव्हा वापरतात - दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपूरा राहिल्यास. हे संयोगचिन्ह अपसारण चिन्ह वापरतात.

■ नियम (1)- दोन शब्द जोडण्यासाठी संयोगचिन्हाचा वापर करतात. 
□ उदाहरणार्थ
१. विद्यार्थी-भांडार 
२. प्रेम-विवाह
३. राजा-राणी, गुण-दोष 

■ नियम (2)- ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास.
□ उदाहरणार्थ
१. पुढील कार्यक्रम शाळेच्या खेळाच्या मैदा-
नावर होतील. (मैदानावर)
२. आजचा कार्यक्रम शाळे-
पुढील पटांगणावर होईल. (शाळेपुढील)

2. अपसारण चिन्ह ( -- )

■ नोट -: केव्हा वापरतात - बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास अपसारण चिन्ह वापरतात.

■ नियम (1)- बोलता बोलता विचारमालिका तुटल्यास
□ उदाहरणार्थ
१. मी तेथे गेलो, पण- 

■ नियम (2)- स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास
□ उदाहरणार्थ
१. तो मुलगा--ज्याने बक्षीस मिळविले -- आपल्या शाळेतील आहे.

3. विकल्प चिन्ह ( / )

■ नियम (1)- एखाद्या गोष्टीला पर्याय सुचवायचे असल्यास.
□ उदाहरणार्थ
१. मी चहा / कॉफी घेतो.
२. विद्यार्थ्याने आई / वडील यांना ही माहिती देणे आवश्यक आहे.

(E) इतर विरामचिन्हे 

1. दंड चिन्ह ( । / ॥ )

■ दंड हे चिन्ह आपल्याला जुन्या मराठी साहित्यात वापरलेले आढळते. 

■ नियम (2)- सामान्यतः रचनेतला एकेक चरण पूर्ण झाल्यावर एकेरी दंड, तर चार चरण पूर्ण झाल्यावर दुहेरी दंड असे दिसते. 
□ उदाहरणार्थ
आता विश्वात्मके देवे
येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे ।
पसायदान हे।।

2. संक्षेप चिन्ह ( म. )

■ नियम (2)- शब्दांचा संक्षेप दाखविण्यासाठी आद्याक्षरापुढे.
□ उदाहरणार्थ
१. ता. क. (ताजा कलम
२. पं. नेहरू ( पंडित जवाहरलाल नेहरू)

3. लोप चिन्ह (.......)

■ नियम (1)- एखादा मुद्दा अपूर्ण असताना मध्येच तोडायचा असताना.
□ उदाहरणार्थ 
आयुष्य ....... एक सुंदर कलाकृती ....... आज विचार करताना जाणवतं .......

4. गोलकंस चिन्ह [ ( ) ]

■ नियम (1)- एखादी गोष्ट मुख्य मुद्यात घालायची नसेल, पण सांगणे आवश्यक असेल तेव्हा गोल कंसात ती माहिती टाकली जाते. 
□ उदाहरणार्थ 
काही लोकांनी संस्थेच्या पैशांचा योग्य उपयोग होत नसल्याची (हे महाभाग संस्थेचा देखभाल खर्च देत नसले तरी) तक्रार केली.

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव