प्रकरणचे नाव - उभयान्वयी अव्यय

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - उभयान्वयी अव्यय

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) उभयान्वयी अव्ययाची व्याख्या व उजळणी

1. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय?

दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्‍य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ उभयान्वयी अव्यय अविकारी आहेत. कारण त्यांच्यात कधीच कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही.
□ जर एखाद्या उभयान्वयी अव्ययाने दोन शब्द एकत्र जोडले तर ते एकाच जातीचे असतात.
□ उभय = दोन, अन्वय = संबंध
□ उभयान्वयी अव्ययांचे प्रमुख कार्य म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांना जोडणे हे आहे.
□ उदाहरणार्थ
१. माझ्या आईने मंडईतून सफरचंद पेरू आणले.
२. मी आजारी आहे, म्हणून मी शाळेत जात नाही.
३. मी चहा घेतो आणि काफीसुद्धा घेतो.
○ वरील वाक्यात व, म्हणून, आणि हे शब्द दोन वाक्य जोडण्याचे काम करतात, म्हणून ते उभयान्वयी अव्यय आहेत.

2. प्रधान व गौण वाक्य म्हणजे काय?

■ वाक्यामध्ये दोन उपवाक्ये असतात.
१. प्रधान वाक्य
२. गौण वाक्य
प्रधान वाक्य
□ ज्या वाक्यात एक स्वतंत्र विचार सांगितलेला असतो, त्यास प्रधान वाक्य म्हणतात.
गौण वाक्य
□ ज्या वाक्यात एक स्वतंत्र विचार सांगितलेला नसतो, व ते वाक्‍य दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून असते, त्यास गौण वाक्य असे म्हणतात.

■ प्रधान वाक्य किंवा गौण वाक्‍य शोधण्याची trick
□ वाक्य कोणत्या उभयान्वयी अव्ययांनी जोडले आहे. ते शोधावे. आणि त्यावरून ते वाक्य प्रधान आहे की गौण ते ठरवावे.
□ उदाहरण -: जर तु लवकर आलास, तर आपण बागेत जाऊ.
○ दिलेल्या वाक्य हे संकेतबोधक उभयान्वयी अव्ययानी जोडलेले आहे.
○ संकेतबोधक उभयान्वयी अव्ययात पहिले वाक्य नेहमी गौण असते. तर दुसरे वाक्य प्रधान असते.

(B) उभयान्वयी अव्ययचे दोन मुख्य प्रकार व उजळणी

1. प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय

प्रथानत्वसूचक उभयान्वयी अव्यय -: अर्थाच्या दृष्टीने दोन स्वतंत्र वाक्ये ( दोन प्रधान वाक्य ) जोडणाऱ्या शब्दाला प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ जोडली गेलेली वाक्ये संयुक्त वाक्ये होतात.
□ प्रधानत्वपूचक उभयान्वी अव्ययांना समानाधीकरण अव्यय असे पण म्हणतात.
□ प्रधान वाक्‍य + प्रधान वाक्‍य = संयुक्त वाक्य
दोन प्रधान उपवाक्ये जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययास प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.

■ प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययचे चार प्रकार पडतात.
१) समुच्चयबोधक
२) विकल्पबोधक
३) न्यूनत्वबोधक
४) परिणामबोधक

2. गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

प्रथानत्वसूचक उभयान्वयी अव्यय -: अर्थाच्या दृष्टीने एक प्रधानएक गौण वाक्‍य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययास गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही मिश्र वाक्ये असतात.
□ गौणत्वसूचक उभयान्वी अव्ययांना व्याधीकरण अव्यय असे पण म्हणतात.
□ प्रधान वाक्‍य + गौण वाक्‍य = मिश्र वाक्य
□ गौण वाक्‍य + प्रधान वाक्‍य = मिश्र वाक्य

■ गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययचे चार प्रकार पडतात.
१) स्वरूपबोधक
२) कारणबोधक
३) उद्देशबोधक
४) संकेतबोधक

(C) प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययचे चार प्रकार

1. समुच्चयबोधक - प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय

दोन शब्दांच्या किंवा वाक्यांचा बेरीज किंवा मिलाफ दर्शविला जातो, त्यास समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
समुच्चय म्हणजे बेरीज होय.
□ उदाहरण - : आणि, व, अन्, शिवाय, आणखी, न्, नि, आणिक इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
२. पिलाने घरट्याबाहेर मान काढली किलबिलाट केला.
३. मी आज पुऱ्या अन्‌ भजी आणलीत.
४. मी गुरुजींच्या पाया पडलो, शिवाय गुरुदक्षिणा दिली.
५. शिक्षकांना नम्र नि अभ्यासू विद्यार्थी आवडतात.

2. विकल्पबोधक - प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय

विकल्प म्हणजे हे किंवा ते (दोघांपैकी एक). अशा अर्थ व्यक्त करणाऱ्या अव्ययास विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ ज्या उभयान्वयी अव्यये दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एका गोष्टीची अपेक्षा दाखवितात. अशा उभयान्वयी अव्ययांना विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
विकल्प म्हणजे दोहोंतील एकाची निवड.
□ उदाहरण - : किंवा, अथवा, वा, अगर, की, का, नाहीतर इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. तुला ज्ञान हवे की धन हवे?
२. देह जावो अथवा राहो.
३. तू ये अगर न ये, मी जाणारच.
४. पाऊस पडो वा न पडो, तुलाच यावेच लागणार.
५. तू मला ऑफिसला किंवा घरी भेटायला ये.

3. न्यूनत्वबोधक - प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय

दोन प्रधान उपवाक्यांपैकी एका वाक्यात कोठे तरी न्यूनत्व ( कमीपणा ) दर्शवतात, त्यास न्यूनत्वयोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात.
न्यूनत्व म्हणजे कमीपणा
□ ज्या उभयान्वयी अव्यये पहिल्या वाक्यातील काही उणीव, कमीपणा, दोष असल्याचे दाखवितात. अशा अव्ययांना न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात.
□ ही अव्यये दोन वाक्यांतील विरोध दाखवितात म्हणून त्यांना विरोधदर्शक असेही म्हणतात.
□ उदाहरण - : किंवा, पण, परंतु, परी, बाकी, तरी, किंतु इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. शेतकऱ्यांनी शेते नांगरली; पण पाऊस पडलाच नाही.
२. त्याने अभ्यास केला; परंतु नापास झाला.
३. मरावे परी कीर्तिरूपे उरावे.
४. आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक.

4. परिणामबोधक - प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय

पहिल्या प्रधान वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात जेव्हा असतो, तेव्हा त्यास परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
पहिल्या वाक्यातील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दिलेला असतो.
पहिल्या वाक्यात जे घडले त्याचा परिणाम पुढील वाक्यात सुचवितात, म्हणून अशांना परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ उदाहरण - : म्हणून, सबब, यास्तव, त्यासाठी, त्यामुळे, याकरिता, तस्मात, अतएव, तेव्हा, की इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. तो आजारी होता; म्हणून शाळेत आला नाही.
२. सायकल वाटेत नादुरुस्त झाली; सबब मला उशीर झाला.
३. आमचा सत्कार झाला, यास्तव वर्तमानपत्रात फोटो आला.
४. वर्तमानपत्रात फोटो आला, त्यामुळे माझी विचारणा होऊ लागली.

(D) गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययचे चार प्रकार

1. स्वरूपबोधक - गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा गौण वाक्याने कळतो, त्यास स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्यात पहिले वाक्‍य नेहमी प्रधान तर दुसरे वाक्य गौण असते.
□ ज्या उभयान्वयी अव्ययांमुळे प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा किंवा एखाद्या व्यक्तीचे म्हणणे गौण वाक्याने कळतो त्यांस स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ उदाहरण - : की, म्हणून, म्हणजे, जे इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. गुरुजी म्हणाले, की पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
२. एक रुपया म्हणजे शंभर पैसे.
३. दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला.
४. विनंती अर्ज ऐसा जे.

2. कारणबोधक - गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

पहिल्या वाक्याचे कारण दुसऱ्या वाक्यात स्पष्ट केलेले असते. त्यास कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ कारणबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्यात पहिले वाक्य नेहमी प्रधान असते व दुसरे वाक्य गौण असते.
□ ज्या अव्ययात दुसरे गौणवाक्य हे पहिल्या प्रधान वाक्याचे कारण आहे. असे दाखविणाऱ्या अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ उदाहरण - : कारण, का की इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. त्याला शिक्षा झाली; कारण त्याने चोरी केली.
२. साहेब त्याला रागावले; कारण तो कामचुकारपणा करत होता.
३. आम्हाला हेच कापड आवडते, का की ते आपल्या देशात तयार झाले आहे.

3. उद्देशबोधक - गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

प्रधान वाक्याचा उद्देश गौण वाक्यात स्पष्ट केलेला असतो, त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ उद्देशबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्यात पहिले वाक्य नेहमी गौण असते व दुसरे वाक्य प्रधान असते.
□ ज्या उभयान्वयी अव्ययांनी जेव्हा गौण वाक्‍य हे प्रधानवाक्याचा उद्देश किंवा हेतू आहे असे दर्शविले जाते, तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ उदाहरण - : म्हणून, यास्तव, सबब, कारण की इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला.
२. चांगले उपचार मिळावेत; यास्तव तो तालुक्‍याला जात आहे.
३. चांगले गुण मिळावेत; म्हणून ती खूप अभ्यास करते.
४. विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले. 

4. संकेतबोधक - गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

दोन वाक्यात कोणती तरी अट दर्शविलेली असते, व एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते, त्यास संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ संकेतबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या वाक्यात पहिले वाक्य नेहमी गौण असते व दुसरे वाक्‍य प्रधान असते.
गौण वाक्यात अट (संकेत) दर्शवली जाते व प्रधान वाक्यात त्याचा परिणाम दिलेला असतो.
जर ने अट दाखविली जाते आणि तर ने त्याचा परिणाम दर्शविला जातो.
□ जी अव्यये संकेत किंवा अट दाखवितात. अशा अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
□ उदाहरण - : जर-तर, जरी-तरी, म्हणजे, की, तर इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. जर शाळेस सुट्टी मिळाली, तर मी तुमच्याकडे येईन.
२. जरी त्याला समजावून सांगितले, तरी त्याने ऐकले नाही.
३. तू लवकर घरी आलास, म्हणजे आपण बागेत जाऊ.
४. तू माझ्याकडे आलास, की मी येईन.
५. प्रयत्न केला, तर फायदाच होईल.

(E) सर्वनामे व क्रियाविशेषण यांचा उभयान्वयी अव्ययाप्रमाणे वापर

1. सर्वनामाचा व क्रियाविशेषणाचा उभयान्वयी अव्ययाप्रमाणे वापर

सर्वनामेक्रियाविशेषणे यांचासुद्धा उभयान्वयी अव्ययाप्रमाणे वापर होतो.
जोडीने येणारी सर्वनामेक्रियाविशेषणे यांचासुद्धा उभयान्वयी अव्ययाप्रमाणे वापर होतो. जोडीच्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्ये मिश्र वाक्य असतात. यातील पहिले गौण तर दुसरे प्रधान वाक्य असते.
सर्वनामे : जो-तो, जे-ते, ज्याचे-त्याचे, ज्याला-त्याला इत्यादी
क्रियाविशेषणे : जेथे-तेथे, जेव्हा-तेव्हा, जसे-तसे, जिकडे-तिकडे, जरी-तरी, जर-तर इत्यादी
□ उदाहरणार्थ
१. जसे करावे, तसे भरावे.
२. जेथे पाणी खोल होते, तेथे जहाज बुडाले.
३. जेव्हा पाऊस आला, तेव्हा मोर नाचू लागला.
४. जो आवडतो, सर्वांना तो आवडे देवाला.
५. जे चकाकते, ते सर्वच सोने नसते.

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव