प्रकरणचे नाव - सर्वनाम

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - सर्वनाम

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) सर्वनामाची व्याख्या व मराठीतील सर्वनामे

1. नाम व सर्वनामाचा वाक्यात वापर

■ खालील दोन उतारे पाहा.
□ 1. नामाचा वापर असलेला उतारा.
पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले. पंतप्रधान विमानातून उत्साहाने खाली उतरले. पंतप्रधानांनी सर्वांना हसून अभिवादन केले.
□ 2. नामा येवजी सर्वनामाचा वापर असलेला उतारा. यात नामाचे कार्य सर्वनाम करते.
पंतप्रधानांचे विमान विमानतळावर उतरले. ते विमानातून उत्साहाने खाली उतरले. त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केले.

■ वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही.
○ या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामांबद्दल येतात, त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो.
○ सर्वनामाचे लिंग अथवा वचनातील रूप ते ज्या नामाच्या जागी येते त्यावरून निश्चित होते.
○ सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग, वचन अशी ओळख नसते.
सर्वनामाचे लिंग व वचन ते ज्या नामाकरिता सर्वनाम आले असेल, त्यावर अवलंबून असते.

2. सर्वनाम म्हणजे काय?

■ वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात.
नामांचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दास सर्वनाम असे म्हणतात.
□ सर्वनाम म्हणजे नामाच्या जागी येणारा विकारी शब्द
□ वाक्यात सर्वनामाचा वापर नामाची द्विरुक्ती टाळण्यासाठी केला जातो.
□ सर्वनाम हे विकारी शब्दांची जात आहे.
□ सर्वसाधारणपणे नामाचा वापर अगोदर होतो, तेव्हाच व त्यानंतर सर्वनामाचा वापर होतो.

3. मराठीत मुळ नऊ सर्वनामे

■ सर्वनाम एकूण नऊ : १) मी , २) तू , ३) तो , ४) हा , ५) जो , ६) कोण , ७) काय , ८) आपण , ९) स्वतः
लिंगानुसार बदलणारी तीन : तो, हा, जो.
वचनानुसार बदलणारी पाच : मी, तू, तो, हा, जो.
दोन्ही वचनांत सारखीच राहणारी चार : कोण, काय, आपण, स्वतः या चार सर्वनामांची रूपे दोन्ही वचनांत सारखीच राहतात.
● Trick
□ मीतू तो हा जो
□ कोण, काय, आपण, स्वतः

4. लिंगानुसार बदलणारी - तीन मुळ सर्वनामे

लिंगानुसार बदलणारी तीन : तो, हा, जो.
पुल्लिंग - स्त्रीलींग
१) तो -ती
२) हा -ही
३) जो -जी
● Trick
□ मीतू " तो हा जो "

5. वचनानुसार बदलणारी - पाच मुळ सर्वनामे

वचनानुसार बदलणारी पाच : मी, तू, तो, हा, जो.
एकवचन-अनेकवचन
१) मी -आम्ही
२) तू -तूम्ही
३) तो/ती - ते,त्या
४) हा/ही - हे,ह्या
५) जो/जी -जे,ज्या
● Trick
" मीतू तो हा जो "
□ मी , तू + लिंगानुसार बदलणारी तीन

6. दोन्ही वचनांत सारखीच राहणारी - चार मुळ सर्वनामे

दोन्ही वचनांत सारखीच राहणारी चार : कोण, काय, आपण, स्वतः
एकवचन-अनेकवचन
१) कोण - कोण
२) काय - काय
३) आपण - आपण
४) स्वतः - स्वतः

7. सर्वनामांचे मुख्य सहा प्रकार

■ सर्वनामांचे मुख्य सहा प्रकार आहेत.
(१) पुरुषवाचक सर्वनामे - मी , तू , तो
(२) दर्शक सर्वनामे - हा, ( तो )
(३) संबंधी सर्वनामे - जो
(४) प्रश्नार्थक सर्वनामे - कोण , काय
(५) सामान्य सर्वनामे किंवा अनिश्रित सर्वनामे - ( कोण , काय )
(६) आत्मवाचक सर्वनामे - आपण, स्वतः

(B) सर्वनामांचे मुख्य सहा प्रकार व उजळणी

1. पुरूषवाचक सर्वनाम

व्याकरणात पुरुष म्हणजे मानवजातीतील नर असा त्याचा अर्थ होत नाही, तर सजीव किंवा निर्जीव अशा कोणत्याही घटकाचा यात समावेश होतो.
बोलणारा,ज्यांच्याशी,ज्यांच्याविषयी बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तीसाठी किंवा वस्तूसाठी वापरात येणारे सर्वनाम म्हणजे पुरूषवाचक सर्वनाम b> होय.
□ मराठीत मुळ पुरूषवाचक सर्वनाम तीन (मी , तू , तो) आहेत.इतर हे लिंग व वचनानूसार वापरतात.
प्रथम व द्वितीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलत नाहीत. फक्त तृतीय पुरुषी सर्वनामे लिंगानुसार बदलतात.

■ पुरूषवाचक सर्वनामाचे तीन गट विभागले आहे.
१.प्रथम पुरुषवाचक सर्वनाम - मी (वचन-आम्ही)
२.द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम - तू (वचन-तूम्ही)
३.तृतीय पुरुषवाचक सर्वनाम - तो / ती / ते (वचन - त्या)

■ प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
□ जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचा उपयोग करतो.
□ प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे. -:[मी, आम्ही ]
□ उदाहरणार्थ
१) मी बाजारात गेलो.
२) आम्ही पोहायला गेलो.

■ द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
□ जेव्हा बोलणारा ज्याच्याशी बोलतो तेव्हा तो द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचा उपयोग करतो.
□ द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे.-: [ तू, तुम्ही]
□ उदाहरणार्थ
१) तू मला आधी का सांगितले नाहीस?
२) तुम्ही फार छान पुस्तक लिहिले आहे.

■ तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्तीचा उल्लेख करताना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम वापरतात.
□ तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो, ती तृतीय पुरुषवाचक सर्वनामे. -: [ तो,ती,ते,त्या]
□ उदाहरणार्थ
१) तो उंच पर्वत चढून गेला.
२) ती परदेशात गेली आहे.
३) ते खेळत आहेत.
४) त्या चांगले गात.

■ कधी-कधी आपण, स्वतः या आत्मवाचक सर्वनामाचा वापर प्रथम,द्वितीय, तृतीय पुरुषवाचक म्हणून केला जातो.
□ आपण,स्वत: याचा वापर स्वत:च्या नावाऐवजी केल्यास ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे होतात.
□ आपण,स्वत: याचा वापर समोरच्या व्यक्तीच्या नावाऐवजी केल्यास ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे होतात.
□ आपण,स्वत: याचा वापर तिसऱ्या व्यक्तीसाठी केल्यास ती तृतीय पुरुषवाचक होतात.
□ उदाहरणार्थ
१) आपण/स्वतः जाऊन येऊ. (प्रथम पुरुषवाचक)
३) आपण/ स्वतः जाऊन या. (द्वितीय पुरुषवाचक)
२) गुरुजींनी मला बोलावले, स्वतः/ आपण मात्र आलेच नाहीत. (तृतीय पुरुषवाचक)
इतर उदाहरणे.
१) स्वत: खात्री करून घेतो. (मी-प्रथम पुरुषवाचक)
२) आपण सहलीला जाऊ. (आम्ही-प्रथम पुरुषवाचक)
३) आपणआत या. (तुम्ही-द्वितीय पुरुषवाचक)
४) स्वत: जाऊन आलात हे बरे झाले. (तुम्ही-द्वितीय पुरुषवाचक)

2. आत्मवाचक सर्वनाम

■ आपण, स्वतः या सर्वनामांचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्यांचा अर्थ स्वत: असा होतो. त्यामुळे ती आत्मवाचक सर्वनामे होतात.
□ आपण हे सर्वनाम स्वतः या अर्थाने येते.
□ आत्मवाचक सर्वनाम वाक्यात कधीही एकटे येत नाही. त्याच्या अगोदर नाम किंवा सर्वनाम येते.
□ उदाहरणार्थ
१) तो आपणहून घरी आला.
२) गजुने स्वतः फोन केला.
३) मी स्वतः त्याला पाहिले.
४) तो स्वतःहून मला भेटला.
आत्मवाचक सर्वनाम वाक्यात नाम किंवा सर्वनाम म्हणून येते. तेंहा ते प्रथम,द्वितीय, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होते.
१) आपण सत्याग्रहात सामील होणार नाही. (प्रथम पुरुषवाचक सर्वनाम)
२) आपण घरी केव्हा आलात. (द्वितीय पुरुष सर्वनाम)
३) मी आपणहून घरी गेलो. (आत्मवाचक सर्वनाम)

3. दर्शक सर्वनाम

दूरची वस्तु किंवा जवळची वस्तु दाखविण्यासाठी दर्शक सर्वनामाचा वापर करतात.
□ दर्शक सर्वनामे हे जवळचा व लांबचा प्राणी वा पदार्थ दाखवतात.
□ दर्शक सर्वनाम -: [हा,ही,हे/ तो,ती,ते]
जवळची वस्तू दर्शविण्यासाठी : हा- ही - हे.
दूरची वस्तू दर्शविण्यासाठी: तो - ती - ते.
□ दर्शक सर्वनामे नामापूर्वीनामानंतरही येतात.
□ उदाहरणार्थ
१) हा पक्षी आहे.
२) तुळजाभवानी ही महाराष्ट्राची आई आहे.
३) हे आंब्याचे झाड आहे.
४) तो मुलगा आहे.
५) ते गणपतीचे मंदिर आहे.
६) ती त्याची वही आहे.

■ येथे गोंधळू नका  
दर्शक सर्वनामदर्शक विशेषण यांतील फरक  
□ जेव्हा सर्वनामानंतर नाम येते व त्यानंतर लगेच क्रियापद येते तेव्हा ते दर्शक सर्वनाम असते.  
□ परंतु, लगेच क्रियापद न येता दुसरे काही शब्द येतात तेव्हा ते दर्शक विशेषण असते.  
□ उदाहरणार्थ  
१) ही चिमणी आहे. (दर्शक सर्वनाम)  
१) ही चिमणी खूप सुंदर आहे. (दर्शक विशेषण)  
२) तो राजहंस पहा. (दर्शक सर्वनाम)  
२) तो पांढरा शुभ्र राजहंस पहा. (दर्शक विशेषण
३) ते माकड आहे. (दर्शक सर्वनाम)  
३) ते माकड खोडकर आहे. (दर्शक विशेषण)  

4. संबंधी सर्वनाम

जो, जी, जे संबंधी सर्वनाम आहेत.
दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनाम असे म्हणतात.
□ जो, जी, जे, ज्या संबंधी सर्वनाम वाक्यात कधीही एकटे येत नाही. तर त्याच्याचसंघे दर्शक सर्वनाम पण येते.- जो-तो, जी-ती, जे-ते
□ उदाहरणार्थ
१) जो अभ्यास करेल, तो पास होईल. (जो- संबंधी सर्वनाम, तो-दर्शक सर्वनाम)
२) जे चकाकते, ते सोने नसते.
३) जी धावेल, ती पहिली येईल.

5. प्रश्‍नार्थक सर्वनाम

प्रश्‍न विचारण्याच्या प्रश्‍नार्थक सर्वनाम वापरण्यात येतात.
□ ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्यांना 'प्रश्नार्थक सर्वनामे' म्हणतात.
□ प्रश्नार्थक सर्वनामे - कोण, काय.
कोण या सर्वनामाला विभक्तिप्रत्यय लागून कोणी, कोणास, कोणाला, कोणाचा ,कुणास, कुणाला अशी अनेक रूपे तयार होतात.
□ असे विभक्तिप्रत्यय 'काय' ला लागत नाही.
□ इतर-कधी,केव्हा,कोठे,किती
□ उदाहरणार्थ
१) घरी कोण आहे?
२) मी हे कपडे कुणाला देऊ?
३) तुला काय हवे?
४) कोणाला गुण जास्त मिळाले?
५) तुला कधी बक्षीस मिळाले?
६) तिकडे कोण आहे?
□ प्रश्‍नार्थक सर्वनाम ओळखण्याची खूण- या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते.

6. सामान्य / अनिश्चित सर्वनाम

■ कोणत्याही नामाचा वा पदार्थाचा बोध होत नाही.
□ कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१) कोणी कोणास हसू नये.
२) शहरात काय वाटेल ते मिळेल.
३) कोणी काहीही म्हणा, मी हा मार्ग सोडणार नाही.
□ या वाक्यात प्रश्नचिन्ह येत नाही.

☆ Tricky नियम सर्वनामांचे सहा प्रकार व सर्वनामे

■ पुरूषवाचक सर्वनाम (5)
मी - आम्ही (वचन), तू - तूम्ही (वचन)
तो, ती, ते - त्या (वचन)
□ आपण, स्वतः

■ आत्मवाचक सर्वनाम (2)
आपण, स्वतः 

■ दर्शक सर्वनाम (2)
हा, ही, हे
तो, ती, ते

■ संबंधी सर्वनाम (1)
जो, जी, जे

■ प्रश्‍नार्थक सर्वनाम (2)
कोण?, काय?
□ वाक्यांच्या शेवटी प्रश्‍नचिन्ह असते - (?)

■ सामान्य / अनिश्चित सर्वनाम (2)
□ कोण. , काय.
□ वाक्यांच्या शेवटी पूर्णविराम असते - (.)

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव