प्रकरणचे नाव - विशेषण

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - विशेषण

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) विशेषण व विशेषणांची उजळणी

1. विशेषण म्हणजे काय?

नामाबद्ल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१) चांगली मुले.
२) काळा कुत्रा.
३) हिरवे रान.
वरील वाक्यातील चांगली,काळा,हिरवे हे शब्द त्यांच्यापुढे येणाऱ्या नामांविषयी विशेष माहिती सांगतात. म्हणजे ही विशेष माहिती सांगणारे शब्द त्या नामांची विशेषणे आहेत.
□ विशेषण ही विकारी शब्दजाती आहे.
□ वाक्यात नाम नसते तेव्हा विशेषणही नसते.
□ विशेषणे नामाचा गुणधर्म सांगतात.
□ विशेषण हे नेहमी नामासोबत येते.
□ विशेषणांचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग होत नाही.
□ विशेषण हे विशेष्याच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलते.
□ विशेषण ज्या नामाची विशेष माहिती सांगते ते विशेष्य

■ trick
ज्या शब्दावरून आपल्याला एखादे नाम कसा/सी/से आहे? किंवा कोणता/ती/ते किंवा किती आहेत? हे समजते त्या शब्दाला “ विशेषण ” म्हणतात.
विशेषण वाक्यात ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगायची असते त्या नामापूर्वी किंवा नामानंतर येते.

2. विशेषण व विशेष्य म्हणजे काय?

■ खालील उदाहरणार्थ वाचा.
१) चांगली मुले.
२) काळा कुत्रा.
३) हिरवे रान.
विशेषण - विशेष्य
चांगली - मुले
काळा - कुत्रा
हिरवे - रान
□ ज्या नामाबद्दल विशेषण अधिक माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात.
नामाला विशेषणात विशेष्य म्हणतात.
□ ज्या नामाबद्दल विशेषण येते, त्या नामाला विशेष्य म्हणतात किंवा उपमेय म्हणतात. व त्या विशेषणाला उपमान म्हणतात.

3. विशेषण व क्रियाविशेषण यातील फरक

■ खालील उदाहरणार्थ वाचा.
१) मुलगा चांगला खेळतो.
२) मुलगी चांगली खेळते.
३) ते चांगले खेळतात.
□ वरील वाक्यांतील चांगला, चांगली, चांगले हे शब्द विशेषणे आहेत. परंतु ती विशेषणे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारी आहेत.
त्यामुळे ही क्रियाविशेषणे आहेत, पण ती विकारी आहेत. (लिंगानुसार बदलणारी)म्हणून ती क्रियाविशेषण अव्यये नाहीत.

4. विशेषणांचे तीन मुख्य प्रकार

■ विशेषणांचे मुख्य प्रकार तीन आहेत.
1. गुणविशेषण
2. सार्वनामिक विशेषण
3. संख्याविशेषण

(B) विशेषणांचे मुख्य तीन प्रकार व उजळणी

1. गुणविशेषण

■ ज्या विशेषणाद्वारे नामाचा कोणताही गुण किंवा त्याबाबतची विशेष माहिती व्यक्त होते, त्या विशेषणाला " गुणविशेषण " म्हणतात.
□ हा गुण कोणत्याही प्रकारचा असू शकतो. जसे - रंग, चव, आकार, रूप, स्वभाव ....
□ उदाहरणार्थ
१) पिवळे फूल. / कोवळे फूल.
२) मधुर आवाज. / खराब आवाज.
३) कडू कारले. / हिरवी कारले.
४) श्रिमंत माणूस. / गरिब माणूस.
५) मोठी मुले. / लहान मुले.
trick नामापूर्वी नामाचा गुण असणे, म्हणजे ते गुणविशेषण होय.

2. सार्वनामिक विशेषण

सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना " सार्वनामिक विशेषण " असे म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१) हा मनुष्य
२) तो पक्षी
३) माझे पुस्तक. (मी-माझा,माझे-वाक्यनूसार अर्थ बद्लते)
४) तिच्या साड्या. (ती-तीचा,तीच्या)
५) असल्या झोपड्या. (हा-असला,असल्या)
६) कोणता गाव. (कोण-कोणता,कोणत्या)
□ वरील शब्दांतील हा, तो, मी, ती, कोण ही मूळची सर्वनामे आहेत.
सर्वनाम हे नामाऐवजी येत असते. पण वरील शब्दांत सर्वनामांच्यापुढे नामे आली आहेत.
□ ती आता सर्वनामे राहिली नसून ती त्यांच्यापुढे आलेल्या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजे ती विशेषणांचे कार्य करतात.
□ या सर्वनामांपासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे किंवा सर्वनामसाधित विशेषणे असे म्हणतात.
trick नामापूर्वी सर्वनाम असणे, म्हणजे ते सार्वनामिक विशेषण होय.

3. संख्याविशेषण

■ ज्या विशेषणाच्या सहाय्याने नामाची संख्या दाखविली जाते त्यास " संख्याविशेषण " असे म्हणतात.
□ ज्या विशेषणाच्या सहाय्याने नामाची गणना किंवा मोजणी केली जाते त्यास "संख्याविशेषण" असे म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१) दहा रुपये.
२) पन्नास मुले.
३) बारा महिने.
trick नामापूर्वी नामाची संख्या असणे. म्हणजे ते संख्याविशेषण होय.

■ संख्याविशेषणाचे 5 उपप्रकार आहेत.
१) गणनावाचक संख्याविशेषण - उदा. एक, पाव, दोन्ही
२) क्रमवाचक संख्याविशेषण - उदा. पहिला, आठवा, तिसवे
३) अवृत्तिवाचकसंख्याविशेषण - उदा. दुपट, चौपट, दुहेरी
४) पृथकत्ववाचक संख्याविशेषण - उदा. एकेक, दहा-दहा
५) अनिश्वित संख्याविशेषण - उदा. एकंदर, अल्प, अन्य

(उपप्रकार-1) गणनावाचक संख्याविशेषण
जेव्हा संख्याची गणना केली जाते. तेव्हा त्यास "गणनावाचक संख्याविशेषण" म्हणतात.
□ गणनावाचक विशेषणे दोन प्रकारांनी लिहितात.
(१) अक्षरांनी व (२) अंकांनी.
उदा. एक, दोन, पाव, दोन्ही भाऊ, १, १००, १/२, ३/५
□ गणनावाचक संख्याविशेषणाचे तीन उपप्रकार मानतात.
○ (अ) पूर्णांक वाचक
○ (ब) अपूर्णांक वाचक
○ (क) साकल्यवाचक

● (अ) पूर्णांक वाचक
□ ज्या संख्येने पूर्ण संख्येचा बोध होतो त्यास "पूर्णांकवाचक विशेषण" असे म्हणतात.
जसे - एक, दोन, शंभर ... , १, २, १०० ...
□ उदाहरणार्थ
१) दहा मुले.
२) शंभर रुपये.
३) पन्नास खुर्च्या.

● (ब) अपूर्णांक वाचक
□ ज्या संख्येने अपूर्ण संख्येचा बोध होतो त्यास "अपूर्णांवाचक विशेषण" असे म्हणतात.
जसे - पाव, अर्धा, पाऊण, तीन पंचमांश, १/४, ३/५
□ उदाहरणार्थ
१) अर्धा गुण.
२) पाव भाकरी.
३) पाऊण तास.

● (क) साकल्यवाचक (तितक्‍या वस्तूंपैकी सर्व)
□ जेव्हा एखाद्या संख्येने दिलेल्या वस्तूंपैकी सर्व असा बोध होतो, त्यास "साकल्यवाचक विशेषण" असे म्हणतात.
जसे - दोन्ही, पाचही, चारी
□ उदाहरणार्थ
१) दोन्ही भाऊ.
२) पाची पांडव.
३) चारी बहिणी.

(उपप्रकार-2) क्रमवाचक संख्याविशेषण
□ जेव्हा संख्येचा क्रम सांगितला जातो तेव्हा त्याला "क्रमवाचक विशेषण" म्हणतात.
जसे - सातवे , चौथा, दहावे
□ उदाहरणार्थ
१) सातवे घर.
२) चौथा वर्ग.
३) दहावे वर्ष.

(उपप्रकार-3) अवृत्तिवाचक संख्याविशेषण
संख्येची आवृत्ती किती वेळा झालेली आहे हे जे विशेषण दर्शविते, त्यास "आवृत्तीवाचक विशेषण" म्हणतात.
जसे - नऊवारी, चौपट, द्विगुणित
□ उदाहरणार्थ
१) नऊवारी साडी.
२) चौपट मुले.
३) द्विगुणित आनंद.

(उपप्रकार-4) पृथकत्ववाचक संख्याविशेषण
□ ज्या संख्येचा वेगवेगळा बोध करून दिला जातो, त्यास "पृथकत्ववाचक विशेषण" म्हणतात.
जसे - एकेक, तीन-तीन, दहा-दहांचा
□ उदाहरणार्थ
१) एकेक ओळ.
२) तीन-तीन मुले.
३) दहा-दहांचा गट.

(उपप्रकार-5) अनिश्वित संख्याविशेषण
□ जेव्हा निश्चित किती संख्येचा बोध होत नसतो, त्यास "अनिश्‍चितवाचक विशेषण' म्हणतात.
जसे - सर्व, काही, पुष्कळ, इतर
□ उदाहरणार्थ
१) सर्व रस्ते.
२) काही पक्षी.
३) पुष्कळ माणसे.
४) इतर लोक.

■ येथे लक्ष द्या (Trick)
गणनावाचक संख्याविशेषणांना " " किंवा “ हीप्रत्यय लागला की, त्याचे ” साकल्यवाचक संख्याविशेषण ” होते. 
उदा. चार - चारी, चारही , पाच - पाची, पाचही  
□ जेव्हा गणनावाचक संख्याविशेषणाची पुनरावृत्ती होते. जसे की “ दोन - दोन, पाच - पाच “ तेव्हा ” पृथकत्ववाचक संख्याविशेषण ” होते.

(C) स्थानावरून विशेषणांचे दोन प्रकार व उजळणी

1. अधिविशेषण

नामाच्या (विशेष्य) अगोदर येणाऱ्या विशेषणाला "अधिविशेषण" म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१) हा गोड आंबा आहे. (विशेषण-गोड, नाम-आंबा)
२) चांगला मुलगा सर्वांना आवडते. (विशेषण-चांगला, नाम-मुलगा)

■ Trick
नामापूर्वी येणाऱ्या विशेषणाला अधिविशेषण म्हणतात.
नामानंतर येणाऱ्या विशेषणाला विधीविशेषण म्हणतात.

2. विधीविशेषण

नामाच्या (विशेष्य) नंतर येणाऱ्या विशेषणाला "विधिविशेषण" म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१) हा आंबा गोड आहे. (विशेषण-गोड, नाम-आंबा)
२) मुलगा चांगला आहे. (विशेषण-चांगला,नाम-मुलगा)

(D) सिद्ध व साधित विशेषणे (विशेषणासारखा उपयोग)

1. सिद्ध व साधित विशेषण म्हणजे काय?

■ सिद्ध विशेषण 
जी विशेषणे मूळची असतात. म्हणजेच दुसऱ्या शब्द जातीपासून बनलेली नसतात. त्यांना " सिद्ध विशेषण " म्हणतात. 
□ जसे - गुणविशेषण, सार्वनामिक विशेषण, संख्याविशेषण

■  साधित विशेषण 
जी विशेषणे इतर शब्द जातीपासून बनलेली असतात, त्यांना " साधित विशेषण " म्हणतात. म्हणजेच काही शब्द जातींचा विशेषणांसारखा उपयोग करण्यात येतो.
□ जसे - नामसाधित विशेषण,  धातुसाधित विशेषण,  अव्ययसाधित विशेषण, .......

2. नामसाधित विशेषणे

नामांपासून तयार केलेल्या विशेषणांना नामसाधित विशेषण असे म्हणतात.
उदा. १) सातारी पेढे. २) बनारसी बोरे.
○ वरील वाक्यात सातारी, बनारसी ही अनुक्रमे सातारा, बनारस या नामांपासून साधलेली विशेषणे आहेत.
○ एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जेव्हा दुसऱ्या एखाद्या नामाचाच वापर केला जातो. तेव्हा त्यास "नामसाधित विशेषण" म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१) माझ्या भावाचे कापड दुकान आहे.
२) त्याच्या पायात कोल्हापुरी चप्पल आहे.
३) मला सातारी पेढे आवडतात.

3. धातुसाधित विशेषणे

धातूपासून बनलेल्या विशेषणांना 'धातुसाधित विशेषण" म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१) चालणारा हत्ती. (चाल हा धातू)
२) बसणारे विद्यार्थी (बस हा धातू)
३) पळणारी गाडी (पळ हा धातू)
४) पिकलेला आंबा. (पिक हा धातू)
○ क्रियापदातील मूळ शब्दाला धातूअसे म्हणतात. धातूंना प्रत्यय जोडून त्यांचा नामापूर्वी विशेषणासारखा उपयोग केला जातो.

4. अव्ययसाधित विशेषणे

जी अव्यये विशेषणाचे कार्य करतात, त्यास "अव्ययसाधित विशेषण" म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१) वरचा मजला.
२) खालची माडी.
३) मागील दार.
४) पुढची गल्ली.
○ वरील शब्दांतील वरचा, खालची, मागील, पुढची हे शब्द त्यांच्यापुढे आलेल्या मजला, माडी, दार, गल्ली या नामांची विशेषणे आहेत.
पण ही विशेषणे वर, खाली, मागे, पुढे या अव्ययांपासून तयार झालेली आहेत, म्हणून त्यांना अव्ययसाधित विशेषणे असे म्हणतात.
वर, खाली, मागे, पुढे या मूळ अव्ययांना प्रत्यय जोडून त्यांचा विशेषणाप्रमाणे उपयोग केला जातो.

5. समासघटित विशेषणे

जे सामासिक शब्द विशेषणाचे कार्य करतात, त्यांस "समासघटित विशेषण" म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१) क्रांतिकारक संभाजी.
२) लंबोदर गणेश.
३) वक्रतुंड गणेश.
४) पंचमुखी हनुमान.
५) नवरात्र महोत्सव.
सामासिक शब्दांचा विशेषणाप्रमाणे वापर केला जातो. त्याला समासघटित विशेषणे म्हणतात.

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव