प्रकरणचे नाव - क्रियाविशेषण अव्यय

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - क्रियाविशेषण अव्यय

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) क्रियाविशेषण अव्ययाची व्याख्या व फरक

1. क्रियाविशेषण म्हणजे काय?

■ क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात.
□ म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात.
□ क्रियापदाने जी क्रिया दर्शविली जाते ती केव्हा घडली, कोठे घडली कशी घडली, किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली. अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द वाक्यात येतात. त्यांना आपण क्रियाविशेषण असे म्हणतो.
क्रियाविशेषण हे कधी विकारी असते, तर कधी अविकारी असते.

2. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय?

■ क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात.
□ क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
क्रियाविशेषण हे विकारी असते.
क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी असते.

■ क्रियाविशेषण ओळखण्याची Trick
क्रियापदास प्रश्न करणे. येणार उत्तर हे क्रियाविशेषण असते.
1.क्रिया कसा / कशी घडली.
2.क्रिया कोठे घडली.
3.क्रिया केव्हा घडली.

3. क्रियाविशेषण व क्रियाविशेषण अव्यय यातला फरक

क्रियाविशेषण : हे कर्त्याच्या लिंगानूसार किंवा वचनानूसार बदलते. तसेच क्रियाविशेषणाला विभक्ती प्रत्यय असतात.
□ उदाहरणार्थ
१) तो चांगला खेळतो.
२) ती चांगली खेळते.
३) ते चांगले खेळतात.

क्रियाविशेषण अव्यय : हे कर्त्याच्या किंवा वचनानूसार बदलत नाही. तसेच क्रियाविशेषण अव्ययला विभक्ती प्रत्यय नसतात.
□ उदाहरणार्थ
१) तो हळू खेळतो.
२) ती हळू खेळते.
३) ते हळू खेळतात.

4. क्रियाविशेषण व विशेषण यातील फरक

विशेषण -: नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात.
क्रियाविशेषण -: क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या विकारी किंवा अविकारी शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात.

■ विशेषण ओळखण्याची Trick
नामाला प्रश्न करणे. येणार उत्तर हे विशेषण असते.
1. कसा/कशी
2. कोठे.
3. केव्हा.
□ उदाहरणार्थ
१. काळा राम चांगला खेळतो.
नाम- राम
नामाला प्रश्न करणे. कसा राम?
येणारा उत्तर -> काळा

■ क्रियाविशेषण ओळखण्याची Trick
क्रियापदाला प्रश्न करणे. येणार उत्तर हे क्रियाविशेषण असते.
1. कसा/कशी.
2. कोठे.
3. केव्हा.
□ उदाहरणार्थ
१. काळा राम चांगला खेळतो.
क्रियापद- खेळतो
क्रियापदाला प्रश्न करणे. कसा खेळतो ?
येणारा उत्तर -> चांगला

5. क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी अव्यय यातील फरक

शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडूणच येतो.
क्रियाविशेषण अव्यय हे नामाला जोडूण येत नाही.
○ जर शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडूण नसेल. तर ते क्रियाविशेषण अव्यय बणते.
□ उदाहरणार्थ
१. रामाजवळ सायकल आहे.--(शब्दयोगी अव्यय)
२. राम जवळ सायकल आहे. --(क्रियाविशेषण अव्यय)

6. क्रियाविशेषण अव्ययांचा वापर उभयान्वयी अव्ययाप्रमाणे करणे

■ क्रियाविशेषण अव्ययांचासुद्धा उभयान्वयी अव्ययाप्रमाणे वापर केला जातो. शक्यतो हे शब्द जोडीने येतात.
□ उदाहरण -: जेथे-तेथे, जिकडे-तिकडे, जेव्हा-तेव्हा, जसे-तसे, जरी-तरी, जर-तर. इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला. (कालवाचक क्रियाविशेषण अव्यय)
२. जेथे दिव्यत्वाची प्रचीती तेथे कर माझे जुळती. (स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय)

(B) क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार व उजळणी

1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

■ क्रिया केव्हा घडले, हे सांगणाऱ्या अविकारी शब्दास कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
□ क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवितात.
□ कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे तीन उपप्रकार पडतात.
○ 1. कालदर्शक - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
○ 2. सातत्यदर्शक - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
○ 3. आवृत्तिदर्शक - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय

■ 1. कालदर्शक - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
□ क्रिया केव्हा घडली याची वेळ दर्शविणाऱ्या अव्ययी शब्दांना.
□ उदाहरण - : आता, आज, काल, आधी, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, दिवसा, रात्री, अगोदर, इतक्यात इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. काल शाळेला सुट्टी होती.
२. पूर्वी शिक्षक पागोटे घालत.
३. मी उद्या गावाला जाईल.
४. तुम्ही केव्हा आलात?
५. अपघात रात्री झाला.
६. हल्ली कोणी कोणाचे ऐकत नाही.

■ 2. सातत्यदर्शक - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
अखंड क्रिया दर्शविणाऱ्या अव्ययी शब्दांना.
□ उदाहरण - : नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी, अद्यापि, दिवसभर, आजकाल, अजून, सर्वकाळ, हमेशा इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. पाऊस सतत कोसळत होता.
२. दिवसभर ऊन रणरणत होते.
३. सुसंगती सदा घडो.
४. नेहमी काम करावे.
५. सतत अभ्यास करावा.

■ 3. आवृत्तिदर्शक - कालवाचक क्रियाविशेषण अव्यय
पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या अव्ययी शब्दांना.
□ उदाहरण - : वारंवार, फिरून, पुनःपुन्हा, दररोज, सालोसाल, क्षणोक्षणी, हरघडी, दरसार इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. मी दररोज व्यायाम करतो.
२. तो वारंवार आजारी पडतो.
३. फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात.
४. आई दररोज मंदिरात जाते.
५. पराग पुनःपुन्हा तेच बोलत होता.
६. क्षणोक्षणी अण्णांचा रागाचा पारा होता.

2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय

■ क्रिया कोठे घडते सांगणाऱ्या अविकारी शब्दास स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
□ क्रियेचे स्थळ किंवा ठिकाण दर्शविणाऱ्या अव्ययांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
□ स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे दोन उपप्रकार पडतात.
○ 1. स्थितिदर्शक - स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
○ 2. गतिदर्शक - स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय

■ 1. स्थितिदर्शक - स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
स्थिती दर्शवणाऱ्या अव्ययी शब्दांना.
□ उदाहरण - : येथे, इथे, तिथे, जिथे, खाली, वर, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवार, आसपास, सर्वत्र इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. परमेश्वर सर्वत्र असतो.
२. पलीकडे एक चिंचेचे झाड आहे
३. पंतग वर आहे.
४. तो खाली बसला
५. तेथे एक मुलांचे वसतिगृह आहे.
६. पुढे मंदिर आहे.
७. समोरच कॉलेज आहे.
८. मागे अभ्यासिका आहे.

■ 2. गतिदर्शक - स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय
हालचाल दर्शवणाऱ्या अव्ययी शब्दांना.
□ उदाहरण - : इकडून, तिकडून, दूर, लांब, तिथून, मागून, पुढून, वरून, खालून, समोरून, येथून इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. साप माझ्या समोरून गेला.
२. येथून नदी जवळ आहे.
३. जंगलातून जाताना पुढून वाघ आला.
४. साप पाहून मधू दूर पळाला.
५. इकडून सरळ गेलात की गाव आहे.
६. पुलाखालून पाणी वाहते.
७. येथपासून सर्व आमची घरे आहेत.
८. चोहीकडे पाऊस पडत होता.

3. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

■ क्रिया कशी घडली हे दर्शविणारे अविकारी शब्दास रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
□ क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दर्शविणाऱ्या अव्ययांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
□ रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे तीन उपप्रकार पडतात.
○ 1. प्रकारदर्शक - रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
○ 2. अनुकरणदर्शक - रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
○ 3. निश्चयार्थक - रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय

■ 1. प्रकारदर्शक - रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
□ क्रिया कशाप्रकारे घडते याची रीत दर्शवणाऱ्या अव्ययी शब्दांना.
□ उदाहरण - : हळू, सावकाश, जलद, उगीच, व्यर्थ, फुकट, असे, तसे, जसे, कसे, आपोआप, मुद्दाम, जेवी, तेवी इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. तो रस्त्यातून जाताना सावकाश चालावे.
२. तो जलद धावला.
३. पैसा फुकट गेला.
४. कप आपोआप फुटला.
५. जसे करावे तसे भरावे.
६. कुत्रा जलद पळतो.
७. त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.
८. त्यांनी उगीच काम घेतले.

■ 2. अनुकरणदर्शक - रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
□ शब्दांची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या अव्ययी शब्दांना.
□ उदाहरण - : झटझट, झटकन, झपझप, पटकन, पटपट, टपटप, चमचम, बदाबद, धपाधप, वटवट, खळखळ, तुरूतुरू, भराभरा, गटगट इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. तो मुलगा उभ्याने पाणी गटागटा पितो.
२. मला पाहून तो झटकन गेला.
३. पाणी खळखळ वाहते.
४. तो बदाबद आपटला.
५. झटपट काम करणे.
६. पटपट निर्णय घ्यावा.

■ 3. निश्चयार्थक - रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय
निश्चिती किंवा खात्री दर्शवणाऱ्या अव्ययी शब्दांना.
□ उदाहरण - : खचित, खरोखर, नक्की, खरेच, नि:संशय. खुशाल, निखालस इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. खचित तो खोटे बोलतो.
२. तू खुशाल घरी जा.
३. त्याने खरोखर मनापासून अभ्यास केला आहे.
४. त्याला नक्की यश मिळेल.

4. संख्यावाचक / परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय

■ एखादी क्रिया कितीदा घडली किंवा किती वेळा घडली किंवा क्रियेचे परिमाण दर्शविणारे अविकारी शब्दास संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
□ क्रियेविषयी संख्येच्या भाषेत माहिती सांगणारे शब्द म्हणजेच संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय होय .
□ उदाहरण - : कमी, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकूल, अजिबात, मुळीच, मोजके, पूर्ण, अधिक, फार, खूप, भरपूर, अतिशय, पुष्कळ, जास्त, पुरेसा, बस, बेताचा, पहिला, चारदा, चौपट, क्रमाने, क्रमश: इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. त्या मुलीला मी दोनदा सांगितले.
२. ते गृहस्थ वाचताना किंचित अडखळतात.
३. सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर पाणी प्यालो.
४. तो मुळीच घाबरला नाही.
५. तो पहिला आला.
६. जरा दमाने घे.
७. थोडा लांब हो.
८. ते मला अजिबात मान्य नाही.

5. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय

■ वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप दर्शविणारे अविकारी शब्दास प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
का, ना हे शब्द त्या त्या वाक्यांतील विधानांना प्रश्नाचे स्वरूप देतात, म्हणून अशा शब्दांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
□ उदाहरण - : का, ना, केव्हा, कोठे, कसे इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. आपण मला आपल्या घरी न्याल ना ?
२. तू मला तुझे पुस्तक देशील का ?
३. केव्हा आलास तू?
४. कसे सांगू तुला?

6. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय

■ जेव्हा वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शविणारे अविकारी शब्दास निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
न, ना हे शब्द त्या त्या वाक्यांतील क्रियेचा नकार किंवा निषेध किंवा विरोध दर्शविते, म्हणून अशा शब्दांना निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
□ उदाहरण - : न, ना इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. गाडी थांबता गेली.
२. त्याने खरे सांगितले तर ना!
३. तो चुकता येते.
४. ते येतील तर ना.

7. स्थानिक क्रियाविशेषण अव्यय

■ स्थानिक क्रियाविशेषणे : इतर जातीचे शब्द जसेच्या तसे जेव्हा वाक्यात क्रियाविशेषणाप्रमाणे उपयोगात येतात तेव्हा त्यांना स्थानिक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
□ उदाहरणार्थ
१. ती काय माती गाते ! (नाम)
२. तो इंग्रजी चांगले बोलतो. (विशेषण)
३. तो हसत बोलतो. (कृदन्त)
४. तू जिन्यावर ये. (शब्दयोगी)
५. मी तर गरीब. (उभयान्वयी)
६. दहा रुपये तरी लागतील. (उभयान्वयी)
○ वरील वाक्यांतील माती, चांगले, हसत, वर, तर, तरी हे इतर प्रकारचे शब्द आहेत. यांना स्थानिक क्रियाविशेषण अव्यय असेही म्हणतात.

(C) सिध्द व साधित क्रियाविशेषण अव्यय

1. सिध्द क्रियाविशेषण अव्यय

मूळ शब्द ज्यांना उपसर्ग अथवा प्रत्यय नसतो अशा शब्दांचा वापर क्रियाविशेषणाप्रमाणे केल्यास त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
□ काही शब्द मुळातच क्रियाविशेषण असतात म्हणून त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
□ उदाहरण - : मागे, पुढे, येथे, तिथे, इथे, आज, हळू, लवकर, आता इत्यादी.
□ उदाहरणार्थ
१. तो मागे गेला.
२. गाव पुढे आहे.
३. शाळा आता भरली.

2. साधित - क्रियाविशेषण अव्यय

■ साधित क्रियाविशेषण अव्यय : नाम, विशेषण, क्रियापद, सर्वनाम व शब्दयोगी अव्यय यांच्यापासून तयार झालेल्या क्रियाविशेषणांना साधित क्रियाविशेषण म्हणतात.
मूळ शब्दाला प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना साधित क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
□ उदाहरण -: मोठ्याने, वस्तुतः, एकदा, हसताना, कोठून हे शब्द मूळ शब्दांना प्रत्येय लागून बनले आहेत. अशांना साधित क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.
१) नामसाधित - दिवसा, रात्री, सकाळी, वस्तुतः, व्यक्तिशः, अर्थात.
२) सर्वनामसाधित - त्यामुळे, ह्यावरून, कित्येकदा.
३) विशेषणसाधित - मोठ्याने, एकदा, इतक्यात, सर्वत्र, एकत्र.
४) धातुसाधित - हसत, हसून, खेळून, चालून, रडताना, पळताना, खाताना, खेळताना, बोलून.
५) अव्ययसाधित - कोठून, इकडून, खालून, वरून, येथपर्यंत.
६) प्रत्ययसाधित - शास्त्रदृष्ट्या, मनःपूर्वक, कालानुसार, बुद्धिपुरस्सर.
७) सामासिक (द्विरीक्त) - आजन्म, यथाशक्ती, घरोघर, गावोगाव, हरघडी, गैरहजर

■ इतर उदाहरणार्थ
१) तो रात्री आला. (नामसाधित)
२) त्याला त्यामुळे मारले. (सर्वनाम साधित)
३) आज मधू शाळेत गैरहजर आहे. (समासघटित)
४) तिने सर्व रडून सांगितले. (धा. सा)
५) पाऊस दररोज पडतो. (समासघटित)
६) पाणी खालून वाहते. (अव्यय साधित)
७) तो मोठ्याने ओरडला. (विशेषण साधित)
८) मोत्याच्या शोधात आम्ही गावोगाव फिरलो. (समासघटित)

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव