प्रकरणचे नाव - वर्णांची संधी व संधीचे प्रकार

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - वर्णांची संधी व संधीचे प्रकार

(■))--------● अभ्यासक्रम ●--------((■)

(A) संधी व संधीची उजळणी

1. संधी व संधी विग्रह म्हणजे काय?

■ संधी - उगम 
□ संधी हा शब्द "सम्‌ + धा" यावरुन तयार झाला आहे.  
□ "सम" म्हणजे "एकत्र" व "धा" म्हणजे "ठेवणे". 
□ सम + धा = संधी 

■ संधी - अर्थ 
□ संधी म्हणजे "सांधणे" किंवा "जोडणे" होय. 
□ संधीचे इतर अर्थ - सांधणे, जोडणे, ऐक्य, एकत्र करणे, संयोग करणे 

■ संधी - व्याख्या 
□ जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवरचा वर्णदुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोहोंबद्दल एकच वर्ण तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात.  
□ उदा. देव + आलय = देवालय 
□ झालेली संधी -: दे + लय ( + =

■ संधीचे वेशिष्ट्ये  
संस्कृत व्याकरणातून मराठीत आलेला घटक आहे. 
□ संधी हे भाषा संयोजनातून तयार झाला आहे.  
□ संधी ही बोलण्याच्या ओघात होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे.  
□ संधी झालेला प्रत्येक शब्द तत्समशुध्द शब्द असतो.  
□ संधीमध्ये दोन शब्द एकत्र येतात शिवाय उपसर्ग व प्रत्यय लागून होते.

■ संधी - विग्रह 
संधीयुक्त शब्दाची केलेली फोड म्हणजे "संधी विग्रह" होय. 
□ उदा. संधीयुक्त शब्द ----> संधी विग्रह 
……………. 1. देवालय ------> देव + आलय  
……………. 2. सूर्याद्य -------> सूर्य + उदय 

■ संधी - आदेश  
□ संधी करताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे. म्हणजे बदल होणे याला "आदेश" म्हणतात. 
□ उदा. सूर्य + उदय = सूर्योदय 
□ झालेली आदेश -: सूर्य + दय ( अ + = )

■ संधी - आगम  
□ संधी होताना मध्येच एखाद्या वर्णाचे आगमन होणे (भर पडणे) याला आगम म्हणतात.  
□ उदा. ध+ तो = धरितो  
धर यात - आगम 

■ संधी - संप्रसारण  
□ संधी होताना “ य, व, र ” याच्या जागी “ इ, उ, ऋ " येतात तेव्हा त्यास संप्रसारण म्हणतात.  
□ उदा. येथे → थे , न → न, ण→ रि

2. संधीचे मुख्य तीन प्रकार व व्याख्या

■ संधींचे तीन प्रकार पडतात.   
१. स्वर / अच् संधी   
२. व्यंजन / हल् संधी   
३. विसर्ग संधी 

■ 1. स्वर संधी / अच्‌ संधी / विवृत्त संधी  
□ जवळ येणाऱ्या वर्णांपैकी "पहिले" वर्ण "स्वर" व "दुसरे" वर्ण "स्वर" असेल तर त्याला "स्वर संधी" म्हणतात.   
□ एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्यास स्वर संधी असे म्हणतात.  
□ स्वर संधीला संस्कृतमध्ये "अच् संधी" असेही म्हणतात.  
□ स्वर संधीलाच "विवृत्त संधी" असेही म्हणतात.   
○ स्वरसंधीचे स्वरूप   
सूत्र. स्वरसंधी = स्वर + स्वर   
उदा. सूर्यास्त = सूर्य + अस्त ( + = आ ) 

■ 2. व्यंजन संधी / हल्‌ संधी / संवृत्त संधी  
□ जवळ येणाऱ्या वर्णांपैकी "पहिले" वर्ण "व्यंजन" व "दुसरे" वर्ण "व्यंजन किंवा स्वर" असेल तर त्याला "व्यंजन संधी" म्हणतात.   
□ व्यंजन संधीला संस्कृतमध्ये "हल्‌ संधी" असेही म्हणतात.  
□ व्यंजन संधीलाच "संवृत्त संधी" असेही म्हणतात.  
○ व्यंजनसंधीचे स्वरूप   
सूत्र. व्यंजनसंधी = व्यंजनस्वर / व्यंजन   
उदा. सदाचार = सत्‌ + आचार ( त् + = दा )  
उदा. सज्जन = सत्‌ + जन ( त् + ज् = ज्ज ) 

■ 3. विसर्ग संधी  
□ एकत्र येणाऱ्या वर्णातील "पहिला" वर्ण "विसर्ग" व "दुसरा" वर्ण "व्यंजन किंवा स्वर" असेल तर त्याला "विसर्ग संधी" म्हणतात.
□ विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे होय.
○ व्यंजनसंधीचे स्वरूप 
सूत्र. विसर्गसंधी = विसर्गस्वर / व्यंजन   
उदा. दुरात्मा = दु: + आत्मा ( विसर्ग + = रा )  
उदा. यशोधन = यश: + धन ( विसर्ग + = शो )

3. संधीचे tricky नियम

स्वर संधी = स्वर + स्वर   
व्यंजन संधी = व्यंजन + स्वर / व्यंजन   
विसर्ग संधी = विसर्ग + स्वर / व्यंजन

(B) स्वर संधीचे उपप्रकार व संधी नियम

1. दीर्घादेश स्वरसंधी

■ दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास या दोन्हींबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो, याला दीर्घत्व संधी असे म्हणतात.  
□ दीर्घत्व संधी कशी ओळखावी, संधी होऊन तयार झालेल्या वर्णाला काना, दुसरा उकार किंवा दुसरी वेलांटी असते.  
□ या संधीला दीर्घादेश संधी असेसुद्धा म्हणतात. 

■ दीर्घादेश संधी नियम
....... अ / आ + अ / आ = ..... (काना) 
.............. इ / ई + इ / ई = ....... (दुसरी वेलांटी) 
........... उ / ऊ + उ / ऊ = ...... (दुसरा उकार) 
....................... ऋ + ऋ = ..... (दीर्घ) 

अ + अ = आ ......................... (काना) 
1) सूर्य + अस्त = सूर्यास्त  
2) रूप + अंतर = रुपांतर  
अ + आ = आ ......................... (काना) 
1) हिम + आलय = हिमालय  
2) अनाथ + आश्रम = अनाथाश्रम  
आ + अ = आ........................ (काना) 
1) विद्या + अर्थी = विद्यार्थी 
2) भाषा + अंतर = भाषांतर  
आ + आ = आ ....................... (काना) 
1) महिला + आश्रम = महिलाश्रम  
2) विद्या + आलय = विद्यालय 

इ + इ = ई ........................... (दुसरी वेलांटी) 
1) कवि + इच्छा = कवीच्छा  
2) हरि + इच्छा = हरीच्छा  
इ + ई = ई ........................... (दुसरी वेलांटी) 
1) कवि + ईश्वर = कवीश्वर  
2) परि + ईक्षा = परीक्षा  
ई + इ = ई ........................... (दुसरी वेलांटी) 
1) रवी + इंद्र = रवींद्र 
2) मही + इंद्र = महींद्र  
ई + ई = ई ........................... (दुसरी वेलांटी) 
1) मही + ईश = महीश  
2) मही + ईश्वर = महीश्वर 

उ + उ = ऊ ......................... (दुसरा उकार) 
1) गुरु + उपदेश = गुरूपदेश  
2) रघु + उत्तम = रघूत्तम  
उ + ऊ = ऊ ........................ (दुसरा उकार) 
1) गुरु + ऊरु = गुरूरु 
2) सिंधु + ऊर्मी = सिंधूर्मी  
ऊ + उ = ऊ ......................... (दुसरा उकार)  
1) भू + उद्धार = भूद्धार 
2) वधू + उत्कर्ष = वधूत्कर्ष 
ऊ + ऊ = ऊ ......................... (दुसरा उकार) 
1) भू + ऊर्जा = भूर्जा  
ऋ + ऋ = ॠ ......................... (दीर्घ-ऋ) 
1) पितृ + ऋण = पितॄण  
2) मातृ + ऋण = मातॄण 

■ नोट 
□ "" चा पहिला उकार - "रु", दुसरा उकार - "रू
□ कवि, हरि, वायु, प्रीति, गुरु हे तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त उच्चारले जातात.  
□ जसे - कवी, हरी, गुरू,वायू, प्रीती, ऋषि, युक्ति, मति, मुनि, शक्ति, साधु, बुद्धि, हरि, कवि, सृष्टि, मधु, प्रीति, यासारखे (तत्सम) संस्कृतमधील शब्द मराठीत लिहिताना दीर्घान्त लिहावेत.  
□ दीर्घन्त म्हणजे - दुसरी वेलांटी, दुसरा उकार याप्रमाणे 
□ ऋषी, युक्ती, मती, शक्ती, बुद्धी, साधू, कवी, मुनी, हरी, मधू, प्रीती ह्याप्रमाणे लिहावेत. 
□ पण हेच शब्द जोडशब्दात येताना पूर्वपदी आले असता (ऱ्हस्व) स्वरूपात लिहावेत.  
शक्तिमान, गतिमान, मतिमंद, कविराज, गुरुकृपा, पाणिग्रहण.

2. गुणादेश स्वरसंधी

■ दोन वर्ण एकत्र येऊन ए, ओ, अर्‌, अल् असे बद्दल झाल्यास याला गुणादेश असे म्हणतात. 
आदेश म्हणजे काय, संधी होताना एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होणे, याला आदेश असे म्हणतात.
अ / आ यांच्यापुढे इ / ई आल्यास त्या दोघांऐवजी "" येतो. अ / आ यांच्यापुढे उ / ऊ आल्यास "" येतो. आणि अ / आ यांच्यापुढे आल्यास त्या दोघांऐवजी "अर्" येतो त्यास गुणादेश संधी म्हणतात.

■ गुणादेश संधी नियम
.................. अ / आ + इ / ई =
................ अ / आ + उ / ऊ =
..................... अ / आ + ऋ = अर्‌ 
...................... अ / आ + लृ = अल्‌ 

अ + इ = ए
1) ईश्वर + इच्छा = ईश्वरेच्छा
2) गज + इंद्र = गजेंद्र
अ + ई = ए
1) गण + ईश = गणेश 
2) राम + ईश्वर = रामेश्वर
आ + इ = ए
1) महा + इंद्र = महेंद्र 
2) यथा + इष्ट = यथेष्ट 
आ + ई = ए
1) महा + ईश = महेश 
2) लंका + ईश्वर = लंकेश्वर

अ + उ = ओ
1) सूर्य + उदय = सूर्योदय 
2) पुरुष + उत्तम = पुरुषोत्तम 
अ + ऊ = ओ 
1) समुद्र + ऊर्मी = समुद्रो्र्मी 
2) जल + ऊर्मी = जलोर्मी
आ + उ = ओ 
1) गंगा + उदक = गंगोदक 
2) महा + उत्सव = महोत्सव 
आ + ऊ = ओ
1) गंगा + ऊर्मी = गंगोर्मी 
2) रंभा + ऊरू = रंभोरू

अ + ऋ = अर् 
1) सप्त + ऋषी = सप्तर्षी 
2) देव + ऋषी = देवर्षी 

अ + लृ = अल् / आल्
1) तव + लृकार = तवल्कार 
2) पवा + लृकार = पवाल्कार

3. वृद्धयादेश स्वरसंधी

■ दोन स्वर एकत्र येऊन ऐ, औ स्वर तयार झाल्यास त्यास वृद्धयादेश असे म्हणतात.
अ / आ यांच्यापुढे ए / ऐ हे स्वर आल्यास त्या दोघांऐवजी "" येतो आणि ओ / औ आल्यास त्या दोघांऐवजी "" येतो त्यास वृद्धयादेश संधी म्हणतात.

■ वृद्धयादेश संधी नियम 
..............अ / आ + ए / ऐ =
..........अ / आ + ओ / औ =

अ + ए = ऐ 
1) क्षण + एक = क्षणैक 
2) एक + एक = एकैक 
आ + ए = ऐ 
1) सदा + एव = सदैव 
अ + ऐ = ऐ 
1) मत + ऐक्य = मतैक्य 
2) जन + ऐक्य = जनैक्य 
आ + ऐ = ऐ 
1) प्रजा + ऐक्य = प्रजैक्य 
2) विद्या + ऐश्वर्य = विद्यैश्वर्य 

अ + ओ = औ
1) जल + ओघ = जलौष 
आ + ओ = औ 
1) गंगा + ओघ = गंगौघ
2) यमुना + ओघ = यमुनौघ
अ + औ = औ 
1) वृक्ष + औदार्य = वृक्षौदार्य 
2) वन + औषधी = वनौषधी 
आ + औ = औ 
1) महा + औदार्य = महौदार्य
2) क्षमा + औचित्य = क्षमौचित्य

4. यणादेश स्वरसंधी

■ इ, उ, ऋ (ऱ्हस्व / दीर्घ) यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास " इ / ई " बद्दल ( य् ), " उ / ऊ " बद्दल ( व ) तर " ऋ " बद्दल ( र्‌ ) वर्ण येतात आणि त्यात पुढील स्वर मिसळून संधी होते. अशा प्रकारे ( य्‌, व्‌, र्‌) असे बद्दल होतात, त्याला यणादेश असे म्हणतात.
य, व, र हे अर्धस्वर आहेत म्हणून या संधीला अर्धस्वर संधी असे म्हणतात.
□ नियम - य्‌, व्‌, र्‌ ऐवजी अनुक्रमे इ, उ, ऋ असे बदल होतात. तेव्हा त्याला संप्रसारण म्हणतात.
□ उदा. येथे - थे, न - न, गा - गाला 

■ यणादेश संधी नियम 
......... इ / ई → ( य् )
........ उ / ऊ → ( )
.............. → ( र्

इ + अ = य् + अ = य 
1) प्रीति + अर्थ = प्रीत्यर्थ 
2) अति + अंत = अत्यंत 
इ + आ = य् + आ = या 
1) इति + आदी = इत्यादी 
2) अति + आचार = अत्याचार
ई + ओ = य् + ओ = यो 
1) नदी + ओघ = नद्योघ
इ + उ = य् + उ = यु
1) अति + उत्तम = अत्युत्तम
ई + उ = य्‌ + उ = यु 
1) नदी + उद्गम = नद्युद्गम
इ + ए = य्‌ + ए = ये 
1) प्रति + एक = प्रत्येक
ई + ए = य्‌ + ए = ये 
1) किती + एक = कित्येक 

उ + अ = व् + अ = व 
1) अनु + अर्थ = अन्वर्थ 
2) सु + अल्प = स्वल्प
उ + आ = व्‌ + आ = वा 
1) गुरु + आज्ञा = गुर्वाज्ञा 
2) सु + आगत = स्वागत
उ + ओ = व् + ओ = वो 
1) गुरु + ओघ = गुर्वोघ 
उ + इ = व् + इ = वि 
1) यदु + इंद्र = यद्विंद्र 
ऊ + ई = व्‌ + ई = वी 
1) भानू + ईश्वर = भान्वीश्वर 

ऋ + आ = र् + आ = रा 
1) पितृ + आज्ञा = पित्राज्ञा
ऋ + औ = र् + औ = रौ
1) पितृ + औदार्य = पित्रौदार्य 
ऋ + इ = र् + इ = रि 
1) मातृ + इच्छा = मात्रिच्छा

5. अयादी स्वरसंधी

ए, ऐ, ओ, औ या सयुंक्त स्वरांपुढे कोणताही स्वर आला, तर बद्दल "अय्‌" बद्दल "आय्‌" बद्दल "अव्‌", बद्दल "आव्" असे आदेश होऊन त्यात पुढचा स्वर मिसळतो यास अयादी संधी असे म्हणतात.
ए, ऐ, ओ, औ या स्वरांपुढे जर एखादा स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय्, आय्, अव्‌, आव् असे आदेश होऊन पुढील स्वर यात मिसळतो. 

■ अयादी संधी नियम 
............. ए, ऐ अय्, आय्
......... ओ, औअव्‌, आव्

ए + अ = अय् + अ = अय 
1) ने + अन = नयन
ऐ + अ = आय्‌ + अ = आय 
1) गै + अन = गायन 
ऐ + इ = आय् + इ = आयि
1) गै + इका = गायिका 

ओ + अ = अव्‌ + अ = अव 
1) पो + अन = पवन 
ओ + इ = अव्‌ + इ = अवि
1) पो + इत्र = पवित्र
ओ + ई = अव्‌ + ई = अवी 
1) गो + ईश्वर = गवीश्वर 
ओ + उ = अव् + उ = अवु
1) गो + उत्साह = गवुत्साह
औ + अ = आव्‌ + अ = आव 
1) पौ + अन = पावन 
औ + इ = आव् + इ = आवि 
1) नौ + इक = नाविक 
औ + उ = आव् + उ = आवु 
1) भौ + उक = भावुक

(C) व्यंजन संधीचे उपप्रकार व संधी नियम

1. प्रथम / कठोर व्यंजन संधी

■ स्पर्श व्यंजनांपैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता, त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते. याला "प्रथम व्यंजन संधी" असे म्हणतात. 
संधी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील पहिल्या स्तंभातील क्, च्‌, ट, त्‌, प्‌ या कठोर व्यंजनांपैकी असते. तेव्हा ती "प्रथम व्यंजन संधी" असते. 
क्, च्, ट्‌, त्, प्‌ या पहिल्या पाच वर्गातील (अनुनासिके सोडून) कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन येऊन संधी होतो. या संधी प्रकाराला प्रथमर्व्यजन किंवा प्रथमरूप संधी असे म्हणतात. 

■ प्रथम व्यंजन संधी नियम
□ स्पर्श व्यंजन (अनुनासिकाशिवाय) + कठोर व्यंजन = च्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन + कठोर व्यंजन

■ ( संधी ) .... ( संधी विग्रह ) ... ( वर्णांची रचना )
□ विपत्काल = विपद्‌ + काल ... (द् + क् = त् + क् = त्क्)
□ वाक्‍पति = वाग् (क्‌) + पति … (ग् + प् = क् + प् = क्प्‌)
□ आपत्काल = आपद्‌ + काल ... (द् + क् = त् + क् = त्क्) 
□ दिक्पाल = दिग्‌ + पाल ......... (ग् + प् = क् + प् = क्प्‌)

2. तृतीय / मृदू व्यंजन संधी

■ स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. याला "तृतीय व्यंजन संधी" असे म्हणतात. 
□ संधी झालेल्या दोन वर्णांपैकी पहिले व्यंजन हे स्पर्श व्यंजन गटातील तिसऱ्या स्तंभातील ग्‌, ज्‌, ड्, द्‌, ब्‌ पैकी असते तेव्हा ती "तृतीय व्यंजन संधी" असते. 
क्, च्, ट्, त्, प् या पहिल्या पाच वर्गांतील (अनुनासिके सोडून) कोणत्याही कठोर व्यंजनापुढे मृदू व्यंजन किंवा स्वर आल्यास पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. त्याला तृतीय व्यंजन संधी म्हणतात. 

■ तृतीय व्यंजन संधी नियम
□ कठोर स्पर्श व्यंजन + मृदू वर्ण (अनुनासिक सोडून) = त्याच वर्गातील तिसरे मृदू व्यंजन + मृदू वर्ण

■ ..... ( संधी ) = ( संधी विग्रह ) ... ( वर्णांची रचना )
□ वागीश्वरी = वाक्‌ + ईश्वरी ...... (क् + ई = ग् + ई = गी)
□ दिग्विजय = दिक् + विजय .... (क् + व् = ग् + व्‌ + ई = ग्वि) 
□ अब्ज = अप् + ज ................ (प् + ज्‌ = ब्‌ + ज्‌ = ब्ज्)
□ सदाचार = सत्‌ + आचार ....... (त् + आ = द् + आ = दा)
□ भगवद्गीता = भगवत्‌ + गीता .. (त्‌ + ग्‌ = द् + ग् + ई = द्गी)
□ षड्रिपू = षट् + रिपु ............... (ट् + र् = ड् + र् + इ = ड्रि)
□ आजादी = आच् + आदी ....... (च् + आ = ज् + आ = जा)
□ सद्भावना = सत्‌ + भावना ...... (त्‌ + भ् = द् + भ् = द्भ)

3. अनुनासिक व्यंजन संधी

स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होते याला अनुनासिक संधी म्हणतात. 
□ अनुनासिक संधीत संधी झालेले दोन्हीही वर्ण अनुनासिके असतात. 
क्, च्, ट्, त्, प् या पहिल्या पाच वर्गांतील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आले, तर पहिल्या पदातील शेवटच्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होतो. याला अनुनासिक व्यंजन संधी म्हणतात.  

■ अनुनासिक संधी नियम
□ स्पर्श व्यंजन + अनुनासिक = त्याच वर्गातील अनुनासिक + अनुनासिक

■ ( संधी ) .... ( संधी विग्रह ) .... ( वर्णांची रचना )
□ षण्मास = षट्‌ + मास ....... (ट् + म्‌ = ण् + म्‌ + आ = मा)
□ जगन्नाथ = जगत्‌ + नाथ ... (त् + न्‌ = न् + न् + आ = न्ना)
□ वाङ्मय = वाक् + मय ....... (क् + म् = ङ् + म् + अ = ङ्म )
□ चिन्मय = चित्‌ + मय ........ (त् + म्‌ = न्‌ + म् + अ = न्म 
□ षण्मुख = षट्‌ + मुंख ........ (ट् + म् = ण् + म् + उ = ण्मु)

4. "त" ची व्यंजन संधी

त् - या व्यंजनापुढे च्, छ् आल्यास त्‌ बद्दल च् येतो व पुढील च्‌ / छ्‌ बरोबर संधी होते. 
□ 1) उच्छेद = उत्‌ + छेद (त् + छ् = च् + छ् = च्छ्)
□ 2) उच्चार = उत्‌ + चार (त् + च् = च् + च् = च्च्‌) 

त् - या व्यंजनापुढे ज्‌, द्‌ किंवा झ्‌ आल्यास त्‌ बद्दल ज्‌ होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते. 
□ 1) सज्जन = सत्‌ + जन (त् + ज् = ज् + ज् = ज्ज्‌) 
□ 2) शरज्झंझावत = शरत् + झंझावत ( त् + झ् = ज् + झ् = ज्झ्‌)
□ 3) तज्ज्ञ = तत् + ज्ञ ( त् + द् = ज् + द् = ज्द्) 

त् - या व्यंजनापुढे ट्‌ / ठ् आल्यास त्‌ बद्दल ट् होतो. 
□ 1) तट्टीका = तत्‌ + टीका (त् + ट् = ट् + ट् = ट्ट) 

त् - या व्यंजनापुढे ड् आल्यास त्‌ बद्दल ड् होतो. 
□ 1) उड्डाण = उत्‌ + डाण (त् + ड् = ड् + ड् = ड्ड) 

त् - या व्यंजनापुढे ल्‌ आल्यास त् बद्दल ल्‌ येतो.
□ 1) उल्लेख = उत्‌ + लेख (त् + ल् = ल् + ल् = ल्ल्) 

त् - या व्यंजनापुढे श्‌ आल्यास त्‌ बद्दल च्‌ होतो व पुढील. श्‌ बद्दल छ् होतो.
□ 1) मच्छर = मत्‌ + शर (त् + श् = च् + छ् = च्छ) 

त्‌ - या व्यंजनापुढे ह् आल्यास त् बद्दल द् होतो व पुढील ह् बद्दल ध् होतो. 
□ 1) सद्धेतू = सत्‌ + हेतू (त् + ह् = द् + ध् = द्ध)

5. "म" ची व्यंजन संधी

- पुढे स्वर आल्यास तो म्‌ मध्ये मिसळतो.
□ 1) सम्‌ + चार = समाचार 
□ 2) सम्‌ + पदेश = समुपदेश 
□ 3) सम्‌ + ईक्षा = समीक्षा 

- पुढे व्यंजन आल्यास म्‌ चा लोप होतोमागील अक्षरावर अनुस्वार येतो.
□ 1) सम्‌ + ती = संगती 
□ 2) सम्‌ + ताप = संताप 
□ 3) सम्‌ + कल्प = संकल्प 
□ 4) सम्‌ + ग्राम = संग्राम

6. "न" ची व्यंजन संधी

■ प्रथम पदाच्या शेवटी न्‌ असून पुढे तद्धित (विशोषण / नाम / अव्यय) प्रत्यय असल्यास न चा लोप होतो. 
□ 1) राजन्‌ + आज्ञा = राजाज्ञा 
□ 2) राजन्‌ + गृह = राजगृह 
□ 3) राजन्‌ + कुमार = राजकुमार 

■ पहिल्या पदाच्या शेवटी न्‌ येऊन त्यापुढे कोणताही स्वर आल्यास न्‌ चा लोप होतो व दोन्ही स्वरांची संधी होते. 
□ 1) आत्मन्‌ + राम = आत्माराम 
□ 2) राजन्‌ + इंद्र = राजेंद्र 

पहिल्या पदाचा अंत्य वर्ण ऋ / र / व असून दुसऱ्या पदाचा अंत्य वर्ण न्‌ असल्यास न्‌ चा ण्‌ होतो.
□ 1) रक्ष् + अ = रक्ष 
□ 2) मृ + अ = मर (परिवर्तन ण)
□ 3) परि + नाम = परिणाम 
□ 2) धृ + अन = धरण 

अहन्‌ - पुढे रात्र हा शब्द आल्यास न्‌ चा होतो व तो मागील मध्ये मिसळून तयार होतो. 
□ 1) अहन्‌ + रात्र = आहोरात्र 

अहन्‌ - पुढे कोणताही वर्ण आला (र्‌ सोडून) तर न्‌ चा र्‌ होतो. 
□ 1) अहन्‌ + मुख = अहर्मुख 

■ समास होताना प्रथम शब्द नकारान्त असल्यास किंवा नकारान्त शब्दापुढे तध्दित प्रत्यय आल्यास न्‌ चा लोप होतो.
□ 1) राजन्‌ + आज्ञा = राजाज्ञा (राजाची आज्ञा)
□ 2) हस्तिन्‌ + दन्त = हस्तिदन्त (हस्ती (हत्तीचे दात)

7. "छ" ची व्यंजन संधी

छ् - पूर्वी र्‍हस्व स्वर आला तर त्या दोहोंमध्ये च्‌ हा वर्ण येतो व च्‌ + छ्‌ = च्छ होतो. याला छ् ची संधी असे म्हणतात. 
□ यात च्‌छ्‌ ही दोन व्यंजने एकत्र येत असल्याने ही व्यंजन संधीच आहे. 
□ 1) अर्थच्छटा = अर्थ + छटा (अ + छ् = च्‌ + छ् = च्छ्)
□ 2) परिच्छेद = परि + छेद (इ + छ् = च्‌ + छ् = च्छ्)
□ 3) पितृच्छाया = पितृ + छाया (ऋ + छ् = च्‌ + छ् = च्छ्) 

छ् पूर्वी दीर्घ स्वर आल्यास मात्र च्‌ घेतला तरी चालतो किंवा नाही घेतला तरी चालतो. 
□ 1) लक्ष्मी + छाया = लक्ष्मीच्छाया / लक्ष्मीछाया

8. "स" ची व्यंजन संधी

अ / आ सोडून इतर कोणत्याही स्वरापुढे स्‌ आल्यास स्‌ चा ष्‌ होतो. याला परिवर्तन संधी असे म्हणतात. 
□ 1) वि + म = विम 
□ 2) प्रति + स्थान = प्रतिष्ठाण

(D) विसर्ग संधीचे उपप्रकार व संधी नियम

1. विसर्ग - "उ"कार संधी

■ विसर्गाच्या मागे "" हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा "" होतो व तो मागील "" मध्ये मिसळून त्याचा "" होतो.  
□ याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात.  
□ विसर्ग उकार संधी कशी ओळखावी - या संधियुक्त शब्दातील दुसऱ्या अक्षराला कानामात्रा असतो.

■ विसर्ग - “उ” कार संधी नियम
(अ + विसर्ग) + मृदू व्यंजन = (अ + उ = ओ) + मृदू व्यजन

■ उदा. यशोधन, मनोरथ  
1) यश: + धन = यशोधन  
2) मनः + रंजन = मनोरंजन  
3) तप: + बल = तपोबल  
4) मन: + बल = मनोबल  
□ अपवाद : मन: + कल्पीत = मनोकल्पीत, 
मनस्‌ + भंग = मनोभंग 

■ विसर्गाच्या मागे "" हा स्वर असून पुढे " क्, ख्, प्‌, फ् " ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग कायम राहतो, परंतु पुढे स्वर आल्यास विसर्ग लोप पावतो.  
1) प्रात: + काल = प्रातःकाल  
2) तेज: + पुंज = तेजःपुंज  
2) इत: + उत्तर = इतउत्तर  
4) अत: + एव = अतएव

2. विसर्ग -"र" संधी

■ विसर्गाच्या मागे / खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा "र्‌" होतो व पुढील वर्णाबरोबर संधी होते. याला विसर्ग "र्‌" संधी म्हणतात.
■ विसर्ग - “र” संधी नियम
(अ/आ + विसर्ग) + मृदू व्यंजन = र + मृदू व्यजन सोडून इतर
1) नि: + अंतर = निरंतर  (नि + र् + अंतर)
2) दुः + न = दुर्जन 
3) आयुः + वेद = आयुर्वेद 
4) चतुः + भूज = चतुर्भूज 

■ विसर्गाच्या मागे / असून पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र्‌ होतो; परंतु पुढे पुन्हा र्‌ आल्यास मागील र्‌ चा लोप होतो व त्याच्या मागील ऱ्हस्व स्वराचा दीर्घ स्वर होतो. 
1) नि: + रव = नीरव 
2) नि: + रस = नीरस 
3) निः + रद = नीरद 

■ पदाच्या शेवटी र्‌ येऊन त्याच्यापुढे कठोर व्यंजन आल्यास र् चा विसर्ग होतो. 
1) अंतर्‌ + करण = अंत:करण 
2) चतुर्‌ + सीमा = चतुःसीमा

3. विसर्ग -" स, श, ष" संधी

■ विसर्गाच्या पुढे " / कृ" धातूची रूपे असल्यास विसर्गाचा "स्‌" होऊन संधी होते. 
1) नमस्कार = नम: + कार (नम् + स्‌ + कार )
2) तिरस्कार = तिर: + कारा (तिर + स्‌ + कार )
3) पुरस्कृत = पुर: +  कृत (पुर + स्‌ + कृत)  
4) पुरस्कर्ता = पुर: + कर्ता (पुर् + स्‌ + कर्ता)  

■ विसर्गाच्या पुढे " च्‌, छ् " आल्यास विसर्गाचा "श्‌" होतो. 
1) शनै: + र = शनैश्च
2) अध: + वि = अधश्छवि 

■ विसर्गाच्या पुढे " ट, ठ " आल्यास विसर्गाचा "ष्" होतो.
1) शनैश्वर राम: + टीकते = रामष्टीकते 

■ विसर्गाच्या पुढे " त, थ " आल्यास विसर्गाचा "स्" होतो.
1) अध: + ल = अधस्थल 

■ विसर्गाच्या पुढे " श्‌, स्‌, ष्‌ " आल्यास विसर्ग कायम राहतो. 
1) दु: + शासन = दुःशासन 
2) निः + स्वार्थी = नि:स्वार्थी 
3) नि: + संशय = नि:संशय 
4) नि: + शेषे = निःशेष 

■ विसर्गाच्या मागे "" किंवा "" असून पुढे " क्, ख्, प्‌, फ् " हे वर्ण आले तर विसर्गाचा "ष्‌" होऊन संधी होते. 
○ विसर्ग - "ष्‌" संधी नियम
(इ/उ + विसर्ग) + क्/ख्/प्/फ् = (इ/उ + ष्) + क्/ख्/प्/फ्
1) दु: + काळ = दुष्काळ 
2) नि: + पाप = निष्पाप  
3) बहिः + कार = बहिष्कार 
4) चतु: + कोण = चतुष्कोन 

■ विसर्गाच्या पुढे " च्‌ / छ् " आल्यास विसर्गाचा "श्" होतो.
1) नि: + ल = निश्चल 
2) दु: + चिन्ह = दुश्चिन्ह 

■ विसर्गाच्या पुढे " त्‌ / थ्‌ " आल्यास "स्" होतो.
1) मन: + ताप = मनस्ताप 
2) नि: + तेज = निस्तेज 

■ पहिल्या पदाच्या शेवटी "स्‌" येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास "स्‌" चा विसर्ग होतो.
1) तेजस्‌ + ण = तेज:कण 
2) मनस्‌ + पूर्वक = मनःपूर्वक

(E) मराठीतील विशेष संधी

1. पूर्वरूप संधी

■ कधी कधी शब्दांची संधी होत असताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतोदुसरा स्वर लोप पावतो याला पूर्वरूप संधी असे म्हणतात.
1) नाहीसा = नाही + असा [ ई + (लोप) ]
2) नदीत = नदी + आत ( ई + )
3) लाडूत = लाडू + आत ( ऊ + )
4) पुरेसे = पुरे + असे ( ए + )

□ अनुसार, अनुरूप या शब्दांबरोबर संधी होताना मागील शब्दाचे सामान्यरूप होते व पुढील अ चा लोप होतो. हा एक पूर्वरूप संधीचा प्रकार आहे. 
1) पद्धत + नुसार = पद्धतीनुसार 
3) विषय + नुरूप = विषयानुरूप

2. पररूप संधी

■ काही मराठीतील शब्दांची संधी होताना एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतोदुसरा स्वर कायम राहतो अशा प्रकारच्या संधीला पररूप संधी असे म्हणतात.
1) घरी = घर + ई [ (लोप) + ई ]
2) हातून = हात + ऊन ( + ऊ ) 
3) एकेक = एक + एक ( + ए ) 
4) घामोळे = घाम + ओळे ( + ओ )

□ खालील वैशिष्ट्यपूर्ण संधी पररूप संधी याप्रकारात मोडतात. 
1) कुंभ + आर = कुंभार ( + आ )
2) लोह + आर = लोहार ( + आ )

☆ संधी ओळखण्याचे Tricky नियम

Tricks : (1) संधी विग्रह शब्दावरून संधीचे प्रकार ओळखणे.

🔰 संधी     
□ स्वर संधी = स्वर + स्वर        
□ व्यंजन संधी = व्यंजन + स्वर / व्यंजन        
□ विसर्ग संधी = विसर्ग + स्वर / व्यंजन

🔰 स्वर संधी

दीर्घादेश / दीर्घत्व स्वरसंधी :     
रचना : अ / आ + अ / आ      
रचना : इ / ई + इ / ई     
रचना : उ / ऊ + उ / ऊ    
(Trick - दोन सजातीय स्वर लागोपाठ येते.)

गुणादेश व वृद्धयादेश स्वरसंधी  
गुणादेश स्वरसंधी  
रचना : अ / आ + इ / ई / उ / ऊ / ऋ / लृ     
(Trick - अ / आ  + र्‍हस्व / दीर्घ स्वर ) / संधी विग्रहच्या पहिल्या शब्दात अ / आदुसर्‍या शब्दात र्‍हस्व / दीर्घ स्वर असते.  
वृद्धयादेश स्वरसंधी     
रचना : अ / आ + ए / ऐ / ओ / औ     
(Trick - अ / आ  + सयुंक्त स्वर) / संधी विग्रहच्या पहिल्या शब्दात अ / आदुसर्‍या शब्दात सयुंक्त स्वर असते. 

यणादेश स्वरसंधी     
रचना : इ / ई + अ / आ / उ / ए / ओ     
रचना : उ / ऊ  + अ / आ / इ / ई / ओ     
रचना : + आ / इ / ओ     
(Trick - इ / ई , उ / ऊ, ऋ  + इतर स्वर) / संधी विग्रहच्या पहिल्या शब्दात / ई , / ऊ, असते. 

अयादी स्वरसंधी     
रचना : ए / ऐ + अ / इ     
रचना : ओ / औ + अ / इ / ई / उ     
(Trick - सयुंक्त स्वर  + इतर स्वर) / संधी विग्रहच्या पहिल्या शब्दात सयुंक्त स्वर (ए, ऐ, ओ, औ) असते. 

🔰 व्यंजन संधी

प्रथम / कठोर व्यंजन संधी     
रचना : स्पर्श व्यंजन (अनुनासिके सोडून) + कठोर व्यंजन   
रचना : स्पर्श व्यंजन + (क्, ख्, च्‌, छ्, ट्, ठ्, त्‌, थ्, प्‌, फ्)   
(Trick - स्पर्श व्यंजन (अनुनासिके सोडून) + कठोर व्यंजन) / संधी विग्रहच्या दुसर्‍या शब्दात कठोर व्यंजन असते.

तृतीय / मृदू व्यंजन संधी     
रचना : कठोर व्यंजन + स्वर / मृदू व्यंजने (अनुनासिके सोडून)     
रचना : कठोर व्यंजने (क्, ख्, च्‌, छ्, ट्, ठ्, त्‌, थ्, प्‌, फ्) + स्वर / मृदू व्यंजने (ग्, घ्, ज्, झ्, ड्, ढ्, द्, ध्, ब्, भ्)   
(Trick - कठोर व्यंजन (अनुनासिके सोडून) + स्वर / मृदू व्यंजन) / संधी विग्रहच्या पहिल्या शब्दात कठोर व्यंजन असते.

अनुनासिक व्यंजन संधी     
रचना : स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजने + अनुनासिके     
रचना : क्, च्, ट्, त्, प् + अनुनासिके (ङ्, ञ्, ण्, न्, म्)  
(Trick - स्पर्श व्यंजन + अनुनासिके) / संधी विग्रहच्या दुसर्‍या शब्दात अनुनासिके असते.

🔰 विसर्ग संधी

□ संधीयुक्त शब्दात विसर्ग कायम राहत नाही   
रचना : विसर्ग + मृदू व्यंजन / स्वर 
( trick - संधी विग्रहच्या दुसर्‍या शब्दात मृदू व्यंजन / स्वर असेल तर विसर्ग कायम राहत नाही)

□ संधीयुक्त शब्दात विसर्ग कायम राहतो    
रचना : विसर्ग + कठोर व्यंजन 
( trick - संधी विग्रहच्या दुसर्‍या शब्दात कठोर व्यंजन असेल तर विसर्ग कायम राहतो)

🔰 मराठीतील विशेष संधी

पूर्वरूप संधी   
○ एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो.

पररूप संधी   
○ एकत्र येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दुसरा स्वर कायम राहतो.

Tricks : (2) संधीयुक्त शब्दावरून संधीचे प्रकार ओळखणे.

■ संधी
स्वर संधी = स्वर + स्वर   
व्यंजन संधी = व्यंजन + स्वर / व्यंजन   
विसर्ग संधी = विसर्ग + स्वर / व्यंजन

■ स्वर संधी

□ दीर्घादेश स्वरसंधी 
संधीयुक्त शब्दात आ, ई, ऊ, ॠ (काना, दुसरी वेलांटी, दुसरा उकार, दीर्घ ऋ) असेल.

□ गुणादेश स्वरसंधी
संधीयुक्त शब्दात ए, ओ, अर् (एक मात्रा, एक काना एक मात्रा, रफार) असेल.

□ वृद्ध्यादेश स्वरसंधी
संधीयुक्त शब्दात ऐ, औ (दोन मात्रा, एक काना दोन मात्रा) असेल.

□ यणादेश स्वरसंधी 
संधीयुक्त शब्दात " य, व, र " हे " इ / ई, उ / ऊ, ऋ " (वेलांटी, उकार, ऋ) यांच्या जागी असेल.

□ अयादी स्वरसंधी 
संधीयुक्त शब्दात " य, व " हे " ए / ऐ, ओ / औ " (एक/दोन मात्रा, एक काना एक/दोन मात्रा) यांच्या जागी असेल.

■ व्यंजन संधी

□ प्रथम / कठोर व्यंजन संधी
जोडाक्षर रचना : स्पर्श व्यंजनाचे पहिले स्तंभ + कठोर व्यंजने
( trick - दोन व्यंजनाची जोडाक्षर रचना ही : कठोर व्यंजन + कठोर व्यंजन असेल. किंवा दोन्ही कठोर व्यंजन असेल )

□ तृतीय / मृदू व्यंजन संधी
जोडाक्षर रचना : स्पर्श व्यंजनाचे तिसरे स्तंभ + स्वर / मृदू व्यंजने
( trick - दोन व्यंजनाची जोडाक्षर रचना ही : स्वर / मृदू व्यंजन + मृदू व्यंजन असेल. किंवा दोन्ही मृदू व्यंजन असेल. किंवा मृदू व्यंजनस्वर असेल.)

□ अनुनासिक व्यंजन संधी
जोडाक्षर रचना : स्पर्श व्यंजन + अनुनासिक
( trick - दोन जोडाक्षर रचना ही : आलेल्या स्पर्श व्यंजन च्या त्याच वर्गातील अनुनासिक + अनुनासिक असेल. किंवा दोन्ही अनुनासिक असेल.)

■ विसर्ग संधी
○ संधीयुक्त शब्दाचे वाचन करताना श्वास सोडला जातो.

Tricks : (3) संधीयुक्त शब्दाची संधी विग्रह करणे.

■ दीर्घादेश / दीर्घत्व संधी नियम
....... अ / आ + अ / आ = ..... (काना) 
.............. इ / ई + इ / ई = ....... (दुसरी वेलांटी) 
........... उ / ऊ + उ / ऊ = ...... (दुसरा उकार) 
....................... ऋ + ऋ = ..... (दीर्घ)

■ गुणादेश संधी नियम
.................. अ / आ + इ / ई =
................ अ / आ + उ / ऊ =
..................... अ / आ + ऋ = अर्‌ 
...................... अ / आ + लृ = अल्‌

■ वृद्धयादेश संधी नियम 
..............अ / आ + ए / ऐ =
..........अ / आ + ओ / औ =

■ यणादेश संधी नियम 
......... इ / ई → ( य् )
........ उ / ऊ → ( )
.............. → ( र् )

इ + अ/आ = य/या
इ/ई + ए = ये
इ/ई + उ = यु
ई + ओ = यो

उ + अ/आ = व/वा
उ + ओ = वो
उ + इ/ई = वि/वी

ऋ + आ = रा
ऋ + औ = रौ
ऋ + इ = रि

■ अयादी संधी नियम 
............. ए, ऐ अय्, आय्
......... ओ, औअव्‌, आव्

ए/ऐ + अ = अय / आय
ऐ + इ = आयि

ओ/औ + अ = अव/आव
ओ/औ + इ/ई = अवि/अवी/आवि
ओ/औ + उ = अवु/आवु

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव