प्रकरणचे नाव - वर्णमाला, वर्णउच्चार, वर्णदंड व जोडाक्षरे

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - वर्णमाला, वर्णउच्चार, वर्णदंड व जोडाक्षरे

(■))--------● अभ्यासक्रम (अ) ●--------((■)
प्रकरण (1) - मराठी : वर्णमाला

(A) वर्णांची मांडणी व आकडेवारी

1. वर्ण म्हणजे काय?

■ आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. 
उदा. अ, आ, इ, ...... क्, ख्, ग्, .........क्ष्, ज्ञ्.
□ हे मूलध्वनी हवेत विरतात व नाहीसे होतात. ते नष्ट होऊ नयेत म्हणून आपण लिहून ठेवतो.
भाषा वाक्यांनी बनते, वाक्ये शब्दांनी बनते, शब्द अक्षरांनी बनते, अक्षर वर्णांंनी बनते.
उदाहरणार्थ -:
वाक्य - मुलांनी खरे बोलावे.
शब्द - मुलांनी, खरे, बोलावे.
अक्षर - मु, लां, नी, ख, रे, बो, ला, वे.
वर्ण - म्+उ, ल्+आ+अं , न्‌+ई, ख्+अ, र्+ए, ब्‌+ओ, ल्+आ, व् + ए.
□ वर्णमालेत वर्णांची विभागणी तीन गटात केली जाते.
□ 1. स्वर, 2. स्वरादी, 3. व्यंजन

2. वर्णांची मांडणी

■ शासननिर्णय 2009 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली 52 वर्णांची वर्णमाला. (मराठीत एकूण 52 मुळाक्षरे आहे.)

■ स्वर (14)  
○ अ , इ , उ , ऋ , लृ ........... (5) र्‍हस्व
○ आ , ई , ऊ ..................... (3) दिर्घ
○ ए , ऐ , ओ, औ ............... (4) संयुक्त (उच्चार दीर्घ)
○ ॲ , ऑ. ......................... (2) इंग्रजी

■ स्वरादी (2)  
अं (अनुस्वार), अ: (विसर्ग)

■ व्यंजन (36 ← आज, 34 ← पूर्वी)
(खालील पाच वर्ग / कठोर वर ट्रिक : कचाट्यात पाय)
(............................ मृदू वर ट्रिक : गंजडे दाब)
○ क् , ख् ,....... ग्, घ् ,......... ङ्, ..…….. (क-वर्ग)
○ च् , छ् ,....... ज् , झ् ,........ ञ् , ......... (च-वर्ग)
○ ट् , ठ् ,........ ड् , ढ् ,......... ण्‌ , .......... (ट-वर्ग)
○ त् , थ् ,........ द् , ध् ,......... न्‌ , .......... (त-वर्ग)
○ प् , फ् ,....... ब् , भ्‌ ,......... म् , .......... (प-वर्ग)
....(10)........…(10)..........(5).. (25) स्पर्श व्यंजने
..|कठोर| ..... |मृदू| .. |अनुनासिक|  
○ य् , र् , ल् , व्‌ ..........…..... (4) अर्धस्वर  
○ श् , ष् , स्‌, ...................... (3) उष्मे  
○ ह् ................................... (1) महाप्राण
○ ळ् .................................. (1) स्वतंत्र (द्रविडीयन)
○ क्ष् , ज्ञ् .......................….. (2) संयुक्त व्यंजने

3. वर्णांची आकडेवारी

■ शासन निर्णय 2009 पूर्वी पारंपारिक / एकंदर / मूळ संस्कृत मराठी वर्णमालेत एकूण 50 किंवा 48 वर्ण होते.
□ शासन निर्णय 2009 नूसार आज (आधुनिक) मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत.

■ स्वराची एकूण आकडेवारी
○ मूळ पासून आज पर्यंत मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत.

■ स्वरादीची एकूण आकडेवारी
○ मूळ पासून आज पर्यंत मराठी वर्णमालेत एकूण 2 स्वरादी आहेत.

■ व्यंजनाची एकूण आकडेवारी
○ शासन निर्णय 2009 पूर्वी मराठी भाषेत एकूण 34 व्यंजने होते.
○ शासन निर्णय 2009 नूसार आज मराठी भाषेत एकूण 36 व्यंजने आहेत.

(B) वर्णांचे प्रकार व उजळणी

1. वर्णांचे मुख्य तीन प्रकार व व्याख्या

# वर्णमालेत वर्णांचे मुख्य तीन प्रकार मानतात.
□ 1. स्वर, 2. स्वरादी, 3. व्यंजन 

■ 1. स्वर - म्हणजे काय?
□ ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेच्या मुखातील कोणत्याही अवयशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना स्वर असे म्हणतात. (किंवा)
□ वर्णमालेतील ज्या अक्षरांचा उच्चार मुखातील जीभ, ओठ, दात, कंठ, तालू अशा अवयवांना स्पर्श न करता स्वतंत्रपणे श्वासाद्वारे होतो, अशा अक्षरांना “ स्वर ” असे म्हणतात.

■ 2. स्वरादी - म्हणजे काय?
□ ज्या वर्णांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो. त्यांना " स्वरादी " असे म्हणतात.
अनुस्वार (अं) व विसर्ग (अः) यांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो, म्हणून त्यांना " स्वरादी " असे म्हणतात.

■ 3. व्यंजन - म्हणजे काय?
□ ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेच्या मुखातील अवयशी स्पर्श होऊन तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना व्यंजन असे म्हणतात. (किंवा)
□ वर्णमालेतील ज्या अक्षरांचा उच्चार मुखातील जीभ, ओठ, दात, कंठ, तालू अशा अवयवांना स्पर्श करून स्वतंत्रपणे श्वासाद्वारे न होता, बाहेर पडतात अशा अक्षरांना “ व्यंजन ” असे म्हणतात.

2. वर्णांचे प्रकार स्वर व व्यंजन यातील फरक

■ स्वर स्वतंत्र उच्चाराचे असतात. हे दाखविण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहित नाही.
उदा. अ, आ, इ, ई, उ, ऊ,........
□ व्यंजने अपूर्ण उच्चाराचे असतात. हे दाखविण्यासाठी त्यांचा पाय मोडून लिहितात.
उदा. क्, ख्, ग्, घ्, ड्, च्,........
□ स्वर मुळातच अक्षर असतो.
उदा. अक्षर → अ = अ .......(स्वर)
□ व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी व्यंजनात स्वर मिसळणे गरजेचे असते.
उदा. अक्षर → क = क् + अ .....[ क् (व्यंजन), अ (स्वर) ]
□ स्वर व्यंजनांच्या शेवटी मिसळून व्यंजनांना , अक्षरत्व प्राप्त करून देण्याचे कार्य करतो.
□ व्यंजनात स्वर मिळवला, की अक्षर बनते.
□ व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची असल्याने त्यांचा "पाय मोडून" लिहितात. त्यात स्वर मिळवल्यास मात्र ती पाय मोडून लिहिली जात नाहीत.
□ उच्चार पूर्ण होण्यासाठी व्यंजने स्वरांवर अवलंबून असतात; म्हणून त्यांना "परवर्ण" किंवा "स्वरान्त" असे म्हणतात.
□ संस्कृतमध्ये व्यंजनांना " हल्‌ " तर स्वरांना " वाच्‌ " असे म्हणतात
□ स्वरांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहजस्वतंत्रपणे होतो. स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साहाय्यावाचून होतो. व  ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही, त्यांना व्यंजने म्हणतात.  
□ स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो.
□ स्वरांचा उच्चार प्रवाही असतो, त्यामुळे तो लांबविता येतो
□ व्यंजनांचा उच्चार मात्र प्रवाही नसतो
□ व्यंजनांचा उच्चार पूर्णस्पष्ट करण्यासाठी शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे लागते.
□ स्वर हे पूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत.
□ व्यंजने ही अपूर्ण उच्चारांची आहेत.

(C) स्वरांचे प्रकार व उजळणी

# मराठी स्वरांचे एकूण प्रकार

■ स्वरांचे एकूण प्रकार 
□ 1. स्वरच्या उच्चारावरून स्वरांचे चार प्रकार पडतात. 
१) ऱ्हस्व स्वर 
२) दीर्घ स्वर 
३) संयुक्त स्वर 
४) इंग्रजी स्वर 
□ 2. स्वरच्या उच्चार स्थानांवरून स्वरांचे दोन प्रकार पडतात. 
१) सजातीय स्वर 
२) विजातीय स्वर

1. ऱ्हस्व स्वर

■ अ, इ, उ, ऋ, लृ या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ (कालावधी) लागतो ; म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. 
□ या स्वरांचा उच्चार आखूड होतो. 
□ " लृ " हे र्‍हस्व स्वर लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. (" लृ " वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे.)
□ ऱ्हस्व स्वर एकूण पाच आहे. ( अ, इ, उ, ऋ, लृ )

2. दीर्घ स्वर

■ आ, ई, ऊ या स्वरांचा उच्चार करण्यास जास्त वेळ (कालावधी) लागतो ; म्हणून त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. 
□ या स्वरांचा उच्चार लांबट होतो. 
□ दीर्घ स्वर एकूण तीन आहे. ( आ, ई, ऊ )

3. संयुक्त स्वर

दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. 
□ ए, ऐ, ओ, औ हे स्वर इतर दोन स्वर मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर म्हणतात. 
□ संयुक्त स्वर दीर्घ उच्चाराचे असतात. 
□ संयुक्त स्वर एकूण चार आहे. ( ए, ऐ, ओ, औ
□ ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहेत. ते पुढीलप्रमाणे तयार झाले आहेत. 
१) = अ + इ / ई 
२) = आ + इ / ई 
३) = अ + उ / ऊ 
४) = आ + उ / ऊ
□ संयुक्त स्वर मिळून मराठीत एकूण दीर्घ स्वर सात आहे : आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ

4. इंग्रजी स्वर

■ ॲ,ऑ हे इंग्रजीतून मराठीत आलेले स्वर आहेत. 
□ इंग्रजी स्वर एकूण दोन आहे. ( ॲ, ऑ )

5. सजातीय व विजातीय स्वर

■ सजातीय स्वर  
एकाच उच्चार स्थानांतून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.  
□ उदाहरणार्थ -:  
१) अ - आ  
२) इ - ई  
३) उ - ऊ 

■ विजातीय स्वर  
भिन्न उच्चार स्थानांतून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.  
□ उदाहरणार्थ -:  
१) अ - इ  
२) अ - उ  
३) उ - ई  
४) इ - ऊ 

■ सजातीय व विजातीय स्वरांविषयी   
दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो.  
दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर तयार होतो.  
दोन संयुक्त स्वर एकमेकांत मिसळत नाहीत.

(D) स्वरादीचे प्रकार व उजळणी

# मराठी स्वरादीचे एकूण प्रकार

■ स्वरादीचे एकूण प्रकार  
□ स्वरादीचे दोन प्रकार पडतात.  
१) अनुस्वार (अं)  
२) विसर्ग (अः)

1. अनुस्वार (अं)

■ एखाद्या अक्षरावर अनुस्वार दिल्यास अगोदर त्या अक्षराचा उच्चार करावा लागतो व मग अनुस्वाराचा उच्चार होतो. 
□ अनुस्वाराला लगेच मागून आलेला उच्चार किंवा दुसऱ्यावर स्वार होणारा असेसुद्धा म्हणतात. 
अं चे अनुस्वारअनुनासिक असे दोन उच्चार होतात. 
स्पष्ट व खणखणीत उच्चाराला अनुस्वार म्हणतात. 
□ अस्पष्ट व ओझरत्या उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात.   
□ उदा. गंगा, घंटा ,शंकर

2. विसर्ग (अः)

विसर्ग म्हणजे मुक्त होणे होय. " अः " चा उच्चार करताना हवेचा विसर्ग होतो; म्हणून या वर्णाला विसर्ग म्हणतात. 
□ विसर्गाचा उच्चार " " या वर्णाला झटका देऊन, उच्छवास सोडून केलेल्या उच्चारासारखा आहे.
□ विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे होय.
□ विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वीसुद्धा एखाद्या स्वराचा आधार घ्यावाच लागतो. 
उदा. दुःख
□ दुःख ( द् + + विसर्ग ) या शब्दात विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी " " या स्वराचा आधार घ्यावा लागत आहे.

(E) व्यंजनाचे प्रकार व उजळणी

# मराठी व्यंजनाचे एकूण प्रकार

■ व्यंजनाचे एकूण सहा प्रकार पडतात.  
1. स्पर्श व्यंजने ; स्पर्श व्यंजनाचे तीन उपप्रकार आहेत.
(अ) कठोर  
(ब) मृदू  
(क) अनुनासिके / पर-सवर्ण  
2. अर्धस्वर / अंतस्थ व्यंजने  
3. उष्मे / घर्षक व्यंजने  
4. महाप्राण व्यंजने ( + अल्पप्राण )  
5. द्रविडीयन / स्वतंत्र व्यंजने  
6. संयुक्त व्यंजने

1. स्पर्श व्यंजने

■ स्पर्श व्यंजने एकूण 25 आहेत.  
□ "क्, ख्‌" पासून "भ्‌, म्" पर्यंतच्या व्यंजनांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात.  
□ फुफ्फुसांतील हवा तोंडावाटे बाहेर पडताना जीभ, कंठ, तालू, दात, ओठ या अवयवांना स्पर्श करते तेव्हा हे वर्ण उच्चारले जातात, म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हणतात. 

■ स्पर्श व्यंजनाचे तीन उपप्रकार 
अ) कठोर (स्पर्श व्यंजने) 
ब) मृदू (स्पर्श व्यंजने) 
क) अनुनासिके / पर-सवर्ण (स्पर्श व्यंजने) 

अ) कठोर (व्यंजने) 
□ ज्या व्यंजनांत उच्चाराची तीव्रता दिसून येते, ती कठोर व्यंजने समजली जातात. 
कठोर व्यंजनांनाच श्वास किंवा अघोष वर्ण म्हणतात. 
क्, ख्‌, च्‌, छ्, ट्‌, ठ्, त्‌, थ्‌, प्‌, फ्‌ यांचा उच्चार करावयास कठीण असल्यामुळे त्यांना कठोर व्यंजने म्हणतात. 
श्, ष्‌, स्‌ या वर्णांचाही कठोर वर्णांत समावेश होतो.  
□ एकूण कठोर व्यंजने 13 आहेत. ( वरील 10 + 3

ब) मृदू (व्यंजने) 
□ तुलनेने ज्यांचा उच्चार सौम्य, कोमल किंवा मृद्दू होतो, त्यांना मृदू व्यंजने म्हणतात. 
मृदू व्यंजनांनाच नाद किंवा घोष वर्ण असे म्हणतात. 
ग्, घ्‌, ज्‌, झ्, ड्, ढ्, द, ध्‌, ब्‌, भ्‌ या व्यंजनांचा उच्चार करावयास सोपा असल्यामुळे त्यांना मृदू व्यंजने म्हणतात. 
य्, र्‌, ल्‌, व्‌, ह्, ळ्‌ तसेच सर्व स्वर, स्वरादी, अनुनासिके या वर्णांचासुद्धा मृदू वर्णांत समावेश होतो.
□ एकूण मृदू व्यंजने 16 आहेत. ( वरील 10 + 6

क) अनुनासिके / पर-सवर्ण
□ ङ्, ञ्, ण्‌, न्‌, म्‌ या वर्णांचा उच्चार जिभेचा तोंडातील इतर भागाना स्पर्श होण्याव्यतिरिक्त नाकातूनही होतो; म्हणून त्यांना अनुनासिक असे म्हणतात. 
□ अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरता येतात, म्हणून त्यांना " पर-सवर्ण " असे म्हणतात.
□ एकूण अनुनासिके 5 आहेत.

2. अर्धस्वर / अंतस्थ (व्यंजने)

य्, र्‌, ल्‌, व्‌ यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ, ऋ, लृ, उ या स्वरांच्या उच्चार स्थानांवरच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे; म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. 
य्, र्‌, ल्‌, व्‌ यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ, ऋ, लृ, उ या स्वरांच्या उच्चारस्थानां सारखीच आहेत. 
संधी होताना या स्वरांच्या जागी वरील व्यंजने किंवा व्यंजनांच्या जागी हे स्वर येतात. 
□ अर्धस्वर ही मृदू व्यंजने आहेत. 
अर्थस्वर स्पर्श व्यंजने व उष्मे यांच्या मध्ये येतात; म्हणून त्यांना अंत:स्थ म्हणतात. 
अर्थस्वर एकूण 4 आहेत.(य्, र्‌, ल्‌, व्‌)

3. उष्मे / घर्षक (व्यंजने)

श्, ष्‌, स्‌ यांना उष्मे म्हणतात. या वर्णांचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. त्यामुळे त्यांना उष्मे (घर्षक) असे म्हणतात. 
श्, ष्, स्‌ यांना उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात. 
□ यांचा समावेश कठोर वर्णांमध्ये होतो. 
□ या वर्णांना सीत्कार असे सुद्धा म्हणतात. 
उष्मे / घर्षक एकूण 3 आहेत. (श्, ष्, स्‌)

4. महाप्राण (व्यंजन)

■ “” या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला महाप्राण असे म्हणतात.
□ अशा “ह्” मिसळून झालेल्या वर्णांना महाप्राण वर्ण म्हणतात.
□ वर्णमालेत महाप्राण एकूण 1 आहेत. ()
□ उच्चारानुसार महाप्राण एकूण 14 आहेत.
ख्‌, घ्‌, छ्, झ्, ठ्, ढ्, थ्‌, ध्, फ्, भ्‌, श्‌, ष्‌, स्‌ या वर्णात "ह" प्रमाणे मोठ्या प्रमाणात वायू बाहेर पडतो म्हणून त्यांना महाप्राण म्हणतात. 
□ मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहिताना H अक्षर वापरावे लागते. त्या सर्व वर्णांना महाप्राण म्हणतात. बाकीचे अल्पप्राण आहेत. 
उदा. ख - KH (महाप्राण), क - K (अल्पप्राण
अपवाद - स्‌ (S) महाप्राण, च्‌ (CH) अल्पप्राण 

अल्पप्राण या वर्णात “ह” ची छटा नसते. 
□ क्, ग्, ङ्, च्, ज्‌, ञ्, ट्‌, ड्‌, ण्, त्, द्, न्‌, प्‌, ब्‌, म्‌, य्‌, र्‌, ल, व्‌, ळ्‌ हे अल्पप्राण आहे.

5. संयुक्त व्यंजने

■ “ क्ष् , ज्ञ् ” या संयुक्त व्यंजनांचाही आधुनिक वर्णमालेत समावेश होतो. 
संयुक्त व्यंजने एकूण 2 आहेत. (क्ष् , ज्ञ् )

6. द्रविडीयन वर्ण (व्यंजन)

■ "ळ्" हा स्वतंत्र वर्ण किंवा द्रविडीयन भाषा गटातील वर्ण मानला जातो. 
□ "ळ्‌" हे मृदू व्यंजन आहे.
द्रविडीयन / स्वतंत्र वर्ण एकूण 1 आहेत. ()

(■))--------● अभ्यासक्रम (ब) ●--------((■)
प्रकरण (2) - मराठी : वर्णउच्चार व वर्णदंड

(A) वर्णाचे नाव व वर्णउच्चार स्थाने

A1. कंठ्य वर्ण (पडजिभेजवळील जागा)

■ जिभेचा मागील भाग हा वर उचलून पडजिभेच्या पुढील भागाला म्हणजे कंठाला स्पर्श करताना ज्या वर्णाचा उच्चार होतो, त्यांना कंठातून निघणारे म्हणून "कंठ्य वर्ण" असे म्हणतात.
कंठ म्हणजे गळा
□ पडजिभेच्या पुढील कोमल तालूचा जो भाग आहे त्याला कंठ असे म्हणतात.
अ, आ + अ: (विसर्ग) - ही स्वर कंठ्य वर्ण आहेत. 
क्‌, ख्‌, ग्‌, घ, ङ्, ह्‌ - ही व्यंजने कंठ्य वर्ण आहेत.
● Trick -: कंठाची : " हाक "

A2. तालव्य वर्ण (जेथे चिंच चघळतो ती जामा)

■ जिभेचे पाते कठोर तालूला लावून ज्या वर्णाचे उच्चार होतात, त्यांना तालव्य वर्ण असे म्हणतात.
□ वरच्या दातांच्या मागील बाजूच्या भागापासून कंठापर्यंत जिभेच्या वरच्या बाजूस जो घुमटाकार भाग आहे त्याला तालू असे म्हणतात. 
इ, ई - ही स्वर तालव्य वर्ण आहेत. 
च्‌, छ्, ज्‌, झ, ञ्, य्‌, श्‌ - ही व्यंजने तालव्य वर्ण आहेत.
● Trick -: ताल : " यशीच "

A3. ओष्ठ्य वर्ण (ओठ)

■ खालच्या व वरच्या ओठांचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो, त्यांना ओष्ठ्य वर्ण असे म्हणतात. 
ओष्ठ म्हणजे ओठ
उ, ऊ - ही स्वर ओष्ठ्य वर्ण आहेत. 
प्, फ्‌, ब्‌, भ्, म् - ही व्यंजने ओष्ठ्य वर्ण आहेत.
● Trick -: ओठांची : " उप "

A4. मूर्धन्य वर्ण (कंठ व तालू यांच्यामधील जागा)

■ जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचा शेंडा या मूर्धेला जाऊन भिडतो, त्यांना मूर्धन्य वर्ण असे म्हणतात.
तालूकंठ यांच्या मधल्या भागाला मूर्धा असे म्हणतात.
- हा स्वर मूर्धन्य वर्ण आहेत.
ट्, ठ्, ड्, ढ्, ण्‌, र्‌, ष्‌, ळ्‌ - ही व्यंजने मूर्धन्य वर्ण आहेत.
● Trick -: मूर्धा : " ऋटरषळ "

A5. दंत्य वर्ण (दात)

■ जे वर्ण उच्चारताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दातांच्या मागच्या बाजूस टेकते, त्यांना दंत्य वर्ण असे म्हणतात. 
लृ - हा स्वर दंत्य वर्ण आहेत. 
त्‌, थ्‌, द्, ध्‌, न्‌, ल्‌, स्‌ - ही व्यंजने दंत्य वर्ण आहेत.
● Trick -: दातांची : " लृत लस "

B1. दंततालव्य वर्ण (दात आणी तालू)

■ कठोर तालूचा दातांकडील फुगीर व खरबरीत असा जो भाग आहे. त्याला वर्त्स म्हणतात. इथे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींना "वर्त्स्य ध्वनी" असे म्हणतात. यांनाच दंततालव्य वर्ण असे म्हणतात.
□ हा दाततालू यांच्यामधील भाग होय.
च्‌, छ्, ज्‌, झ - ही व्यंजने दंततालव्य वर्ण आहेत.
● Trick -: च वर्ग - पर्यंतच (अपूर्ण)
दात आणि तालू मध्ये : " " येते

B2. दंतौष्ठ्य वर्ण (दात आणि ओठ)

व् - हा व्यंजन दंतौष्ठ्य वर्ण आहेत.
● Trick -: दात आणि ओठ मध्ये : " " येतो.

B3. कंठतालव्य वर्ण (कंठ आणि तालू)

ए, ऐ, ॲ - ही स्वर कंठतालव्य वर्ण आहेत.
● Trick -: - आरान्त स्वर

B4. कंठौष्ठ्य वर्ण (कंठ आणि ओठ)

ओ, औ, ऑ - ही स्वर कंठौष्ठ्य वर्ण आहेत.
● Trick -: - आरान्त स्वर

B5. नासिक्य वर्ण (नाकातील भाग)

अं (अनुस्वार) - हा स्वर नासिक्य वर्ण आहेत.

○ फरक : तालव्य व दंततालव्य (व्यंजन)

■ फरक : तालव्य व दंततालव्य (व्यंजन)
तालव्य (तालू) ---------> (7 = 4+3)
च् , छ् , ज् , झ् , + ञ् , य , श.
दंततालव्य (दंत + तालू) -> (4)
च् , छ् , ज् , झ् .

(B) वर्णातील दंडाचे वर्गीकरण

1. मध्ये उभा दंड असणारी व्यंजने

क् , फ्‌ → एकूण 2 वर्ण आहेत.

2. शेवटी उभा दंड असणारी व्यंजने

ख् , घ्, च् ,ज् , झ् , ञ् , त् , थ् , ध् , न् , प् , ब् , भ् , म् , य् , व् , ष् , स् → एकूण 18 वर्ण आहेत.

3. शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने

ग्, ण्, श्‌ → एकूण 3 वर्ण आहेत.

4. अर्धा दंड असणारी आणि अर्धी होऊ शकणारी व्यंजने

छ्, ल्, ळ्‌ → एकूण 3 वर्ण आहेत.

5. अर्धा दंड असणारी पण अर्धी होऊ न शकणारी व्यंजने

ट् , ठ् , ड् , ढ् , द् , ह्‌ → एकूण 6 वर्ण आहेत.

6. दंड नसलेले व्यंजने

र्‌ → एकूण 1 वर्ण आहेत.

(■))--------● अभ्यासक्रम (क) ●--------((■)
प्रकरण (3) - मराठी : जोडाक्षरे व अ-कारविल्हे

(A) वर्णांचे : जोडाक्षरे

1. जोडाक्षराची व्याख्या

■ ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास जोडाक्षर म्हणतात. 
□ जोडाक्षरात क्रमाने प्रथम व्यंजन येते. नंतर शेवटी स्वर येते. 
जोडाक्षर म्हणजे = दोन किंवा अधिक व्यंजने + स्वर

2. जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती

■ अ) उभी पद्धत (ठ्ठ ) 
□ एकावर एक अक्षरे लिहिली जातात. 
□ उदा. विठ्ठल 

■ ब) आडवी पद्धत (ल्ल ) 
□ एकापुढे एक अक्षरे लिहिली जातात. 
□ उदा. दिल्ली
□ " र्‌ " या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या चार पद्धती आहेत. (PSI मुख्य 2013, STI मुख्य 2012)
उदा. र्‍य, र्य, प्र, ट्र

3. काही महत्त्वाचे जोडाक्षर

1. श्र = श् + र् + अ 
2. क्ष = क् + ष् + अ 
3. ज्ञ = द् + न् + य् + अ 
4. त्र = त् + र् + अ 
ऋ , लृ हा जोडाक्षर नाही. हे स्वर आहेत
□ उदा. पृथ्वी = प् + + थ् + व् + ई 
पृ = प् + ऋ ( पृ हा अक्षर आहे. जोडाक्षर नाही.) 
□ उदा. क्लृप्ती = क् + लृ + प् + त् + ई 
क्लृ = क् + लृ ( क्लृ हा अक्षर आहे. जोडाक्षर नाही.)

4. दोन किंवा अधिक वर्ण मिसळून तयार होणारे

■ व्यंजन + स्वर = अक्षर 
उदा. क् + अ = क 
□ स्वर + स्वर = संयुक्त स्वर 
उदा. आ + उ = ओ 
□ व्यंजन + व्यंजन = संयुक्त व्यंजन 
उदा. म् + ह् = म्ह् 
□ व्यंजन + तेच व्यंजन = द्वित्त 
उदा. क् + क् = क्क् 
□ व्यंजन + व्यंजन + स्वर = जोडाक्षर 
उदा. ब् + द् + अ = ब्द

(B) वर्णांचे : अ-कारविल्हे

1. वर्णांचे अकारविल्हे (क्रमीक मांडणी)

■ वर्णमालेतील वर्णांच्या क्रमाने मांडणी असणे म्हणजे अक्षरांचा अकारविल्हे होय.  
□ अ (१) ,आ (२) ,इ (३),......., ह (४९), ळ (५०), क्ष (५१) , ज्ञ (५२)  
डावीकडून -> उजवीकडे अक्षरांच्या क्रमानूसार मांडणी करणे म्हणजे वर्णमालेतील अक्षरांचा अकारविल्हे होय. 
□ खालील शब्दाचे अकारविल्हेनुसार क्रमीक मांडणी 
अ) तितिक्षा → ( त् , इ , त् (३२) , इ ,क्ष् ,आ )  
ब) तिळतीळ → ( त् , इ , ळ् (५०) , अ ,त् ,ई ,ळ् ,अ )  
क) तिरीमिरी → ( त् , इ , र् (४३) , ई ,म् ,इ ,र् ,ई )  
अकारविल्हेनुसार शब्दांचा क्रम → अ, क, ब

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव