प्रकरणचे नाव - भाषा, लिपी व व्याकरण

HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव

Rathod Sir - online अधीकारी study point

भाग A - PYQ आधारित स्मार्ट नोट्स

(■) राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी - स्मार्ट नोट्स

विषयचे नाव - मराठी व्याकरण

प्रकरणचे नाव - भाषा, लिपी व व्याकरण

(■))--------● अभ्यासक्रम (अ) ●--------((■)
प्रकरण (1) - भाषा व लिपी यांचे उगम

(A) भाषा व भाषेचे उगम

1. भाषा म्हणजे काय?

■ भाषा हे संवादाचे माध्यम आहे.
□ भाषा म्हणजे बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल होय.
□ भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन होय.
□ भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते, म्हणजे भाषेमध्ये बदल होत जातात.
□ भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो.
□ भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही, तर साहित्यांच्या संदर्भात ती आत्माविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे.

2. भाषा शब्दाचा उगम

भाषा हा शब्द भाष्‌ या संस्कृत धातू वरून आलेला आहे. त्याचा अर्थ बोलणे असा आहे.

3. भाषेचे दोन प्रकार

■ 1. नैसर्गिक भाषा (पुरावा नसतो.)
उदा. बोलणे, हावभाव, पशुपक्ष्यांचे आवाज, नाटक.
□ 2. कृत्रिम / सांकेतिक भाषा (पुरावा असतो.)
उदा. लिखाण, अक्षरे, चिन्हे.

4. दैनंदिन बोलण्यात व वापरात येणाऱ्या भाषा

मातृभाषा : आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा भाषा होय.
बोलीभाषा : दैनंदिन जीवनात संपर्कासाठी / संवादासाठी आपण जी भाषा वापरतो ती बोलीभाषा असते. उदा. मराठी, इंग्रजी, हिंदी....

5. भाषाविषयक पाच कौशल्य

■ भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे पाच पायऱ्या आहेत.
ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे, आकलन या पाच कौशल्यांवर भाषाशिक्षण अवलंबून असते.

(B) लिपी व लिपीचे उगम

1. लिपी म्हणजे काय?

आपण ज्या खुणांनी लिखाण करतोत्याला लिपी म्हणतात.
□ लिपीचा शोध लागल्याने आपल्याला लेखन शक्य झाले आहे.
□ लिहिण्यासाठी आपण लिपी वापरतो.

2. लिपी शब्दाचा उगम

लिपी हा शब्द लिप् या संस्कृत धातूवरून आलेला आहे. त्याचा अर्थ लिंपणे असा आहे.

3. प्राचिन काळातील लिपी

■ (अ) ब्राम्ही लिपी
ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्राम्हीलिपी म्हणतात.
□ ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम जेम्स प्रिन्सेपनी केले.

■ (ब) खरोष्ठी लिपी
□ खरोष्ठी लिपीला गांधारी लिपी असे पण म्हणतात.
□ कुषाण काळात भारतात या लिपीचा प्रामुख्याने उपयोग केला गेला.
□ खरोष्ठी लिपीचा उल्लेख बौद्ध उल्लेखात सुरुवातीपासून येतो.

■ (क) देवनागरी लिपी
मराठी भाषेचे लिखाण आपण देवनागरी लिपित करतो.
□ भारतातील आर्यन गटातील भाषा ह्या देवनागरी लिपित लिहिल्या जातात.
□ आर्यन गटातील भाषा - मराठी, हिंदी, संस्कृत, बंगाली, गुजराती, पाली. भारतात एकूण सहा भाषा देवनागरी लिपित लिहिल्या जातात.
□ देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात.
□ देवनागरी लिपीतील अक्षरांवर जी आडवी रेषा मारतात तिला शिरोरेषा म्हणतात.
□ देवनागरी लिपीतील ध्वनीना स्वतंत्र वर्ण आहे.
□ देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे पण म्हणतात.

■ (ड) मोडी लिपी
□ काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला मोडी लिपी म्हणतात.
□ मोडी लिपी म्हणजे पाय मोडून लिहिण्याची पद्धत.

(C) भारतातील भाषा व वर्गीकरण

1. भारतात भाषेचे दोन गट

■ भारतात भाषेचे दोन प्रकार पडतात.
1. आर्यन भाषा
2. द्रविडीयन भाषा

2. आर्यन भाषा

देवनागरी लिपी ही आर्य भारतीयलिपी आहे.
□ भारत मध्ये 78 टक्‍के पेक्षा जास्त लोक आर्यन भाषा बोलतात.
□ आर्यन गटातील भाषा (देवनागरी लिपी)
1. मराठी- महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा
2. हिंदी
3. संस्कृत

4. पाली
5. गुजराती -
गुजरात राज्याची राज्यभाषा.
6. बंगाली - पश्चिम बंगाल राज्याची राज्यभाषा.

3. द्रविडीयन भाषा

■ भारत मध्ये 22 टक्‍के पेक्षा जास्त लोक द्रविडियन भाषा बोलतात.
□ द्रविडीयन गटातील भाषा (दक्षिण भारतात आढळतात)
1. तमिळ - तामिळनाडू राज्याची राज्यभाषा.
2. तेलगू - आंध्रप्रदेश/तेलंगणा राज्याची राज्यभाषा.
3. मल्याळम - केरळ राज्याची राज्यभाषा.
4. कानडी/कन्नड - कर्नाटक राज्याची राज्यभाषा.

4. अभिजात भाषेचा दर्जा

■ जी भाषा प्राचीन असून मान्यताप्राप्त होती व ती अजून ही आधुनिक काळात टिकून आहे, त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो. एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे.
(१) तमिळ ..................…..(2004) 
(२) संस्कृत ......................(2005) 
(३) कानडी .................….....(2008) 
(४) तेलगु ......................……(2008) 
(५) मल्ल्याळम .................(2013)
(६) ओडिया ..................…...(2014)
(७) मराठी ...................…..(2024)
(८) प्राकृत .......................(2024)
(९) बंगाली ......................(2024)
(१०) पाली ......................(2024)  
(११) आसामी ..................(2024) 
□ मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळण्यासाठी 2012 मध्ये प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा पाठपुरावा करण्यासाठी ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती (2014) याची परिणीती म्हणून 2024 मध्ये पुन्हा 5 भाषांना हा दर्जा देण्यात आला आहे.
□ मराठी भाषेतील पहिला शिलालेख इ.स. १९८३ मध्ये श्रवणबेळगोळ येथे आढळला.
टीप : अभिजात दर्जा मिळाल्याने भाषेच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून खास प्रयत्न केले जातात त्यासाठी भरीव अनुदान दिले जाते. भाषेची प्रतिष्ठा वाढते तसेच भाषा विकासासाठी चालना मिळते.

5. राज्यघटनेत राज्य भाषेचा दर्जा

■ भाषेसंबंधी भारतीय संविधानातील तरतूदी 
कलम ३४३ : या कलमानुसार हिंदी व इंग्रजी या केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या भाषा आहेत. 
कलम ३५१ : हिंदी भाषेचे संवर्धन व विकास.
परिशिष्ट ८ : या परिस्थिष्टात देशातील २२ भाषांचा प्रादेशिक भाषा म्हणून समावेश केला आहे. 
□ भारतीय राज्यघटनेतिल भाग 17 मधील कलम 345 नूसार राज्यभाषेची तरतूद आहे.
□ भारतीय राज्यघटनेनुसार 22 भाषांना राजभाषांचा दर्जाप्राप्त आहे.
आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ, तेलगू. एकूण 22 भाषा.
मराठी महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा आहे.
बिहार राज्याची राज्यभाषा हिंदी आहे. भोजपुरी नाही.
सिक्कीम राज्याची राज्यभाषा लेपचा,भुतिया आहे.
जम्मू व काश्मीर राज्याची राज्यभाषा उर्दू आहे.
गोवा राज्याची राज्यभाषा मराठी,कोकणी आहे.

(D) महाराष्ट्राची भाषा मराठी व वर्गीकरण

1. मराठी भाषा (महाराष्ट्राची राज्य भाषा)

■ मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा आहे.
□ मराठी भाषेचा विकास संस्कृतप्राकृत या भाषांपासून झाला आहे.
□ संस्कृत, प्राकृत या प्राचिन भाषा आहे.
□ मराठी भाषा संस्कृत-प्राकृत या भाषांपासून विकसित झाली आहे.
मराठी व्याकरणावर इंग्रजी-संस्कृत भाषांचा प्रभाव झाला आहे.
□ मराठी भाषा लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर करतात.

■ येथे गोंधळू नका 
२१ फेब्रुवारी - जागतिक मातृभाषा दिन
२७ फेब्रुवारी - कुसुमाग्रजाचा जन्म दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. किंवा (जागतिक मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन)
१ मे - मराठी राजभाषा दिन (महाराष्ट्र दिन)
१० जानेवारी - जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.
१ ते १५ जानेवारी - मराठी भाषा पंधरवडा.

2. महाराष्ट्रात राहणाऱ्या जमातींच्या बोलीभाषा

■ महाराष्ट्रातील विविध प्रदेशातील बोलीभाषा
अहिराणी - खानदेश (उत्तर महाराष्ट्रात)
झाडी - पुर्व महाराष्ट्रात / विदर्भात (गोंदिया, भंडारा, चंद्रपूर,   गडचिरोली)
कोकणी / मालवणी - सिंधुदुर्ग, रत्नागिरी 
वऱ्हाडी - विदर्भ 
मावळी - पश्र्चिम महाराष्ट्रात
वारली - ठाणे, पालघर 
बंजारा - विर्दर्भ, मराठवाडा
हळबी - चंद्रपूर, भंडारा, गोंदिया 
गोंडी - पूर्व विर्दर्भ 

3. महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या भाषा

■ महाराष्ट्रामध्ये मराठी, हिंदीउर्दू भाषा बोलणाऱ्या लोकांच्या टक्केवारीतील क्रमांक प्रथम, द्वितीय व तृतीय आहेत.
□ महाराष्ट्रामध्ये भाषा बोलणाऱ्या लोकांची एकूण टक्केवारीनूसार उतरत्या क्रमाने - 1) मराठी, 2) हिंदी, 3) उर्दू, 4) गुजराती, 5) तेलगू, 6) कन्नड, 7) सिंधी....

(■))--------● अभ्यासक्रम (ब) ●--------((■)
प्रकरण (2) - मराठी व्याकरण व याचे घटक

(A) मराठी व्याकरण व उजळणी

1. व्याकरण म्हणजे काय?

□ व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय.
□ व्याकरण म्हणजे भाषा शुद्ध करणारे शास्त्र होय.
भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे व्याकरण होय.

2. मराठी व्याकरणातील घटक व कार्य

भाषा वाक्यांनी बनते, वाक्ये शब्दांनी बनते, शब्द अक्षरांनी बनते, अक्षर वर्णांंनी बनते.
उदाहरणार्थ -:

1. अक्षर वर्णांंनी बनते.
□ क (अक्षर) = क् + अ (वर्ण)

2. शब्द अक्षरांनी बनते.
□ कमळ (शब्द) = क + म + ळ (अक्षर)

3. वाक्य शब्दांनी बनते.
□ कमळ सुंदर आहे. (वाक्य)
□ कमळ + सुंदर + आहे (शब्द)

(B) मराठी व्याकरणाचे चार घटक व उजळणी

1. वर्ण

□ आपल्या तोंडून जे मुळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना वर्ण म्हणतात.
तोंडाद्वारे निघणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय.
उदा. क् , ख् , ग् , अ , इ , उ .....

2. अक्षर

□ आपल्या आवाजाच्या खुणांना किंवा ध्वनीच्या खुणांना अक्षर म्हणतात.
□ अक्षरांना ध्वनिचिन्हे असे म्हणतात.
□ अक्षर म्हणजे नष्ट न होणारे.
उदा. क , ख , ग , अ , इ , उ .....

3. शब्द

□ शब्द एक अक्षरांचा समूह असतो.
ठरावीक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास शब्द म्हणतात.
□ शब्द म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूह होय.
उदा. कमळ , सुंदर , फुल ....
■ व्याकरणात दोन प्रकारचे शब्द असतात.
1. प्रकृती शब्द
2. विकृती शब्द
मुळ शब्दाला व्याकरणात प्रकृती म्हणतात.
प्रत्येय जोडून तयार होणाऱ्या शब्द्दांच्यारूपाला विकृती म्हणतात.
उदा. प्रकृती - कमळ , विकृती - कमळाला

4. वाक्य

□ एखाद्या शब्दसमुहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असे म्हणतो.
□ वाक्य म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या शब्दांच्या अर्थपूर्ण समूह होय.
पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य होय.
उदाहरणार्थ -:
1. हा झाड आहे.
2. तो झाड डोंगरावर आहे.
□ आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे विधान असते.
□ आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य म्हणतात.
□ लयबद्ध शब्दरचनेला पद्य म्हणतात.

(C) मराठी व्याकरणातील योगदान

☆ मराठी व्याकरणासाठी योगदान दिलेल्या व्याकरणकर्त्यांची माहिती

□ मराठी व्याकरणाचे पाणिनी - दादोबा पांडुरंग तर्खडकर 
□ मराठी भाषेचे जॉन्सन - कृष्णशास्त्री चिपळूणकर 
□ मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते - दादोबा पांडुरंग तर्खडकर  
□ मराठी भाषेचे शिवाजी - विष्णुशास्त्री चिपळूणकर 
□ मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक - म्हाइंभट 
□ मराठी भाषेचे पहिले चरित्रकार - म्हाइंभट 
□ मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ - लीळाचरित्र  
□ मराठी पहिले मुद्रित व्याकरण - गंगाधरशास्त्री फडके 
ॲ, ऑ ला वर्णमालेत स्थान देणारे - अरविंद गंगाधर मंगरूळकर
अं, अ: यांना वर्णमालेत स्थान देणारे - मो. के. दामले
□  क्ष, ज्ञ ला वर्णमालेत स्थान देणारे - महादेव पांडुरंग सबनीस

-----------------------------------------------



Color Code

भाग B - PYQ चा मास्टर सराव

••• प्रकरण आधारित ALL old PYQ •••

Filterable Image Gallery Bootstrap | CodingNepal

🔰 सराव नं.(1) - आकडेवारी आधारित

🔰 सराव नं.(2) - व्याख्या आधारित

🔰 सराव नं.(3) - उदाहरण आधारित

🔰 MPSC : राज्यसेवा (गट अ) PYQ

🔰 MPSC : Combine (गट ब व क) PYQ

🔰 MPSC : तांत्रिकसेवा (इंजि,कृषी,वन) PYQ

🔰 म.पो. 2023 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2017 - 2021 पर्यंतचे PYQ

🔰 म.पो. 2011 - 2016 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2024 - 2026 पर्यंतचे PYQ

🔰 सरळसेवा 2018 - 2023 पर्यंतचे PYQ



HTML marquee Tag राठोड सर निर्मित - राज्य लोकसेवा आयोग , सरळसेवा पद भरती, TCS , IBPS , पोलीस भरती व इतर राज्य विभाग भरती परीक्षा PYQ आधारित मराठी स्मार्ट नोट्स + मास्टर सराव